How you can get Kisan Credit Card?? What are the required documents for getting Kisan Credit Card?? How much Loan You Can Get??
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये मी आपल्याला सांगणार आहे कि आपण किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवू शकता??सध्या कोरोना virus चा झटका संपूर्ण जगाला बसला आहे त्यामध्ये शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. त्याला आपल्या उत्पादनाकरिता पैसे कोठून आणावेत??खर्च कसा भागवावा याविषयीं चिंता झाली आहे. यावर उपाय म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी किसान क्रेडिट कार्ड वर प्रत्येक शेतकऱ्याला 3 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.आपण किसान क्रेडिट कार्ड काढायला आवेदन दिले तर आपल्याला 14 दिवसामध्ये कार्ड काढून मिळेल.
किसान क्रेडिट कार्ड कर्जाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करणे. या योजनेपूर्वी शेतकऱ्यांना सावकारावर अवलंबून होते ज्यांनी जास्त व्याज आकारले आणि योग्य तारखेला कठोर केले. विशेषत: जेव्हा त्यांना गारपीट, दुष्काळ इत्यादी संकटांचा सामना करावा लागला तेव्हा यामुळे शेतकऱ्याला बर्याच अडचणी आल्या. दुसरीकडे, किसान क्रेडिट कार्ड कर्जात कमी व्याज घेते, लवचिक परतफेड वेळापत्रक. शिवाय, पीक विमा आणि संपार्श्विक मुक्त विमा देखील वापरकर्त्यास प्रदान केला जातो.
किसान क्रेडिट कार्डाचे फायदे :-
1.कमी व्याजदर आहे जवळपास 2.00%.
2.1.6 पर्यंत कर्ज जे परतावा नाही केले तरी चालेले.
3.पीक विमा योजना पण उपलब्ध आहे.
4.50,000 पर्यंत अपंगत्व आल्यास किंवा मरणोपरांत विमा.
5.इतर कोणतीही वाईट घटना झाल्यास 25,000 पर्यंत विमा.
6.परतावा करायचा असेल तर पीक पद्धतीवर केला जाईल म्हणजे पिकांची जात लागवडीची वेळ,काढणीची वेळ इ.
7.3 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
8.तुमच्या किसान क्रेडिट कार्ड खात्यावर तुम्हाला अधिक व्याजदर मिळेल.
9.जर तुम्ही योग्य कालावधीमध्ये कर्जाचा परतावा केला तर तुम्हालाच सरळव्याज लागू होईल अथवा तुम्हाला चक्रवाढ व्याज द्यावे लागेल.
किसान क्रेडिट कार्डसाठी नोंदणी करायची असल्यास बँकांच्या वेबसाईट:-
बँक ऑफ महाराष्ट्र :-https://www.bankofmaharashtra.in/mahabank_kisan_credit_card_mkcc
स्टेट बँक ऑफ इंडिया :-
बँक ऑफ इंडिया :-
ऍक्सिस बँक :-
कोणत्या शेतकऱ्याला मिळणार किसान क्रेडिट कार्ड वर कर्ज??
तुम्ही शेतीशी निगडित कोणताही व्यवसाय करत असाल भलेही शेतीसोबत मत्स्यपालन,कुक्कुटपालन,जनावरांचे पालन करत असाल तर तुम्हालाच देखील मिळू शकते क्रेडिट कार्ड वर 1.6 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते जे non refundable(परतावा नाही केला तरी चालेले) आहे.
सरकारने काढलेला आदेश वाचण्याकरिता येथे click करा:-
कोणी कोणी किसान कार्ड काढू शकते ते पाहण्यासाठी येथे click करा :-
काही बाबी लक्ष्यात घ्या :-
1.तेच खात वापरा ज्या खात्यावर आपले pmkisan योजनेचे पैसे जमा होतात.
2.जर तुम्हाला pmkisan योजने अंतर्गत पैसे मिळत असतील तर तुम्ही आवेदन करू शकता.
किसान क्रेडिट कार्ड online काढण्यासाठी येथे click करा :-
1.तुम्हाला प्रथम हा form डाउनलोड करावा लागेल
Link :- click here
2.त्या नंतर तुम्हाला हा form दिसून येईल.
या form मधील सर्व बाबी भरून घ्याव्यात:-
1.Option B मध्ये जर तुम्ही नवीन कार्ड साठी अर्ज करणार असाल तर पहिला option select करा. जर तुमचे अगोदर कार्ड असेल तर दुसरा पर्याय निवडा त्याकरिता ☑️ << या चिन्हाचा वापर करा.
2.त्यानंतर खालच्या रकान्यामध्ये आपल्याला कर्जाची रक्कम विचारलेली आहे तेथे आपल्या कर्जाची रक्कम भरा.
3.त्यानंतर दिलेल्या C option मध्ये तुम्हाला खातेदारचे नाव द्यावं लागणार त्या खालील रकान्यात खातेदारचा नंबर द्यावा लागेल.
त्या नंतर खालील रकान्यात आपल्याला विचारलं कि तुम्हालाच PMSBY किंवा PMJJBY योजने अंतर्गत आपल्याला पिकाचा विमा करायचा आहे कि नाही ते ठरवून टिक करा.
4.D option मध्ये आपल्याला विचारले आहे कि,आपले अगोदर कोणत्याही बँकेत कर्ज आहे का जर असेल तर माहिती द्या,अथवा रिकामी सोडा.
5.E option मध्ये आपल्याला जमिनीविषयी माहिती विचारली आहे.त्यामध्ये आपल्या गावचे नाव, गट नंबर,मालकाचे नाव व उर्वरित माहिती भरा.
6.F option मध्ये जर आपण मत्स्यपालन,जनावरांचे व्यवसाय निवडावा लागेल.(हि माहिती बँक मध्ये विचारा)
7.सगळ्यात शेवटी तुम्हाला आपली सही किंवा अंगठा लावावा.
3.ज्या बँक खात्यामध्ये pmkisanचे पैसे जमा होतात तेथे जाऊन हा form जमा करा व 14 दिवसानंतर आपले कार्ड बँकेत जाऊन घ्यावे.
आवश्यक कागदपत्रे :-
1.आधार कार्ड
2.मतदान ओळखपत्र / ड्रायविंग लायसेन्स / पॅन कार्ड / पासपोर्ट.
3.पासपोर्ट size फोटो.
4.जमिनीचे कागदपत्रे
5. इतर कागदपत्रे जी बँकेने सांगितली आहेत.
किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते?
जो कोणी कृषी, संबंधित कार्ये किंवा इतर बिगरशेती कार्यात गुंतला आहे त्याला किसान क्रेडिट कार्ड कर्ज दिले जाते. कि
क्रेडिट कार्ड कर्जासाठी पात्र होण्यासाठी खालील निकष खालीलप्रमाणे आहेतः
- किमान वय – 18 वर्षे
- कमाल वय – 75 वर्षे
- एखादा कर्जदार ज्येष्ठ नागरिक असल्यास (वय 60 वर्षांपेक्षा जास्त), सह-कर्जदार अनिवार्य आहे जेथे सहकारी-कर्जदार हा कायदेशीर वारस असावा
- सर्व शेतकरी – व्यक्ती / संयुक्त शेती करणारे, मालक भाडेकरी शेतकरी, तोंडी पट्टेदार आणि भागदार इ. भाडेकरू शेतक-यांसह बचत गट किंवा संयुक्त दायित्व गट
मदतीकरिता संपर्क करा :-
टोल फ्री नंबर :- 1800115526 / 01206025109 / 0120155261
FAQ
किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी मी अर्ज कसा करू शकतो?
उत्तर:
आपण बँकेच्या शाखेत भेट घेऊ शकता आणि आपल्या किसान क्रेडिट कार्डचा वापर करुन थेट कर्जासाठी अर्ज करू शकता. आपल्याला आपल्या बँक शाखेमधून अर्ज केल्याचा १५ दिवसामध्ये आपले किसान क्रेडिट कार्ड मिळून जाईल.
किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी व्याज दर काय आहे?
उत्तर:-
व्याज दर बँकेने ठरविला आहे आणि तो शेतकर्याचा मागील पत इतिहास, शेतीखालील क्षेत्र, लागवडीखालील पीक इत्यादी अनेक बाबींवर अवलंबून असतो. तथापि, आरबीआय बँकेने दिलेल्या जास्तीत जास्त व्याज दरावर लक्ष ठेवून आहे. .
टीप:- प्रत्येक बँकेचा कर्ज दर वेगवेगळा आहे. आपण कर्ज घेताना आपल्या बँकेशी संपर्क साधा व नंतरच कर्ज घ्यायला तयार व्हा.
किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रात करू शकतो?
उत्तर:-
आपण जर किसान क्रेडिट कार्ड वरती कर्ज काढले असेल तर त्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो जसं की, आपल शेत आहे त्यामध्ये बी बियाणे घ्याची आहेत त्या करिता या कर्जाचा उपयोग केला जाऊ शकतो.
त्याचप्रमाणं जर तुम्ही शेतीविषयक कोणतीही अवजारे जसं की ट्रॅक्टर, कल्टी वेटर, पॉवर टिलर घेणार असाल तर तुम्ही या कर्जाचा वापर करू शकता.
जर तुम्ही पशुपालन करत असाल तर, किंवा मत्स्य व्यवसाय,कुक्कुटपालन करत असाल तर तुम्ही या कर्जाचा वापर करू शकता.
एकंदरीत काय तुम्ही शेती किंवा शेतीशी निगडीत कोणताही व्यवसाय केला असेल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड वापरता येत.
About this post:-
या पोस्ट मध्ये आपण पाहिले की आपण किसान क्रेडिट कार्डचा वापर कसा करू शकतो.ते कोणत्या ठिकाणी चालते? ते कसे मिळते?
कोठे मिळते?
किसान क्रेडिट कार्डाचे फायदेको,शेतकऱ्याला मिळणार किसान क्रेडिट कार्ड वर कर्ज?,किसान क्रेडिट कार्डसाठी नोंदणी करायची असल्यास बँकांच्या वेबसाईट,कागदपत्रे,किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते?,क्रेडिट कार्ड कर्जासाठी मी अर्ज कसा करू शकतो? , किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी व्याज दर काय आहे,
किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रात करू शकतो?