प्रधान मंत्री किसान मानधन योजना माहिती मराठी मध्ये – Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana Information In Marathi

pradhan mantri kisan mandhan yojana information in marathi | प्रधानमंत्री किसान मानधन योजना माहिती मराठीमध्ये•

नमस्कार मित्रानो, 

या पोस्ट मध्ये मी आपल्याला प्रधान मंत्री किसान मानधन योजने बद्दल  सांगणार भारत सरकारने किसान मानधन योजना भारतातील मोठ्या असो वा छोट्या खेड्यातील शेतकऱ्यांना आपले वय ६० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना उदरनिर्वाह साठी एक योजना आखली आहे. ती योजना म्हणजे प्रधान मंत्री किसान मानधन योजना

या योजने अंतर्गत भारतातील प्रत्येक शेतजऱ्याला ज्याचे वय ६० वर्षे पूर्ण झाले आहे त्याला सरकारकडून मानधन मिळणार आहे.
ही योजना केंद्र सरकारद्वारे ३१ मे २०१९ ला लागू करण्यात आली होती. 
या योजनेचा लाभ घेऊन भारतातील अनेक शेतकरी त्यांचे वय ६० वर्षापेक्षा जास्त त्या प्रत्येकाला मिळणार आहे. सन २०२० मध्ये पण ही योजना सन २०१९ प्रमाणे काम करणार आहे. ही योजना २०२२ पर्यंत भारतामधील जवळपास ५ करोड जनतेला मदत करेल.
या योजने अंतर्गत १८ ते ४० वर्षातील किसान बांधवांना लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्याची शेती २ हेक्टर पेक्षा कमी असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

प्रधान मंत्री किसान मानधन योजना:-

प्रधान मंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ वर्षापासून त्या व्यक्तीला सरकारला प्रतीमहिना ₹५५ रुपयाचे भरणा करावा लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकऱ्याला सरकारला काही पैसे भरावे लागणार आहेत, ते पैसे दरमहा हप्त्या मध्ये भरावे लागणार आहेत.
आणि जसे वय ४० होईल तसे प्रतीमहीना ₹२०० रुपये भरणा करावा लागणार आहे.
प्रधान मंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आपले स्वतःचे बँक खाते असणे अनिवार्य आहे तसेच ते बँक खाते आपल्या आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे. कारण ज्या वेळी या योजनेचा लाभ त्या लाभार्थीला हवा असेल त्याची रक्कम सरळ त्याच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावी.

प्रधान मंत्री किसान मानधन योजनेचा उद्देश:-

  1. योजनेचा उद्देश आहे की भारतामध्ये असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना त्यांचे वय साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, ज्याप्रमाणे सरकारी नोकरदारांना पेन्शन भेटते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही पेन्शन भेटावे.
  2. म्हातारपणामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो,या काळामध्ये शेतकऱ्यांना कोणावरही अवलंबून राहता येऊ नये. याकरिता सरकार त्यांना प्रति महिने तीन हजार रुपये इतकी रक्कम देणार आहे.
  3. या योजनेचे पैसे प्रत्येक शेतकऱ्याला मिळतील ज्याने आपल्या वयाच्या 18 ते 40 वर्षामध्ये या योजनेसाठी प्रतिमहिना 55 रुपये ते दोनशे रुपये आपल्या योजनेमध्ये हफ्ता म्हणून दिले असतील. तीन हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला जमा होत राहतील.
  4. या योजनेमुळे शेतकऱ्यांची सामाजिक स्थान ही उंचावेल आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित असेल.
  5. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबातील पत्ती-पत्नीला सुद्धा लाभ मिळणार आहे.काही कारणास्तव जर पतीचा मृत्यू झाला असेल तर पत्नीला आपल्या नवऱ्याची पेन्शन मिळू शकते.
हा योजनेमागचा हेतू आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना:-

या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या प्रीमियमच्या 50 टक्के भाग द्यावा लागेल आणि 50 टक्के भाग केंद्र सरकार भरणार आहे.सन 2020 मध्ये या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख नऊ ऑगस्ट 2020 आहे.
या योजनेसाठी आवश्यक असणारे फॉर्म आपल्याला सीएससी (कॉमन सर्विस सेंटर)मध्ये भरून मिळतील. ही योजना एलआयसीच्या योजना सारखीच आहे.
योजना राबवण्यासाठी भारत सरकारने जवळपास १०७७४ कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे.

पीएम किसान मानधन योजनेमधील काही महत्त्वाचे मुद्दे:-


  1. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्याला महिन्याला तीन हजार रुपये इतकी पेन्शन मिळणार.
  2. योजना भारतातील सर्व ग्रामीण भागामध्ये लागू होणार आहे. यामध्ये आपले खेडे मोठे असो वा लहान प्रत्येक घेण्याला ही योजना मिळणार आहे.
  3. या योजनेअंतर्गत जवळपास पाच कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
  4. या योजनेस पात्र होण्यासाठी 18 ते 40 वर्षापर्यंत या शेतकऱ्यांना प्रीमियम भरावे लागेल. अठरा वर्षासाठी 55 रुपये प्रीमियम आहे, चाळीस वर्षापर्यंत दोनशे रुपये प्रीमियम आहे.
  5. योजनेला लागणारे रकमेपैकी निम्मे पैसे शेतकऱ्याने भरावे लागणार व निम्मे पैसे केंद्र सरकार भरणार आहे.
  6. दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

पी एम किसान सन्मान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-

  • आपली जमीन दोन हेक्‍टरपेक्षा कमी हे दाखवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे.
  • आधार कार्ड (शेतकरी व त्याची पत्नी)
  • बँक पासबुक (शेतकरी व त्याची पत्नी)
  • जन्म प्रमाणपत्र (शेतकरी व त्याची पत्नी)
  • रहिवासी प्रमाणपत्र (शेतकरी व त्याची पत्नी)
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो (शेतकरी व त्याची पत्नी)
  • उत्पन्नाचा दाखला

पी एम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा?


  • या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) मध्ये जावे लागेल.त्यानंतर त्यांनी मागणी केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. त्यानंतर आपली योग्य ती माहिती त्यांना द्यावी. जर या मध्ये कोणती माहिती चूक केली असेल तर तुमचा फॉर्म भरला जाणार नाही.
किंवा
  • तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी VLE (व्हिलेज लेवल इंटरपिनर) कडे जावे लागेल तेथे आपल्याला योग्य ती राशी भरून फॉर्म भरून द्यावा लागेल.
किंवा
  1. तुम्हाला जर स्वताहून फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही,
  2. सर्वप्रथम आपल्याला ऑफिशिअल वेबसाईट वरती भेट द्यावी लागणार.
  3. या लिंक वर क्लिक करून तुला ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊ शकतात.
  4. आपल्याला खालती स्क्रोल करावे लागेल, तेथे आपल्याला apply now या बटनावर क्लिक करावे लागेल. आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायला सांगितले जाईल तेथे आपला मोबाईल नंबर टाकावा.
  5. त्याच्या खालील ईमेल आयडी व कॅपच्या भरावा. व पुढील स्टेप करता आणि डायरेक्ट व्हावे.
  6. त्यानंतर आपल्या दिल्या गेलेले मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो otp भरून आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करावे.
  7. त्यानंतर आपल्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल,तेथे आपल्याला एनरोलमेंट ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल. तिथे आपल्याला ऑप्शन दिसून येतील त्यामध्ये आपल्याला किसान मानधन योजना select करावे लागेल.
  8. त्यानंतर त्या पोर्टलवर आवश्यक असणारी सर्व माहिती भरून घ्यावे, त्यामध्ये आपले नाव,पत्ता, मोबाईल नंबर,ईमेल आयडी, कॅपच्या फिल करून घ्यावा.
  9. त्यानंतर योजनेशी संबंधित सर्व माहिती वाचून घ्यावी. व आय एम ॲग्री या बटनावर टिक करून आपला फॉर्म सबमिट करावा.
  10. भविष्यामध्ये उपयोगी येण्यासाठी फार्मचे कॉपी आपल्याकडे ठेवावे.

पिएम मानधन योजनेचे काही महत्वाची पैलू:-

योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकरी कुटुंबातील जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ५० टक्के रक्कम मिळणार आहे, पण याकरिता सुद्धा एक अट आहे ती म्हणजे पत्नीने अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही अहस्तांतरणीय आहे कारण लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम सरळ त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

आपल्याला कोणत्या वयामध्ये किती रक्कम भरावी लागेल?

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की तुम्हाला कोणत्या वयामध्ये किती रक्कम भरावी लागेल.ही रक्कम तुम्हाला प्रत्येक महिन्याला भरावे लागेल.
  • 18 55₹
  • 19 58₹
  • 20 61₹
  • 21 64₹
  • 22 68₹
  • 23 72₹
  • 24 76₹
  • 25 80₹
  • 26 85₹
  • 27 90₹
  • 28 95₹
  • 29 100₹
  • 30 105₹
  • 31 110₹
  • 32 120₹
  • 33 130₹
  • 34 140₹
  • 35 150₹
  • 36 160₹
  • 37 170₹
  • 38 180₹
  • 39 190₹
  • 40 200₹

About this post:-

आपण या पोस्टमध्ये पाहिले की, प्रधानमंत्री मानधन योजना काय आहे? या योजनेतील विविध माहिती पाहिली, यामध्ये आपण या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतो? या योजनेकरिता आपल्याला किती पैसे भरावे लागतील? योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे.
मी आशा करतो की आपल्याला प्रधानमंत्री किसान मानधन योजना विषयी माहिती समजली असेल, जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचप्रमाणे आमच्या वेबसाईटला अशाच माहितीसाठी बुक मार्क ही करून ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *