मासेमारी करताना अपघाती मृत्यू झाल्यास मच्छिमारांच्या वारसांना दयावयाचे अर्थसहाय्य
नमस्कार मित्रांनो,
या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, जर आपण मासेमारी करत असाल अर्थात आपण कोळी बांधव असला तर एखाद्या वेळी जर कोणासोबत वाईट घटना होवून जर कोणत्याही व्यक्तीचा जर मासेमारी करताना मृत्यू झाला तर काय करावे??
महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात सागरी किनार पट्टी लाभली आहे. यामुळे कोळी बांधवांना पण आधार मिळतो. पण एखाद्या वेळी जर काही बरे वाईट झाले तर त्या विषयी माहिती असणे आवश्यक आहे.
चला तर बगु काय आहे योजना आणि ती कशी उपयोगात आणली जाईल.
योजनेचा उद्देश:-
अपघाती मृत्यू अथवा बेपत्ता झालेल्या मच्छीमारांच्या वारसांना अर्थसहाय्य करणे
शासन निर्णयानुसार:-
शासन निर्णय क्र. ११९३/१७१९/१९१ दिनांक १९ सप्टेंबर १९९८ नुसार मासेमारी करताना मृत्यू झाल्यास अथवा बेप्पाता झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ₹१,००,००० इतकी रक्कम देण्यात यावी.
हे आदेश १ जून,२००८ पासून कार्यरत आहेत.
लाभाचा तपशील:-
मच्छिमारांचा अपघाती मृत्यु अथवा बेपत्ता झाल्यास त्यांच्या वारसांना रु.१,००,०००/- इतके अर्थसहाय्य मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- अपघाताची पोलीस ठाण्यात केलेली नोंद
- जन्मदाखला
- जात प्रमाणपत्र
- मृत व्यक्तीच्या मृत्युचा दाखला
- मृत्युचे कारण दर्शविणारा वैदयकिय दाखला
- संबंधित मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे क्रियाशिल मच्छिमार असल्याचे प्रमाणपत्र
- संबंधीत ग्राम पंचायतीकडुन प्राप्त केलेले मृत्यु तसेच वारस प्रमाणपत्र
संपर्क
संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय