मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२० | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2020 | Government of Maharashtra

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२० | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2020 | Government of Maharashtra

नमस्कार मित्रांनो,

या लेखामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील मुख्यामंत्री सौर कृषी पंप योजनेची संपूर्ण माहिती मिळेल. तुम्हाला माहिती आहेच, २०२०-२१ च्या या केंद्रीय अर्थसंकल्पात, सौर पंपांना शेतीत वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात रकमेची तरतूद करण्यात आली होती. त्या पाठोपाठ महाराष्ट्रातील या योजनेला चांगली चालना मिळणार आहे. नावाप्रमाणेच या योजनेचे उद्दीष्ट म्हणजे राज्यातील शेतकर्‍यांना सोलर वॉटर पंप देणे.आता आपण महाराष्ट्रातील शेतकरी सौर कृषी पंप योजनेसाठी (पर्यटन सौर कृषीपंप योजना महाराष्ट्र) ऑनलाईन अर्ज करू शकता. शेतकरी घरी बसल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवू शकता

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र मध्ये राज्य सरकारद्वारे अनेक योजना राबविल्या जातात. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही देखील महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होती मात्र मागच्या वर्षीपासून सरकारचे नियोजन कोलमडले गेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती नव्हती कारण अगोदरच पुर आला होता आणि यंदा कोरोना सारखी महामारी आली आहे.अनेक योजनांमुळे महाराष्ट्रातील जनतेला कायम फायदाच होत असतो. 
त्यापैकी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. महाराष्ट्रामध्ये सौर कृषी पंप योजना रबिवले जाते व त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो. ज्या शेतकऱ्यांकडे आपल्या शेतामध्ये मोटर बसवून घ्याची आहे पण त्यांच्या शेतामध्ये मोटर बसवायला अडचण येत असेल किंवा वीज वितरण त्या भागामध्ये होत नसेल तर शेतकऱ्याला याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली योजना आहे.शेतकरी काही सवलतीच्या दरामध्ये सरकारने दिलेल्या निधीचा वापर करून सौर पंप खरेदी करू शकतात व या योजनेचा लाभ मिळवू शकतात तर चला बगुया कशी आहे ही योजना…

योजनेअंतर्गत किती पैश्यामध्ये पंप मिळणार??

या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला ३ एचपी व ५ एचपी ची मोटर मिळते
जर आपण बाहेर कोठे जर सौर कृषी पंप खरेदी करायला गेलो तर तेथे आपल्याला फार मोठी रक्कम मोजावी लागते कारण एक तर ती सौर ऊर्जेवर चालणारी मोटर आहे. त्याकरिता आपल्याला मोटर खरेदी करावी लागणार त्यानंतर ती चालू करण्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा plate पण घ्यावा लागणार त्याकरिता जो खर्च येणार आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारा नाही आहे. यासाठी शासनाने माफक दरात या सौर पंपाचे वितरण करायचे ठरविले आहे.
जर आपल्याला ३ एच पी चा पंप घ्याचा असेल तर १,६५,५९४ इतकी रक्कम आहे. मात्र जर तुम्ही सर्वसाधारण ओपन गटातील शेतकरी असाल तर तुम्हाला १६,५६० रुपयांमध्ये हा पंप मिळणार आहे.
जर आपण अनुसूचित जाती/जमाती (एस सी/एस टी) मधील शेतकरी असाल तर तुम्हाला ८,२८० रुपये मध्ये हा पंप मिळणार आहे.
जर तुम्हाला ५ एचपी मोटर घ्याची असेल तर तुम्हाला २,४७,१०६ इतका खर्च येतो. मात्र सरकारने या योजेअंतर्गत आपल्याला ही मोटर (पंप) अगदी कमी किंमत मध्ये दिला आहे. ओपन कॅटेगरी मध्ये असलेल्या शेतकऱ्यांना २४,७१० रुपये तर अनुसूचित जाती/जमाती मध्ये येणाऱ्या लोकांना १२,३५५ इतक्या किमती मध्ये आपल्याला ही मोटर (पंप) मिळू शकतो.
 पंप  ३ एच पी  ५ एच पी
 मूळ रक्कम  १,६५,५९४    २,४७,१०६  
 ओपन  १६,५६०  २४,७१०
 एससी/ एसटी     ८,२८०  १२,३५५

सौर कृषी पंपामध्ये काय काय मिळणार??

आपल्याला सौर कृषी पंप सरकारकडून मिळणार आहे, तर आपल्याला फक्त कृषी पंप मिळणार नाही तर त्यासोबत आणखी भरपूर गोष्टी मिळणार आहेत, तेही विनामूल्य मिळणार आहे.तर चला पाहूया काय काय मिळणार आहे.
सौर कृषी पंपमध्ये पंप, सोलर पॅनल,पाईप, वायर,पंप चालू बंद करणे पॅनल, २ डी सी एल. ए. डी. बल्ब,मोबाईल चार्जर व बॅटरी चार्जिंग सुविधा.

सौर कृषी पंप मिळवण्यासाठी काय करावे??

नमूद केलेल्या भरायचे रक्कम लाभार्थीना महावितरण कडे जर या अगोदर नवीन कृषिपंप जोडणी करिता अर्ज दिला असेल तर व जोडणी प्रलंबित असेल तर एकूण रकमेपैकी जितकी रक्कम उर्वरित आहे ती भरावी. याकरिता लाभार्थ्यांनी संमती पत्र देणे आवश्यक आहे ते संबधित महावितरण उपविभागीय कार्यालयात सौर कृषी योजनेच्या मागणी अर्जासोबत सादर करावे.
अर्जाची प्रक्रिया:-
१. प्रथम आपल्याला महावितरणच्या mahadiscom वेबसाईट वरती जावे लागेल.
२.नवीन सौर कृषी पंपाची जोडणी करायची असेल तर येथे क्लिक करा
 प्रलंबित पंपाच्या जागी नवीन कृषी पंपची जोडणी करण्यासाठी येथे क्लिक करा
३. प्रलंबित ग्राहकांनी फक्त अर्ज क्रमांक,पैसे भरले असता पावती क्रमांक,मंजूर क्रमांक, क्षमतेची मागणी आदी भरण्याची गरज आहे.
४. नवीन कृषिपंपाची मागणी करणाऱ्यांनी सर्व फील्ड भरणे आवश्यक आहे.
५. वेबसाईट वर दिलेली A1 form 

आवश्यक कागदपत्रे:

१. ७/१२ उतारा
२. आधार कार्ड
३. कास्ट सर्टिफिकेट (एस सी /एस टी)
४. A1 form व घोषणापत्र अर्जाच्या सहिसह.

लाभार्थी निवड पात्रता व निकष:

सौर कृषी पंप मिळवण्यासाठी सरकारने काही नियम व अटी दिल्या आहेत त्याचप्रमाणे काही तरतुदी पण दिल्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आपल्याला सौर कृषी पंप मिळणार नाही.
१.ज्या शेतकऱ्यांकडे पहिल्यापासून पाण्याची सोय आहे मात्र पूर्वीपासून पारंपरिक वीज जोडणी नसावी.
२.ज्या शेतकऱ्यांकडे ५ एकर पेक्षा कमी जमीन आहे त्यांना ३ एच पी पंप भेटणार आहे व त्यापेक्षा जास्त शेती असलेल्यांना ५ एच पी पंप मिळणार आहे.
३.राज्यामध्ये पारंपरिक वीज पद्धतीने देयक नसलेले शेतकरी या योजनेस पात्र आहे.
४. विद्युतीकरण करण्यासाठी वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनी कडे विद्युत जोडणी करिता पैसे भरून ही प्रलंबित असलेल्या ग्राहकांमध्ये ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
५. अतिदुर्गम भागातील शेतकरी.
६. महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
७. सामुदायिक किंवा वैयक्तिक शेततळे,नदी, बोअरवेल जवळ असणारे शेतमालक या योजनेला पात्र आहेत. 
८.सदर कृषिपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून १० टक्के तर अनुसूचित जाती जमाती करिता ५ टक्के हिस्सा लाभार्थ्याला भरने आवश्यक आहे. 
९.अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतला नसावा. 

सौरकृषी पंपाचे फायदे :

सौर कृषी पंप घेतल्यानंतर आपल्याला अनेक फायदे मिळणार आहेत, यामध्ये आपल्याला पैशाची व वेळेची बचतही करता येते यामुळे शेतकऱ्याला शेती करायला सोपे जाणार आहे.
१.दिवसा वीजपंपास विजेची पूर्तता.
२.विना व्यत्यय विजेची पूर्तता. 
३.वीजबिलापासून मुक्तता. 
४.डिझेल पंपापेक्षा शून्य परिचालन खर्च. 
५.पर्यावरण पूरक परिचालन. 
६.शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडी पासून पृथक्करण करणे. 
७.औद्योगिक, वाणिज्य व घरगुती वीज ग्राहकांना अधिक वीजबिलाचा बोजा कमी करणे. 
मी आशा करतो कि माझी पोस्ट आवडली असेल. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत share करायला विसरू नका. 👍👍👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *