कंकणाकृती सूर्यग्रहण माहिती(२१ जून २०२०) Circular solar eclipse information in Marathi

कंकणाकृती सूर्यग्रहण माहिती(२१ जून २०२०) Circular solar eclipse information in Marathi 

नमस्कार मित्रानो,
जसे की आपल्या सर्वांना माहितच आहे की येत्या २१ जूनला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. आणि हे सूर्यग्रहण भारतामधून दिसणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये या ग्रहांविषयी उत्सुकता दिसून येते.
या पोस्ट मध्ये मी तुम्हाला २१ जून २०२० ला होणाऱ्या कंकणाकृती सूर्य ग्रहणा विषयी माहिती सांगणार आहे.

सूर्यग्रहण केव्हा होणार आहे??

कंकणाकृती सूर्यग्रहण आषाढ महिन्यामध्ये कृष्ण पक्ष अमावस्येला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. तो दिवस म्हणजे २१ जून २०२० असून, सूर्यग्रहणाचा कालावधी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २.०५ पर्यंत आहे.

सुतक केव्हा पाळावे??

हे सूर्यग्रहण अमावस्येला होणार आहे त्यामुळे जर तुमच्या घरात सुतक असेल तर किंवा जर तुम्ही सुतक पाळत असाल तर ते २० जूनला रात्री १० वाजता सुरू होईल. त्यामुळे जे लोक पाळतात त्यांना ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वृध्द, गरोदर, बाल, आजारी लोकांनी या सुतकाचे पालन सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत करावे.

आणखी काही माहिती:-

खगोल अभ्यासक यांनी सांगितले आहे की या सूर्य ग्रहणामुळे अनेक ठिकाणी अनेक वाईट घटना होवू शकतात जसं की युद्ध, आर्थिक तणाव, महामारी, भांडणे, अस्थिरता निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे असेही सांगण्यात आले आहे की,या ग्रहणावेळी ६ ग्रह आपल्या उलट्या दिशेने परिक्रमा करणार आहेत. मात्र शास्त्रज्ञ म्हणतात कि हे फक्त गैरसमज आहेत. 

हे माहिती आहे का? 

हे ग्रहण २१ जूनला होणार आहे, हा दिवस म्हणजे वर्षातील सर्वात मोठा दिवस होय आणि याच दिवशी अमावस्या आहे. तसंच अशी घटना सन २००१ ला पण झाली होती. 
मी आशा करतो कि ही माहिती आपल्याला आवडली असेल. 
अधिक माहिती साठी website bookmark करून ठेवा. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या