संकष्टी चतुर्थी विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये

Sankashti Chaturthi Information In Marathi 

नमस्कार मित्रांनो,
या पोस्ट मध्ये मी आपल्याला संकष्टी चतुर्थी विषयी माहिती सांगणार आहे, तसेच आपल्याला माहितीच आहे की. प्रत्येक महिन्यामध्ये एक संकष्टी चतुर्थी असते. संकष्टी चतुर्थी पौर्णिमेच्या चौथ्या दिवशी येते.
सर्वांना माहिती आहे की श्री गणेशा सर्वांचा लाडका आवडता देव आहे.कोणत्याही वयाचा आबालवृद्ध असो प्रत्येकाला गणपती बाप्पा प्रिय असतो. गणेशाचे मोहक रूप,त्याचे डोळे, त्याचे मोठे मोठे कान त्याच्या आवडते खाद्य मोदक हे सर्वांना माहितीच आहे.
अशा आपल्या लाडक्या बाप्पा ची आठवण काढायचा दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थी होय. या दिवशी सर्व गणेशाचे भक्त गणेशाची उपासना करतात व उपवास धरतात.

संकष्टी चतुर्दशी उपवास धरणे अतिशय सोपे असते यामध्ये कोणतीही जास्त पत्य पालन करायचे नसते. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी धरल्यामुळे अनेक लाभ मिळतात. कायम आपल्यावर श्री गणेशाची कृपादृष्टि राहते.
अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते. प्रत्येकाने या दोन संकष्टी चतुर्थी करणे आवश्यक मानले जाते.जर आपण त्या दोन्ही संकष्ट चतुर्थी धरल्या तर आपल्या वरती कायम गणपतीची कृपा दृष्टी राहते.
संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला सकाळपासून श्री गणेशाचा उपवास धरावा लागतो आणि चंद्रोदयाच्या वेळी चंद्र दर्शन करून व पूजा करून उपवास सोडावा लागतो.

संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे सुरुवात कधी करावी?

आपण स्त्री असो वा पुरुष आपल्याला शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी पासून करावी. संकष्टी चतुर्थी आपण सलग एकवीस संकष्टी धरून व्रताचे उद्यापन करावे.मात्र काही घेऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्टी धरतात तर बहुतेक जण आयुष्यभर देखील संकष्टी चतुर्थी धरतात.

संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा करावा?

हे व्रत करणे अतिशय सोपे आहे. उपवास धरण्यासाठी आपल्याला उपवासाच्या खाद्य व्यतिरिक्त सकाळपासून काही खायचं नाही. रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणेशाची पूजा करायची व चंद्र दर्शन करून उपवास सोडता येतो.

संकष्टी चतुर्थी ची कथा 

ही संकष्टी चतुर्दशी ची कथा आपण अनेकवेळा ऐकले असेल.
एकदा गणपती उंदरावर बसून जात होते. जाता जाता गणपतीला कोणीतरी हसायचे ऐकू येते. गणपती वरती पाहतो तर चंद्र आपल्यावर हसत आहेत. हे पाहून गणपतीला फार राग येतो. गणपती चंद्राला शाप देतो की, आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्या तोंडाकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्याच्या वरती आळ येईल.
त्यानंतर चंद्र गणपतीची उपासना करतो व गणपतीला प्रसन्न करतात.
गणपती चंद्राला शापातून मुक्त करतो. मात्र त्याला सांगतो की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्दशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही. आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळ येईल.
त्यावेळी चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणीतरी त्या दिवशी माझ्या तोंडाकडे पाहिले तर त्यांनी काय करावे? त्यावर गणपती म्हटले की, त्याने संकष्टी चतुर्थीचा व्रत धरावा. त्यामुळे त्याची आळातून मुक्तता होईल.

पुराण काळातील कथांमध्ये असे सांगितले जाते की, श्रीकृष्णाने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्याच्या वरती, संम्यतक मणी चोरल्याचा आळ आला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले. व त्याच्या वरचा आणि निघून गेला.

जर आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा व आमच्या वेबसाईटला बुकमार्क करायला विसरू नका.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या