8a Mahabhulekh Utara Kasa Kadhycha(How You Can Get 8A Certificate) 8अ उतारा online कसा काढायचा??

या पोस्ट मध्ये मी आपल्याला सांगणार आहे कि आपण आपल्या जमिनीचा 8ए (8A)उतारा कसा काढायचा?? ८अ उतारा कैसे निकाले ??

How you can get 8A Mahabhulekh utara??

8a Mahabhulekh Utara Kasa Kadhycha(How You Can Get 8A Certificate) 8अ उतारा online कसा काढायचा??
या पोस्ट देखील वाचा :-

नमस्कार मित्रांनो,

8A उतारा काढायला महाराष्ट्र शासनाची एक website आहे. त्या link वर जाऊन आपण आपला 7/12 तसेच 8A उतारा काढू शकता.

जर आपण ग्रामपंचायती मध्ये गेला किंवा तलाठीकडे कडे गेला तर ते तुम्हाला सांगतात की अगोदर आम्ही दाखले उतारे तुम्हाला कार्यालयातून द्यायचो त्यावर आमचा सही शिक्का लागायचा. अशीच काही पद्धत होती ज्या पद्धतीचा अवलंब करून आपण ८ अ किंवा सातबारा काढायचो.
मात्र या पद्धतीमध्ये अनेक त्रुटी होत्या ती पारंपरिक पद्धत होती. मात्र राज्य सरकारने गेल्या 2 3 वर्षामध्ये भरपूर प्रगती केली आहे व त्यानुसार आपल्याला ७/१२,८ अ उतारे मिळू शकतात. आणि या पद्धतीमध्ये आपल्याला अतिशय सोपी पद्धत अवलंबली जाते. आपण फक्त गट नंबर, आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव यांच्यावरून आपला ७/१२,८ अ काढू शकतो.
मात्र जेव्हा आपण ७/१२ काढतो तेव्हा आपल्याला डिजिटल साईन सातबारा काढता येतो आणि ८ अ उतारा काढला तर त्यावर तलठ्याची सही घ्यावी लागते. ही बाब लक्षात घेवून आपल्याला ८ अ उतारा काढावा लागतो.
आपल्याला खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन आपल्याला सातबारा आणि ८ अ काढता येतो.
1.प्रथम आपल्याला ती link open करावी लागेल.
Link :-
या link वर click केल्यावर आपल्या समोर असे page open होईल.त्या मध्ये आपल्याला आपला विभाग निवडावा लागेल त्यामध्ये
पुणे,अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक यांचा समावेश होतो, त्यामध्ये आपला विभाग निवडा.
पुणे विभागामध्ये आपल्याला
कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो.
कोकण विभागामध्ये आपल्याला
पालघर, ठाणे, रायगड,मुंबई शहर व उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो.
नाशिक विभागामध्ये आपल्याला
नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो.
औरंगाबाद विभागामध्ये आपल्याला
औरंगाबाद, जालना, परभणी,हिंगोली, नांदेड,बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होतो.
अमरावती विभागांमध्ये आपल्याला
अमरावती, वाशिम,अकोला, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो.
नागपूर विभागामध्ये आपल्याला
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो.

2.पुढच्या page वर 2 option येतील त्यामधील 8अ हा option निवडा.

त्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.
3.त्या नंतर next step ला तुम्हांला तालुका select करावा लागेल.
4.त्या नंतर गाव select कराव लागेल.
5.एवढी माहिती भरल्या नंतर तुम्हाला आपले खाते शोधावे लागेल.
खाता नं., पहिले नाव, मधील नाव, आडनाव यांचा वापर करून.
6.या नंतर आपल्याला आपला 7अ पाहायला 8अ पहा वर click करा व नंतर capcha fill करा.
आपला सातबारा दिसेल.

अश्याच आणखी माहिती करिता आमच्या वेबसाईट ला bookmark करुन ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *