Best Marathi Goshti Ajibaicha Bhopla- Chal re Bhoplya Tunuk Tunuk

Marathi Goshti Ajibaicha Bhopla Chal re Bhoplya Tunuk Tunuk Moral Story | चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

जेव्हा आपण पालक असतो तेव्हा आपल्याला आपल्या पाल्याला रोज नवीन नवीन गोष्टी ऐकवायला पाहिजे. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपली आजी किंवा आई वडील आम्हला Marathi Goshti Ajibaicha Bhopla

किंवा इतर गोष्टी सांगत होते पण आताच्या मुलांना या Marathi goshti माहीत नसतात त्यांच्यासाठी या पोस्ट मध्ये मी Marathi Goshti Ajibaicha Bhopla सांगितल्या आहेत.
Marathi Goshti Ajibaicha Bhopla
एक होती म्हातारी तिला आपल्या मुलीची फार आठवण येत होती तिला वाटलं आपण आपल्या मुलीला भेटूया म्हणून ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसऱ्या गावाला आणि त्या दोन गावांच्या मध्ये एक घनदाट जंगल होते.
म्हातारी काठी टेकत, टेकत त्या घनदाट जंगलात एकटीच निघाली. वाटेत जात असताना तिला भेटला कोल्हा दिसतो.आणि कोल्ह्याला फार भूक लागलेली असते. तो म्हातारीला म्हणाला “म्हातारे, म्हातारे, मी तुला खात.” पण म्हातारी पण खूप हुषार होती.
ती त्या कोल्ह्याला म्हणाली “मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा ” कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. तो म्हातारीला सोडून देतो.
पुढे जंगलात गेल्यावर तिला एक वाघ भेटला. तो म्हणाला “म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो.” वाघाने डरकाळी फोडली. म्हातारी वाघाला म्हणाली “मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा.” वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे गेली .
ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. थोडया दिवसांनी तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की कोल्हा आणि वाघ आपल्याला खाणार आहे . तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला . आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली “चल रे भोपळया टुणुक टुणुक“. भोपळा रस्त्याने निघाला. अर्ध्या वाटेत आल्यावर वाघाने भोपळा पाहिला. तो म्हातारीला म्हणाला, “म्हातारे, म्हातारे थांब! ” आतून म्हातारी म्हणाली “कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक “. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. आणि म्हतारी वाघाच्या जबड्यातून पळून जाते.
पुढे आल्यावर वाटेत कोल्हा भेटला. तो म्हणाला “म्हातारे, म्हातारे थांब!” आतून म्हातारी म्हणाली “कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी चल रे भोपळ्या टुणूक टुणूक!” कोल्ह्याने भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.
अशी होती हुशार म्हातारी कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.

तात्पर्य – शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *