November 27, 2022
Chandra Official Marathi Song Lyrics in Marathi English
Marathi Movie Marathi Ringtone download marathi Songs

Chandra Official Marathi Song Lyrics in Marathi English

नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये मी तुम्हाला चंद्रमुखी या मराठी चित्रपटातील चंद्रा या गाण्याचे बोल सांगणार आहे. Chandra Marathi Song Full Lyrics in Marathi.चंद्रा हे गाणे २९ मार्च २०२२ रोजी प्रकाशित झाले आहे.

Chandra Official Marathi Song Lyrics in Marathi

थांबला का उंबऱ्याशी
या बसा राजी खुशी
घ्या सबुरीनं विडा
का उगा घाई अशी

इझला कशानं सख्यासजना सांगा
लुकलुकनारा दिवा
वनवा जिव्हारी धुमंसल राया जी
रातभर आता नवा

नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी
नाजुक छम छम घुंगराची

बान नजरंतला घेऊनी
अवतरली सुंदरा …चंद्रा

रात रंगी रती रंगूनी …चंद्रा
साज शिणगारही लेऊनी … चंद्रा
सूरतालात मी दंगूनी … चंद्रा
आले तारांगणी … चंद्रा

Antra

सरती ही बहरती रात झुरती चांदन्याची
जीवजाळी येत नाही चाँद हाताला
लहरी याद गहीरी साद जहरी काळजाची
घ्या दमानं हया उधानाच्या इशाऱ्याला
अवघड थोडं राया
नजरेच कोडं राया
सोडवा धिरानं साजना

नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी
नाजुक छम छम घुंगराची

बान नजरंतला घेऊनी
अवतरली सुंदरा …चंद्रा

रात रंगी रती रंगूनी …चंद्रा
साज शिणगारही लेऊनी … चंद्रा
सूरतालात मी दंगूनी … चंद्रा
आले तारांगणी … चंद्रा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *