छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती मराठीमध्ये | Chatrapati Shivaji Maharaj Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती | Information about Shivaji Maharaj In Marathi

 

नमस्कार मित्रांनो,

जय भवानी जय शिवाजी || आज मी या पोस्ट मध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती सांगणारे. भारतातील कोणती अशी व्यक्ती नाही ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विषयी माहिती, प्रत्येक घराघरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पोचले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळेच आज आपण व्यवस्थित जीवन जगत आहोत. त्यांनी भारतावर आलेल्या अनेक संकटांना आपल्या मावळ्यांसोबत झुंज दिली.व ते संकट परत लोटले.
 
Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख | (Chatrapati Shivaji Maharajanchi olkh)

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर ती 19 फेब्रुवारी १६३० रोजी माता जिजाऊंच्या पोटी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजीराजे भोसले ही निजामांच्या हाताखाली सरदार म्हणून कामाला होते.छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या जवळपास ७५ टक्के वाहणाऱ्या स्वराज्याचे संस्थापक होते.
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तव्हा त्यांना शिवबा या नावाने संबोधले जात  असे. त्याच प्रमाणे जसे ते मोठे होत गेले तसे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, राजे, छत्रिय कुलावतंस, महाराज या नावाने संबोधले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणजे 19 फेब्रुवारी संपूर्ण भारतामध्ये शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांना एकत्रितपणे शिवशंभो असे संबोधले जाते. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीला शिल्पकार असे म्हणतात.
भारतामध्ये नौदलाची उभारणी करणारे पहिले राजे म्हणून छत्रपती शिवाजीराजे यांना ओळखले जाते.त्याचप्रमाणे शत्रूशी लढताना गनीमीकावा पद्धत उपयोगी करणारे ते एकमेव असे राजे होते.
आपल्या वडिलांकडून मिळालेले 1000 सैनिकांचे लष्करा पासून ते एक लाख सैनिका पर्यंतचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वबळावर निर्माण केले.
तर शिवाजी महाराजांच्या मृत्यु 3 एप्रिल १६८०ला झाला.
 

छत्रपती शहाजीराजे भोसले | (Chatrapati Shahaji Raje Bhosale Information in marathi)

छत्रपती शिवाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता. छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या हाताखाली सरदार म्हणून कामाला होते मलिक अंबर या प्रभावी निजामशहाच्या वजिराच्या मृत्यूनंतर, मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर वर चाल करून अहमदनगर शहर जिंकून घेतले. त्यानंतर छत्रपती शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाकडे सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने शहाजीराजांना पुण्याची जहागीरदारी दिली. जेवायला छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता शहाजी राजांच्या पुण्यामध्ये आले तेव्हा पुण्याच्या अतिशय बिकट अवस्था झाली होती.
दादोजी कोंडदेव यांच्या सहाय्याने पुण्याची पुनर्रचना करायला सुरुवात झाली.
 

माता जिजाऊ | (Jijamata Information in marathi)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता म्हणजे जिजाबाई शहाजीराजे भोसले. जिजाबाई लहानपणापासून शिवाजी महाराजांचे फार काळजी करत असत. शिवाजी महाराजांना त्यांनी लहानपणापासूनच स्वराज्याची धडे द्यायला सुरुवात केली होती.त्यांनी महाराजांना लहानपणापासून काय चांगले?काय वाईट?कशा पद्धतीने आपण आपले स्वराज्य निर्माण करू शकतो याविषयी शिकवण दिली होती.
 
शिवरायांचे मावळे:-
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले भले मोठे साम्राज्य निर्माण केले होते त्या साम्राज्याच्या मध्ये शिवरायांच्या मावळ्यांचा फार मोठा वाटत आहे.
शिवरायांच्या सैनिकांना मावळे असे नाव नाव पडले याचे कारण म्हणजे, दोन डोंगररांगा मधील अंतर आला मावळ असे म्हणतात आणि त्याच्यामध्ये लढाई लढणाऱ्या सैनिकांना मावळे असे नाव देण्यात आले.
 

स्वराज्याची मुहूर्तमेढ | (Shivaji Maharaj Swarajya Information)

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वयाच्या सत्तराव्या वर्षी काही मुठभर मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी आदर्श शाळेच्या कब्जा मधील तोरणा गड जिंकून घेतला व स्वराज्याचे तोरण बांधले.
त्यास आली छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर व कोंढाणा गड जिंकून आपल्या स्वराज्य मध्ये सामील केले. हा गड जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांवर आपले वर्चस्व निर्माण केले.
त्यानंतर त्यांनी मुरुमदेवाचा डोंगर जिंकला व त्याची डागडुजी करायला सुरुवात केली. शिवाजीमहाराजांनी त्या गडाचे नाव राजगड असे ठेवले.
 

शिवरायांची राजमुद्रा | (Shivaji Maharaj Rajmudra [Hon])

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर केल्यानंतर त्यांनी स्वतःचे एक स्वतंत्र राजमुद्रा तयार केले त्या राजमुद्रा ला “होन” असे नाव देण्यात आले.
 

अफजलखानाचा वध | Afjalkhanacha Vadh

इ. स. १६५९ ला अफजलखानाने आपल्या राज्य भावनांमध्ये शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदारांनी निवडला. आपल्या सर्व सैन्यासह अफझलखान वाईजवळ आला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरून अफजलखानाला तोंड देण्याचे ठरवले.
तहाची बोलणी चालू असताना शेवटच्या बोलणी वेळी अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्याचे ठरवणे मात्र शिवाजी महाराजांच्या वकिलांनी अफजलखानाला गळ घालून प्रतापगडावरती भेटण्याचे निमंत्रण दिले.
शिवाजी महाराज व अफजलखान यांची भेटीची वेळ ठरली. या भेटीवेळी कोणतेही शस्त्र वापरता येणार नाही अशी अट घालण्यात आली होती.मात्र अफजलखानाचा क्रूरपणा शिवाजी महाराजांना माहीत होते त्यामुळे त्यांनी आपल्या अंगामध्ये चिलखत चढवले. त्याच प्रमाणे आपल्या हातामध्ये वाघ नखे घेतली आणि बिचवा देखील घेतला . शिवाजी महाराजांच्या बरोबर जिवा महाला हा विश्वासू सरदार होता. तर अफजल खानाबरोबर सय्यद बंडा नावाचा दान पट्टेदार होता. शिवाजी महाराज व अफजल खानाची भेट प्रतापगड च्या पायथ्याशी असलेल्या शामियाना मध्ये द्यायचे ठरले.
धिप्पाड शरीर असलेला अफजल खान याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हल्ला केला.मात्र शिवाजी महाराजांनी चिलखत घातले होते या कारणामुळे शिवाजीमहाराजांना कट्यारीचा वार लागणार नाही. परत शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या पोटावरती हल्ला केला. हा हल्ला केल्यानंतर अफजलखान ओरडू लागला ते ऐकून अफजलखानाचा सय्यद बंडा धावत आला व त्याने शिवाजी महाराजांच्या वर दानपट्टा चालवला. मात्र दानपट्टा त्यांनी शिवाजी महाराजांच्या मध्ये शिवाजी महाराजांचा मावळा जीवा महाला आला, या कारणामुळेच म्हटले जाते होता जीवा म्हणून वाचला शिवा.
 

सिद्दी जोहरचा वेढा | Siddhi Johar cha Vedha in Marathi

अफजलखानाचा मृत्यू झाल्यानंतर मुगल बादशहा फार चिडला होता. त्याने आपला दुसरा सरदार सिद्दी जोहरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर आक्रमण करण्यासाठी पाठवले.शिवाजी महाराजांच्या वर अनेक मोठमोठी संकटे आली होती त्यापैकी एक संकट म्हणजे सिद्धी जोहर. सिद्धेश्वर शिवाजी महाराजांच्या वर सन १६६० साली हल्ला केला.त्यावेळेला शिवाजी महाराज मिरजेच्या किल्ल्यावरती वेढा घालून होते.या बातमीची खबर सिद्दीजोहरला भेटली, शिवाजी महाराज पन्हाळा गडावर निघून गेले. त्याच बरोबर सिद्धी जोहर देखील पन्हाळगडावर निघून गेला आणि पन्हाळगडाला वेढा घातला.सिद्धी जोहरने गडावरची सर्व रसद मोडून काढली. मात्र शिवाजी महाराजांनी गड सोडला नाही शेवटी त्यांनी ठरवले की आपण जवळच असलेल्या विशाळगडावर जाऊ, त्यांनी आपला वीर मावळा शिवा काशीद यांची मदत घेऊन पन्हाळगड वरून विशाळगडाकडे जाण्याचे ठरवले.
शिवा काशीद हा हुबेहुब शिवाजी महाराजांसारखे दिसत असत, त्यांनी गडावरून पळून जाण्याचे नाटक केले व त्या संधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे रवाना झाले.
 

घोडखिंडीचे लढाई | Ghodkhindichi Ladhai in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यास सोबत विशालगडा कडे जात असताना त्यांच्या पाठोपाठ सिद्धेश्वर आपले काही सैन्य पाठवून दिली.वाटेत जाताना सिद्धेश्वर सैन्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सामना करावा लागला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना सांगितले की, तुम्ही विशाळगडाकडे रवाना व्हा मी सिद्धी च्या सैन्याचे सामना करतो. त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितले की तुम्ही गडावर पोहोचला की तोफांचे तीन आवाज करा ते ऐकून मला समजेल की तुम्ही गडावर पोहोचले आहात.
सिद्धेश्वर येथे विशाल सैन्यात सामना करत असताना बाजीप्रभू देशपांडे यांचा मृत्यू झाला.बाजीप्रभू देशपांडे ज्या खिंडीमध्ये मेले त्या खिंडीचे नाव शिवाजी महाराजांनी घोडखिंड बदलून पावनखिंड असे देण्यात आले.
 

शाहिस्तेखानाचा वध | Shayistekhanacha vadh information in marathi

शिवाजी महाराजांचा नर्मदा नदी पुढील साम्राज्यविस्तार करायला आळा घालण्यासाठी, मोगल सम्राटाने आपल्या मामा शाहिस्तेखानाला पाठवले.शाहिस्तेखान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे येत असताना आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक गावाला आणि राज्याला नुकसान करत होता. शेवटी त्याने पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांच्या लाल किल्ल्यामध्ये तळ ठोकला.
शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचा वध करण्यासाठी एक पण घेतला तो म्हणजे लाल किल्ल्या मध्ये घुसून शाहिस्तेखानाचा वध करणे.
लाल महालाच्या आजूबाजूला मोठा फौजफाटा असेल त्यामुळे तेथे शिरणे अतिशय अवघड आहे हे शिवाजी महाराजांना माहिती होते यासाठी शिवाजी महाराजांनी एकेदिवशी लाल महालाजवळून चालत असलेल्या लग्नाच्या वराती मधून लाल महाला मध्ये जाण्याची योजना आखली.
शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला केला मात्र शाहिस्तेखानाच्या चपळतेमुळे मात्र त्याची तीन बोटे कापली गेली होत.मात्र या कारणाने मोगल साम्राज्याची फार मोठी मानहानी झाली होती ती स्वराज्यासाठी फार महत्त्वाची होती.
 

सुरतेची लूट | Surtechi lut information in marathi

छत्रपती शिवाजी महाराजांना आपले स्वराज्य वाढविण्यासाठी अनेक सैनिकांची गरज लागली होती. त्याच प्रमाणे त्यांनी आपल्या जनतेच्या सुखासाठी काही पैशाची गरज होती. मात्र मोगल सम्राटांना याची गरज लागत नाही कारण ते जनतेकडून अधिकार लादुन पैसे कमवत असत. राज्याचा खजिना वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवर लूट करण्याचे ठरवले. यामुळे दोन गोष्टी साध्य होत होत्या एक म्हणजे मोगल साम्राज्याला आव्हान देणे व आपल्या खजिना मध्ये भर घालने.
सध्याच्या गुजरात राज्यामध्ये असलेले सुरत शहर हे मोगल काळामध्ये मुगल साम्राज्य मध्ये मोडत असे अतिशय वैभवशाली शहर देखील होते.या कारणामुळे शिवाजी महाराजांनी सुरतेवर लूट करण्याचे ठरवले.
या सुरतेच्या लुटी मध्ये स्त्रिया आबालवृद्ध यांना सूट देण्यात आली. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांनाही कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली.
 

पुरंदरचा तह | Purandarcha Tah in marathi

शिवाजीमहाराजांचे वाढते साम्राज्य बघून मोघल सम्राटाच्या तोंडचे पाणी पळाले. त्याने आपल्या राज्यातील सर्वात कुशाल सम्राट मिर्झाराजे जयसिंग, आणि दिलेरखानाला शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी ८०००० सैन्याबरोबर पाठवून दिले. मिर्झाराजे जयसिंग याने पुरंदर किल्ल्यावरती वेढा घातला. आणि दिलेरखानने वज्रगडावर वेढा घातला.
वज्र गडावरून पुरंदरवर हल्ला करण्यात आला यामुळे पुरंदरचे खूप मोठे नुकसान झाले त्याचबरोबर मराठ्यांचे सरदार मुरार बाजी यांचे देखील फार मोठे नुकसान झाले मुरारबाजी बरोबर पुरंदर देखील कोसळून पडला.
या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग याच्यासोबत तह केला. ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह घडून आला. कोंढाणा,पुरंदर,लोहगड,पळसगड यासारखे २३ किल्ले मुगल सम्राट यांना देण्यात आले.
 

दिल्लीतून सुटका | Delhichi sutka in marathi

इसवी सन १६६६ साली मोगल सम्राटाने छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्ली येथे बोलण्यासाठी बोलवण्यात आले.शिवाजी महाराजांचे सोबतच शिवपुत्र संभाजी राजे देखील होते. मात्र शिवाजी महाराजांना कनिष्ठ सरदारांच्या सोबत उभे करून शिवाजी महाराजांचा अपमान केला. या अपमानामुळे शिवाजी महाराज त्याक्षणी महालातून बाहेर येऊन आपली वाट धरू लागले. मात्र मोगल सम्राटाने शिवाजी महाराजांना अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले.
सुटका करणे शक्य नव्हते यामुळे शिवाजी महाराजांनी एक योजना आखली. शिवाजी महाराजांनी आजारी पडण्याचे नाटक केले व आपली तब्येत ठीक व्हावी यासाठी या मंदिरा मध्ये मिठाईचे पेठरा पाठवण्याचे ठरवले.
प्रत्येक प्रत्येक वेळी शिवाजी महाराज पळून जातील यासाठी पेटारा याची तपासणी केली जात असे मात्र थोड्या दिवसानंतर याच्यामध्ये दिरंगाई करण्यात येऊ लागली. याचा फायदा घेऊन छत्रपती संभाजीराजे व शिवाजीराजे पेठारामधून पळ काढला.
कुणाला संशय येऊ नये यासाठी शिवाजी महाराजांचा विश्वासू हिरोजी फर्जद यांनी शिवाजी महाराजांची कपडे घातले व त्यांची जागा घेऊन तो आराम करू लागला. शिवाजीमहाराज दूरवरून निघून गेले हे समजल्यानंतर तोही पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला.
पाहरेकर यांनी ज्यावेळी पाहिले तर तेथे कोणीही नव्हते. शिवाजी महाराजांनी पाहाऱ्या मधून निसटुन सरळ आग्रा गाठला.त्यानंतर त्यांनी काही दिवस वेशांतर करुन मथुरा गाठली.त्यानंतर त्यांनी आपल्या विश्वासू सैन्याबरोबर संभाजीराजांना महाराष्ट्रामध्ये पाठवून दिले.शिवाजी महाराजांनी एका संन्यासाची वेषांतर करून वेगळ्या वाकड्या मार्गाने महाराष्ट्र मध्ये प्रवेश केला.
 

सिंहगड चा पराक्रम | Sinhgad Parakram in marathi

शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते या अपमानाचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपण दिलेले तेवीस किल्ले परत घेण्याचे ठरवले होते. याची सुरुवात त्यांनी कोंढाणा किल्ला पासून केली. त्यांनी आपला विश्वासू सरदार तानाजी मालुसरे याला या कामगिरीसाठी निवड केली होती.तानाजी मालुसरे आपल्या मुलाचे लग्न सोडून उदयभानसारखा पराक्रमी सरदार विरोधात लढण्यासाठी गेला होता. “आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे”हे त्यांचे शब्द इतिहासामध्ये अजरामर झाले.कोंढाण्याच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांना वीर मरण आले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी उद्गारले शब्द “गड आला पण सिंह गेला”अजून पण अजरामर आहेत.
त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे च्या आठवणीसाठी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.
 

शिवराज्याभिषेक | Shivrajyabhishek information in marathi

६ जुन १६७४ सांगली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडण्यात आला.शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर ती राज्याभिषेक करण्यात आला, त्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी शिवशक चालू केले.त्याच प्रमाणे आपले चलन देखील त्याचे नाव शिवराई असे ठेवण्यात आले. त्याच प्रमाणे त्या दिवसापासून ते आजतागायत शिवरायांचा राजगडावरती दरवर्षी राज्याभिषेक सोहळा पार पडला जातो.
 
अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवन काळामध्ये मराठा साम्राज्याची निर्मिती केली. आणि मराठ्यांचे नाव संपूर्ण भारतभर उंचावले गेले. अशा या पराक्रमी राजा शिवछत्रपतींना कोटी कोटी प्रणाम.
जय भवानी || जय शिवाजी ||
 
हे पण नक्की वाचा :

1 Comment

  1. “शिवराय” हे फक्त नाव
    नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा
    आणि यशाचा मंत्र आहे…

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *