Dindayal Upadhayay Gramin Kaushalya Yojana | दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना | Government of Maharashtra Skill Yojana Information In Marathi

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास योजना | Maharashtra government Skill Inhancement Scheme

नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक लोक भलेही ते शिक्षित असो वा अशिक्षित आपल्या घरी बेरोजगार म्हणून राहत आहेत. काही लोक शिक्षित असून त्यांना नोकरी मिळत नाही, काही लोकांना साधने नसल्याने शिकता येत नाही तर काहीजण घरच्या परिस्थतीमुळे शिकू शकत नाही त्यामुळे मागासले पणाचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
यावर उपाय म्हणून राज्य शासनाने काही योजना आखल्या आहेत त्या योजनांच्या आधारे आपण आपल्याला हवे असलेले काम करू शकतो. त्यामुळे आपल्या घरी ४ पैसे पण येतील आणि आपला समाजातील दर्जा पण वाढेल. यापैकी एक योजना म्हणजे दीनदयाळ उपाध्याय कौशल विकास योजना.
skill development scheme,pradhan mantri kaushal vikas yojana ,pradhan mantri kaushal vikas yojana, courses skill development programme, pradhan mantri skill yojana, ministry of skill development and entrepreneurship, national skill development mission ,pradhan mantri skill development yojana, skill development initiative scheme, pramod mahajan kaushal vikas yojana, national skill development programme ,skill india pmkvy skill development yojana
ही योजना केंद्र सरकार मार्फत राबवली जाते. या योजने अंतर्गत आपल्याला हव्या त्या क्षेत्रामध्ये काम करता येते आपण शिक्षित असो वा नसो. तुम्हाला तुमच्या छंदाची जोपासना करत करत काम पण करता येत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही किमान शिक्षणाची गरज नाही आहे. फक्त आपल्याकडे कोणतेतरी कौशल्य असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले वय १५ ते ३५ वर्ष इतके असले पाहिजे. कौशल वृध्दी प्रशिक्षण व वेतन रोजगाराचे प्रकल्प एनजीओ, सीएसओ, सीबीओ अश्या फेडरेशन ने करावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. या अंतर्गत सरकारने काही संस्थंची निवड केली आहे. आणि काही संस्थांची निवड प्रक्रिया चालू आहे. या संस्था अंतर्गत युवकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.या योजनेंतर्गत युवकांना मासिक किंवा दैनंदिन मजुरीचे काम दिले जाईल. या योजनेंतर्गत ग्रामीण भागामध्ये सुधारणा होईल. तरुणांना काम मिळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्यांचे आयुष्य उठेल.

योजनेचा उद्देश

ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता करून देणे.
केंद्र सरकारने २५ सप्टेंबर २०१४ रोजी तरुणांचे सुवर्ण भविष्य लक्षात घेऊन दीनदयाल उपाध्याय कौशल्य योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरीब तरुणांना पगारावर किंवा मासिक पगाराच्या आधारे चांगले काम द्यावे लागेल. या योजनेंतर्गत ग्रामीण जीवनास चालना मिळेल. ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करण्याचे उद्दिष्ट देखील आहे.
दीनदयाल उपाध्याय कौशल्य योजनेंतर्गत सरकार तरुणांनाही प्रोत्साहन देईल. नवीन रोजगाराच्या साधनांविषयी त्यांना जागरूक करेल. शिक्षणासही जागरूक करण्याची तरतूद आहे.या योजनेअंतर्गत शासन अधिकाधिक रोजगार उपलब्ध करुन देईल जेणेकरुन ग्रामीण भागाचेही जतन होईल. या योजनेंतर्गत सरकार परदेशात काम करण्यासाठीही उपाययोजना पुरवेल. २०११ च्या जनगणनेनुसार दीनदयाल उपाध्याय कौशल्य योजना सरकारने सुरू केली आहे.

लाभाचा तपशील

ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता निर्माण करून मिळेल व त्यांना कौशल्य विकासासाठी निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.
दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेत सुमारे ५.५ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा लागतो. या योजनेस विशिष्ट उद्दिष्टे आहेत. अधिकाधिक तरुणांना काम करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांना कामासाठी कुशल बनवा आणि अधिकाधिक तरुणांना रोजगार द्या.
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत प्रति व्यक्ती २५,००० ते १ लाख पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या प्रकल्पात चांगले प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षित तरुणांना चांगला फायदा होतो. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना तरूणांना ३महिने आणि १२महिन्यांच्या प्रशिक्षणांसाठी आर्थिक सहाय्य देते.

आवश्यक कागदपत्रे

 1. वयाबाबतचा पुरावा (आधार कार्ड/पारपत्र/पॅनकार्ड/वाहनचालक परवाना/जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यांपैकी एक)
 2. आधार कार्ड
 3. जात प्रमाणपत्र
 4. बचत गट प्रमुखाचे प्रमाणपत्र अथवा बचत गटाच्या बँक पासबुकची प्रत
 5. मनरेगा जॉब कार्ड
 6. शिधापत्रिका

संपर्क

सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालये

दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे मुख्य घटक

 1. या योजनेमुळे तरुणांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य देण्यात आले आहे, केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर.
 2. याने त्यांना जोर देऊन बदलले. प्रशिक्षण मंडळापासून कामाच्या वातावरणाकडे जाण्यापासून आवश्यक असलेल्या उत्क्रांतीबद्दल तरुणांना शिकवले जाते.
 3. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर ठेवलेल्या तरुणांसाठी या योजनेमुळे तरुणांना स्थलांतरातील अडथळे दूर करण्यात मदत झाली. प्रत्येक व्यक्तीचे इनपुट आणि उत्पादकता देखरेख केली गेली, त्यायोगे त्यांना प्लेसमेंट आणि रोजगारासाठी तयार केले.
 4. दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेची संपूर्ण जबाबदारी आणि मालकी देशातील प्रत्येक राज्याने घेतली आहे. परिणाम सक्षमतेने मूल्यांकन करणे सक्षम करणे.
 5. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहकार्याने ईशान्येकडील राज्यांमध्ये राहणाऱ्या तरुणांना विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम देण्यात आले.

दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना मॉडेल:-

दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना तीन थरांच्या अंमलबजावणी मॉडेलभोवती फिरते. स्तर आहेत – धोरण बनविणे, तांत्रिक सहाय्य आणि सुविधा एजन्सी. या मॉडेलच्या आसपास रचले गेलेले, तरुणांना प्रथम ओळखले जाते, प्रशिक्षण दिले जाते आणि नंतर कंपन्यांमध्ये ठेवले जाते. याउप्पर, मॉडेलने त्यांच्या नोकरीतील त्यांची वाढ आणि टिकाव देखरेख ठेवली.

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमध्ये नोंदणी कशा पद्धतीने करावे??

केंद्र सरकारने गेली अनेक वर्षे योजना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे मात्र अनेक लोकांना या योजनेबद्दल माहिती नाहीये.लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा पर्यटन चालू करण्यात आला आहे. मात्र माहितीच्या अभावेया पोर्टल वरती नोंदणी कशा पद्धतीने करावी हे माहिती नाही आहे. तर चला पाहूया आपण या पोर्टल वरती नोंदणी कशा पद्धतीने करू शकतो.
 1. नोंदणी करण्यासाठी प्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्या पोर्टल वरती जावे लागेल. लिंक:-http://ddugky.gov.in/apply-now
 2. त्यानंतर आपल्या समोर एक डिजिटल फोर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये आपल्याला आपले नाव, पत्ता ,जिल्हा, राज्य, ई-मेल आयडी,त्याच प्रमाणे आपला आयडेंटी प्रूफ म्हणजे आपण भारतीय नागरिक आहोत याचा पुरावा द्यावा लागेल.
 3. यामध्ये आपल्याला,बीपीएल कार्ड चा उल्लेख केला आहे बीपीएल कार्ड म्हणजे आपले रेशन कार्ड.या रेशन कार्ड मध्ये जो व्यक्ती नोंदणी करणार आहे त्या व्यक्तीचे नाव असणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे जर तुम्ही मनरेगा मध्ये काम केला असेल तर तेथे नोंदणी केलेले प्रमाणपत्र किंवा तुमचेओळख पत्र आहे. तेदेखील जमा केले तरी चालेल.
 4. त्यानंतर आपल्याला आपल्या व्यवसाय निवडावा लागेल व्यवसायांमध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन मिळून जातील आपल्याला जो व्यवसाय त्याचं व्यवसायाला निवडा व त्याच्यानंतर आपण त्या व्यवसायांमध्ये कोणत्या गोष्टी मध्ये तरबेज आहात ती गोष्ट निवडून.
 5. शेवटच्या स्टेपल आपल्याला आपला एक फोटो निवडावा लागेल त्या फोटोची साईज दोन एमबी पेक्षा कमी असली पाहिजे. तो फोटो दिलेल्या रकाण्यामध्ये अपलोड करा.
जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांनाही पाठवा.आणि या योजनेविषयी आणखी माहिती हवी असेल किंवा कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आम्ही त्याच्यावर नक्कीच आर्टिकल लिहून तुम्हाला मदत करेल.👍👍👍
आणखी काही पोस्ट वाचण्यासाठी खालती स्क्रोल करून वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *