श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ | dnyaneshwar sampurn sarth haripath in marathi video

श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ | dnyaneshwar sampurn sarth haripath in marathi

|| जय हरी विठ्ठल ||

ज्ञानेश्वर हरिपाठाला सांप्रदायिक हरिपाठ किंवा वारकरी हरिपाठ असेही म्हणतात.राम राम माऊली, जसं कि आपल्या सर्वाना माहिती आहे संत ज्ञानेश्वर किती महान संत होते त्यांनी वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी वयाच्या २१ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहली त्या ज्ञानेश्वरी मध्ये हरिपाठ लिहला. या संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठ मध्ये २९ अभंग आणि १ गणधिपाती स्तोत्र आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ | dnyaneshwar sampurn sarth haripath in marathi video

 

प्रत्येक हरिपाठमध्ये ४ ओळी आहेत. या ओळी मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी काहीतरी संदेश दिला आहे.

तर चला पाहूया, संत ज्ञानेश्वर यांचा हरिपाठ :

अभंग १:

देवाच्या द्वारांत चारी मुक्ती

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥१॥

हरिनामांत अगणित पुण्य.

हरींमुखें म्हणा हरीमुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥

संसारातच परमार्थ अशीं वेदांची ग्वाही.

असोनि संसारी जिव्हें वेगू करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

द्वारकेचा राणा पांडवांचे घरी.

ज्ञानदेव म्हणे व्यासचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवाघरीं ॥४॥

अभंग २:

वेद, शास्त्रें, पुराणे, हरिलाच गातात.
चहुं वेदी जाण षटशास्त्री कारण । अठराही पुराणें हरीसी गाती ॥१॥
नामाच्या मंथनानें अनंताचे दर्शन
मंथेनि नवनीता तैसा घे अनंता । वाया व्यर्थ कथा सोडी मार्गू ॥२॥
एक हरी आत्मा जीवशिवाय सम आहे,
एक हरी आत्मा जीवशिव समा । वाया तुअं दुर्ग्रमा न घाली मन ॥३॥
हरी हाच वैकुंठ
ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ । भरला घनदाट हरी दिसे ॥४॥

अभंग ३:

त्रिगुण असार आणि निर्गुण सार हा सारासार विचार
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरीपाठ ॥१॥
हरि वाचुन अगुण सगुण निर्गुणांत मन जाते
सगुण निर्गुणे गुणाचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥२॥
आत्मा अवय्क्त असुन चराचराकडुन प्रार्थिला जातो.
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथोनी चराचर हरिसी भजे ॥३॥
मनांतील रामकृष्ण ज्ञानदेवांचे ध्यानीं असुन अनंत जन्मांचे हे पुण्य जोडले
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मोनि पुण्य होय ॥४॥

अभंग ४:

भावांत भक्ती, भक्तींत मुक्ती, आणि मोक्षबळांत सर्वशक्ती एकवटली आहे.

भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती । बळेविण शक्ती बोलो नये ॥१॥

निवांत राहाण्याच्या अभ्यासांनें दैवत त्वरित प्रसन्न होतें

कैसेनि देवंत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वायां ॥२॥

दिननिशी सायास हाच प्रपंच.

सायास करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥

हरिजपानें प्रपंचाचे धरणें सुटतें

ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥

अभंग ५:

योगायोग विधानानें सिद्धी नसुन वाया हा दाभिक धर्म आहे.
 
योगयाग विधी येणे नोहे सिद्धि । वायांची उपाधी दंभ धर्म ॥१॥
 
निःसंदेह देव भावाविना कळत नसुन त्यांचा अनुभव गुरुवाचून येत नाही.
 
भावेविण देव न कळे निःसदेह । गुरुविण अनुभव कंसा कळे ॥२॥
 
तपाशिवाय दैवत, गुरुकृपेवाचुन प्राप्ती आणि गौप्यविना हित नाही.
 
तपेविण दैवत, दिधत्म्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांरो ॥३॥
 
साधुसंगतीत तरणोपाय हाच ज्ञानेश्‍वरामहाराजांचा दुष्टांत
 
ज्ञानदेव सांरो दृष्टांताची मात । साधुचे संगती तरणोपाय ॥४॥
 
 

अभंग ६:

साधुबोधा झाला तो नुरोनिया उरुण अनुभवासकट ठायींच मुरतो
साधुबोध झाला नुरोनिया ठेला । ठायींच मुराला अनुभव ॥१॥
ठायींच समाप्ति झाली त्यावेळी कापुरांची ज्योति पेटली.
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायीच समाप्ती झाली जैशी ॥२॥
मोक्षरेखेवर आलेला साधुचा अंकित असा हरिभक्त भाग्यवान होतो.
मोक्षरेखें आला भाग्यें विनटला । साधुचा अंकिला, हरिभक्त ॥३॥
सत्संगाच्या गोडीनें, सत्समागमानें, जनीं वनीं, आत्मतत्वीं हरीच दिसुं लागला
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी । हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्वीं ॥४॥

अभंग ७:

महापातकी आजन्म अभक्तच रहातो

पर्वताप्रमाणें पातककरणें । वज्‍रलेप होणें अभवक्तासी ॥१॥

मक्तिहिन हरीला न भजणारे दैवहत अभक्त पतित होत.

नाहीं ज्यासी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत देवहत ॥२॥

वाचाळाला देवभेटी कोठुन ?

अनंतवाचाळ बरळती बरळ । त्य कैसेनि दयाळ पावे हरि ॥३॥

ज्ञानेश्‍वर महाराजांना सर्वाघटीं पुर्णत्वानें नांदणारा एक आत्माच प्रमाण आहे.

ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वाघटीं पुर्ण एकनांदे ॥४॥

अभंग ८:

संतसंगतीत मनोमार्गानें श्रीपति आकलन होतो.

संताचे संगति मनोमारों गती । आकळावा श्रीपति येणे पंथे ॥१॥

रामकृष्ण वाचेचा भाव हा जीवांचा भाव असुन शिवाचा रामजप हा आत्मा.

रामकृष्ण वाचा भाव जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥२॥

एकतत्वी नामच अद्वैताचें साधन

एकतत्वी नाम साधितो साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥

नामामृताची गोडी वैष्णवांनीं चाखली असुन योग्यांनी जीवनकळा साधिली.

नाममृत गोडी वैष्णवां लाधली । योगिया साधली जीवनकळा ॥४॥

प्रल्हादाचे ठिकाणी नामोच्चार बिंबला असुन उद्धवाला कृष्णदाता लाधला

सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥

नाम हे जितकें सुलभ तितकेचा दुर्लभ आहे

ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥

अभंग ८:

संतसंगतीत मनोमार्गानें श्रीपति आकलन होतो.

संताचे संगति मनोमारों गती । आकळावा श्रीपति येणे पंथे ॥१॥

रामकृष्ण वाचेचा भाव हा जीवांचा भाव असुन शिवाचा रामजप हा आत्मा.

रामकृष्ण वाचा भाव जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥२॥

एकतत्वी नामच अद्वैताचें साधन

एकतत्वी नाम साधितो साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥

नामामृताची गोडी वैष्णवांनीं चाखली असुन योग्यांनी जीवनकळा साधिली.

नाममृत गोडी वैष्णवां लाधली । योगिया साधली जीवनकळा ॥४॥

प्रल्हादाचे ठिकाणी नामोच्चार बिंबला असुन उद्धवाला कृष्णदाता लाधला

सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥

नाम हे जितकें सुलभ तितकेचा दुर्लभ आहे

ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥

अभंग ९:

विष्णुविण जप हें व्यर्थ ज्ञान

विष्णुविण जप व्यर्थ ज्ञान । रामकृष्णी मन नाहीं ज्यांचें ॥१॥

अद्वय वाठ ज्या करंट्याला सांपडली नाहीं तो रामकृष्ण नामाचे ठिकाणी कसा विराजमान होईल ?

उपजोनि करंटानेणें अद्वयवाटा । रामकृष्णा पंठा कैसेनि होय ॥२॥

गुरुज्ञानावाचुन द्वैताची झाडणी केली म्हणतो त्याला नामसंकीर्तन कसे घडेल ?

द्वैताची झाडणी रारुविण ज्ञान । त्या कैचें कीर्तन घडेल नामीं ॥३॥

नामपाठाने प्रपंचाचें मौन होणें हेंच ज्ञानेश्वरमहारांजांचे सगुणध्य न होय.

ज्ञानदेव म्हणे सगुन हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

अभंग १० :

नामांत चित्त नसेल तर त्रिवेनीसंगमादि तीर्थे करुनही फुकट

त्रिवेणी संगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥

नामाला विन्मुख तो पापी

नामासि विन्मुख तो नर पापिया । हरिविन धांवया न पवे कोणा ॥२॥

पुराणप्रसिद्ध वाल्मिकांनी नाममहिमा गाईला आहे

पुराणप्रासंद्ध बोलिले वाल्मीक । नामें तिही लोक उद्धरीलें ॥३॥

हरिनामाचा जप करतो । त्यांची कुळपरंपरा शुद्ध होय

ज्ञानदेव म्हणें नाम जपे हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥४॥

अभंग ११:

हरि नामोच्चारानें पापांचा क्षणांत क्षय.

हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥

हरी नामजपानें अग्निरुपता

तृण अग्नीं मेळे समरस झालें । तैसें नामे केलें जपता हरी ॥२॥

हरि नामोच्चाराने भूतबाधेची पिछेहाट

हरि उच्चारणीं मंत्र हा अगाध । पळे भूतबाध भय याचें ॥३॥

ज्ञानेश्‍वरमहारांजांचा हरि हा सर्वसमर्थ असुन त्यांचे वर्णन करतानां उपनिषदें थकली

ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

अभंग १२:

तीर्थ व्रतांची भावाविना सिद्धी साधणें ही उपाधी होय.

तीर्थव्रतनेम भावेविण सिद्धी । वायांचि उपाधि करिसी जना ॥१॥

भावेविण नाकळे

भावबळें आकळे येरवीं नाकळे । करतळीं आवळे तेसा हरी ॥२॥

परोपरी यत्‍न करण्यासारखे हे साधन आहे.

परीयाचा रवा घेतां भूमीवरी । यत्‍न परोपरी साधन तैसें ॥३॥

निवृत्तीनाथांनी संपुर्ण निगुण ज्ञानेश्वर महाराज यांचें हातीं दिलें आहे.

ज्ञानदेव म्हणें निवृत्ती निर्गुण । दिधले संपुर्ण माझें हातीं ॥४॥

अभंग १४ :

नित्य सत्य, मित हरिपाठांत जो येतो, त्याकडे कळीकाळासही पहा त्याचे सामर्थ्य नाहीं.

नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥

रामकृष्णी वाचा हेंच महातप.

रामकृष्णो वाचा अनंतराशि तप । पापांचे कळप पळतीं पुढें ॥२॥

शिवाचा हरिमंत्र म्हटल्याने मोक्ष,

हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणता जे वाचा तयां मोक्ष ॥३॥

नारायणनामपाठानें निजस्थान प्राप्त होतें

ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाबिजे उत्तम निजस्थान ॥४॥

अभंग १५:

एक नामच हरी

एक नाम हरी द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥

समबुद्धिनामांत श्रीहरी समान होतो

समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमावरी हरी झाला ॥२॥

देहादेही आणि सर्वा घटीं सहस्त्ररश्मी सुर्यप्रकाश एक रामच आहे.

सर्वाघटीं राम देहादेही एक । सुर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥३॥

ज्ञानेश्‍वरमहारांजांचे चित्तांत हरिपाठाचा नेम असल्याने ते मागले जन्मीच मुक्ती झाले.

ज्ञानदेव चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलीया जन्म मुक्त झालो. ॥४॥

अभंग १६ :

एक नामच हरि

एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥

समबुद्धीनामांत श्रीहारी समान होतो

समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमावरी हरी झाला ॥२॥

देहादेही आणि सर्वां घटीं सहस्त्ररश्मी सुर्यप्रकाशक एक रामच आहे.

सर्वाघटीं राम देहादेही एक । सुर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥३॥

ज्ञानेश्‍वरमहारांजांचे चित्तांत हरिपाठाचा नेम असल्यानें ते मागले जन्मीच मुक्त झाले

ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालो. ॥४॥

अभंग १७ :

हरिपाठ कीति गाणार्‍यात देह पवित्र होतो

हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्र तो होय देह त्याचा ॥१॥

तपाचे सामर्थ्या आमुप आहे.

तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप । चिरंजीव कल्प कोटी नांदे ॥२॥

सर्व गोत्र चतुर्भुज विष्णुरुप झाले

मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होवोनि ठेले ॥३॥

ज्ञानेश्‍वरमहाराजंना निवृत्तिनाथांनी ज्ञान गुढ गम्य दिले.

ज्ञानगुढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधलें

 माझें हातीं ॥४॥

अभंग १८:

हरिवंशपुराण हेच हरिनाम कीर्तन

हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥

नामसंकीर्तन करणार्‍याला वैकुंठ जोडले

त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥

मनोमार्गानें मेला तो मनाला मुकुन हरिपाठी स्थिर झालेला असा घन्य होतो

मनोमागें गेला तो तेथे मुकला । हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥३॥

सर्वकाळ रामकृष्णाचे ठिकाणीं असलेल्या आवडीची गोडी ज्ञानेश्‍वर महाराजांना असुन त्यांना हरिनामाची जोडी झाली.

ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडीं सर्वकाळ ॥४॥

अभंग १९ :

वेदशास्त्रांना प्रमाण असा सारभुत नारायण नामाचा जप आहे. असे श्रुतिवचन आहे.

वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन । एक नाराय्ण सार जप ॥१॥

जप तप धर्म क्रिया, नेम, कर्म हा सर्व श्रम

जप तप धर्म क्रिया नेम कर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥

हरिपाठीं गेले ते निवांत झाले

हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥

ज्ञानेश्‍वर महाराजंचे हाती । हरिनामाचे शस्त्र असल्याने यमानें त्यांचें कुळागोत्र वजं केले

ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वजिंयेलें ॥४॥

अभंग २० :

ज्यांची अनंत पापें गेलीं आहेत अशा वैष्णवांनीं नामसंकीर्तनाची जाड केली.

नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी । पापें अनंत कोडी गेलीं त्याची ॥१॥

अनंतजन्माचे तप एक नाम असुन सर्व मार्गात हरिपाठमार्ग सुगम आहे

अनंता जन्माचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥

योगयागादि सर्व हरिपाठांत लयाला गेले.

योगयागक्रिया धर्मधर्म माया । गेले ते विलया हरिपाठ ॥३॥

हरिवाचुन नेम नाही.

ज्ञानदेवी यज्ञयान क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥

अभंग २१ :

नामास काळवेळ नसुन ते दोही पक्षाचा उद्धार करितें.

काळवेळ नामस्मरणासी नाहीं । दोही पक्ष पाही उद्धरती ॥१॥

रामकृष्ण नाम हें सर्व दोषांचें हरण करणारें असुन जड जीवांचा तारण एक हरिच आहे.

रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण । जड जीवां तारण हरी एक ॥२॥

या नामाच्या जिव्हेत हरिनाम सर असुन त्याचें महात्म्य कोण जाणेल ?

हरिनामसार जिव्हां या नामाची । उपमा त्य देवांची कोण वानी ॥३॥

पुर्वजांना ज्या योगानें वैकुंठमार्ग सोपा झाला तो हरिपाठ ज्ञानेश्वरमहाराजांनी सांग केला

ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ । पुर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥

अभंग २२ :

नित्यनेम नामीं तो दुर्लभ असुन त्याच्याजवळ लक्ष्मीवल्लभ वास्तव्य करतात

नित्यनेम नामीं तो प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयाजवळी ॥१॥

नारायण हरिनामाचा जप करणार्‍याचे घरीं चारी भुक्तीमुक्ती असतात

नारायण हरि नारायण हरि । भुक्तिमुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥

हरि वांचुन जन्म तो नरक असुन जन्मलेला प्राणी यमाचा पाहुणा होतो

हरिविण जन्म नरकवि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥

निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्‍वरमहाराजंना गगनाहुन वाड नाम आहे असें सांगितले.

ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहोनि वाड नाम आहे || ४ ||

अभंग २३ :

सर्व तत्त्वांच्या मेळाव्यांत एकतत्त्वी कळां दाखविणारा हरी आहे

सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्वीं कळा दावी हरी ॥१ ||

नाम हें सर्व मार्गत श्रेष्ठ असुन त्याला कष्ट पडत नाहीत

तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥

प्राणाचा उलट साधणें हाच अजपाजप.

अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंही मनाचा निर्धारु असे ॥३॥

ज्ञानेश्वरमहारांजांनी रामकृष्णी नामाच पंथ आक्रमण केला

ज्ञानदेव म्हणे नामविण व्यर्थ । रामकृष्ण पंथ क्रमियेला ॥४॥

अभंग २४:

सर्वांघटी राम हाच शुद्ध भाव असुन त्याला घरुनच जपतपदि क्रिया आहेत

जपतप कर्मक्रिया नेम धर्म । सर्वाघटीं राम भाव शुद्ध ॥१॥

संदेह टाकणें म्हणजे भाव धरणें व तें साध्य करण्याकरितां रामकृष्णाचा नित्य टाहो फोडला पाहिजे.

न संडी रे भावो टाकी रे संदेहो । रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥२॥

कुळांत गोतांत फार काय जातीतही शीलाही मात भावनायुक्त मजकानें त्वरित केली पाहिजे

जात वित्त गोत कुळशील मात । भज कां त्वरित भावनायुक्त ॥३॥

मनांतील रामकृष्ण ज्ञानेश्वरमहारांजांचे ध्यानीं असुन त्यांनीं वैकुंठांत घर केले.

ज्ञानदेवा ध्यांनीं रामकृष्ण मनीं । तेणें वैकुंठभुवनीं घर केलें ॥४॥

अभंग २५ :

नामोच्चारांत जाणीव नेणीव लयास जाणें याचें नांव मोक्ष.

जाणीव नेणीव भगवंती नाहीं । उच्चारणी पाही मोक्ष सद्दा ॥१॥

जेथे कळिकाळाच रीव नही तोच नारायण हरि नामोच्चर

नारयण हरि उच्चार नामाचा । तेथें काळीकाळाचा रीघ नाहीं ॥२ ||

सर्वव्यापी भगवंतंचे प्रमाण वेदांनांही कळले नाहे, मग तें जीव जंतुना कोठुन कळणार ?

तेथील प्रमाण नेणवे वेदाशीं । ते जीवजंतुसी केवि कळे ॥३॥

या अभ्यासाचें फळ नारायणापाठ असुन त्या योगानें ज्ञानेश्वर महा राजांनी सर्वत्र वैकुंठ केले.

ज्ञानदेवा फळ नारायणपाठ । सर्वत्र वैकुठ केले असें ॥४॥

अभंग २६ :

एकतत्वनाम असुन त्यानेंच हरीला करुणा येईल

एक तत्वनाम दृढं धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥१॥

सदगदितवाचेने नाम जपावें

तें नाम सोपा रे रामकृष गोविंद । वाचेसि सदगद जपे आधी ॥२॥

दुसर्‍या पंथाला जाऊं नको

नामापरते तत्त्व नाही रें अन्यथा । वांया आणिका पंथा जाऊं नको || ३॥

ज्ञानेश्वर महाराजांचे अंतःकरणांत मौनाची जपमाळ असुन त्याला घरुन त्यांनी सतत हरिनामाचा जप केला

ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीं । धरोनी श्रीहरी जपे सदां ॥४॥

अभंग २७ :

सर्व सुखाची गोडी साही शास्त्रांत निवड आणि अर्धघडीही रिकाम राहुं नको.

सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहुं नको ॥१॥

लटिका व्यवहार हाच सर्व संसार असुन हरिवांचुन येरझार फुकट

लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥

रामकृष्णी संकल्पात्मक नाममंत्रजपाच्या कोटींने पाप जाईलच

जाईल नाममंत्रजप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरुनि राहे ॥३॥

सर्व माया तोडली असतां निजवृत्ति रहाते म्हणुन इंद्रियांच्या सवडीत विषयरुप होऊन लपु नकोस

निजवृत्ति काढी सर्व माया तोडी । इंद्रिया सवडी लपुं नको ॥४॥

तीर्थव्रतांचे ठिकाणी भाव धरून, करुनायुक्त होऊन, दया व शांति या गुणांने हरीला आपलासा कर.

तीर्थव्रतीं भाव घरी रे करुना । शांती दया पाहुना हरि करी ॥५॥

निवृत्तिदेवी ज्ञान हेंच महाराजांना प्रमाण असुन हरिपाठ हा समाधेसर्ज वन आहे.

ज्ञानदेव प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥

अभंग २८:

हरिपाठाचे हे २८ अभंग ज्ञानेश्‍वरमहाराजांनी मोठ्या विश्‍वासानें रचले आहेत.

अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वांसे ज्ञानदेवें ॥१॥

नित्यापाठ इंद्रायणी करी तो अधिकारी होईल

नित्यपाठकरीं इंद्रायणीं तीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥

स्वस्थ चित्त असावें

असावें स्वस्य चित्त एकाग्र मन । उल्हासें करुन स्मरण जीवीं ॥३॥

नेमनिष्ठ भाविकला अंतर्बाह्म अंतकाळी व संकटकाळीं हरीच सांभाळील

अंतकळीं तैसा सकटांचे वेळीं । हरी तया संभाळी अंतर्बाह्य ॥४॥

संतसज्जनांनी या ज्ञानाची प्रचीति घेतली, पण आळशी मंदमती कसा तरेल ?

संतसज्जनांनी घेतली प्रचेति । आळशी मंवमति केवि तरे ॥५॥

श्रीगुरुनिवृत्तिनाथांचे प्रमळ वचन श्रवण करुन ज्ञानेश्वर महाराज तत्काळ संतुष्ट झाले.

श्रीगुरुनिवृत्तिवचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥

अभंग २९ :

सदगुरु सांवळा धरोनियां सोवळा ।

बापरखुमादेवविरु सदगुरु सांवळा ॥१॥

पाहिला म्यां डोळां पाहिला म्यां डोळा ।

घननीळा सांवळा पाहिला म्यां डोळां ॥२॥

चंद्रशेखराला आनंद मनाला ।

नये सांगायाला ज्याचा त्यासी ॥३॥

श्री गणाधिपति पञ्चरत्न स्तोत्रम्

ॐ सरागिलोकदुर्लभं विरागिलोकपूजितं सुरासुरैर्नमस्कृतं जरापमृत्युनाशकम् ।

गिरा गुरुं श्रिया हरिं जयन्ति यत्पदार्चकाः नमामि तं गणाधिपं कृपापयः पयोनिधिम् ॥ १ ॥

गिरीन्द्रजामुखाम्बुज प्रमोददान भास्करं करीन्द्रवक्त्रमानताघसङ्घवारणोद्यतम् ।

सरीसृपेश बद्धकुक्षिमाश्रयामि सन्ततं शरीरकान्ति निर्जिताब्जबन्धुबालसन्ततिम् ॥ २ ॥

शुकादिमौनिवन्दितं गकारवाच्यमक्षरं प्रकाममिष्टदायिनं सकामनम्रपङ्क्तये ।

चकासतं चतुर्भुजैः विकासिपद्मपूजितं प्रकाशितात्मतत्वकं नमाम्यहं गणाधिपम् ॥ ३ ॥

नराधिपत्वदायकं स्वरादिलोकनायकं ज्वरादिरोगवारकं निराकृतासुरव्रजम् ।

कराम्बुजोल्लसत्सृणिं विकारशून्यमानसैः हृदासदाविभावितं मुदा नमामि विघ्नपम् ॥ ४ ॥

श्रमापनोदनक्षमं समाहितान्तरात्मनां सुमादिभिः सदार्चितं क्षमानिधिं गणाधिपम् ।

रमाधवादिपूजितं यमान्तकात्मसम्भवं शमादिषड्गुणप्रदं नमामि तं विभूतये ॥ ५ ॥

गणाधिपस्य पञ्चकं नृणामभीष्टदायकं प्रणामपूर्वकं जनाः पठन्ति ये मुदायुताः ।

भवन्ति ते विदां पुरः प्रगीतवैभवाजवात् चिरायुषोऽधिकः श्रियस्सुसूनवो न संशयः ॥

ॐ ॥ ॥ इति दक्षिणाम्नाय श्रिङ्गेरी श्रीशारदापीठाधिपति शङ्कराचार्य जगद्गुरुवर्यो

श्री सच्चिदानन्द शिवाभिनव नृसिंहभारती महास्वामिभिः विरचितम्

श्री गणाधिपति पञ्चरत्न स्तोत्रम् सम्पूर्णम् ॥

मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण ,

संपूर्ण हरिपाठ मराठी मधून पाहिला आहे.

haripath dnyaneshwar maharaj katha marathi madhe

नक्कीच आपल्याला आवडली असेल.

Haripath Marathi audio download mp3 मध्ये करू शकता तसेच pdf Marathi मध्ये लवकरच उपलब्ध होईल.

dnyaneshwar haripath in marathi lyrics या पोस्ट मध्ये मिळाल्या असतील अशी मी आशा करतो.

हे पण नक्की वाचा :- 

मराठी मध्ये आरती संग्रह

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *