History Of LPG Gas Marathi (एलपीजी विषयी माहिती)
नमस्कार मित्रहो,
पूर्वीच्या काळी लोक आपल्या घरामध्ये स्वयंपाक करायला चुलीचा वापर करत असत मात्र जसं जसं देश सुशिक्षित झाला तसे लोकांना चूल वापरायची कमी केली.
चुलीमुळे घरातील गृहिणीला त्रास होत असे त्याचप्रमाणे पर्यावरणाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. आपल्या शेतमधील झाडे तोडून लोकांना चुली पेटवाव्या लागत असत.
त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये(घरगुती गॅस सिलेंडर) एलपीजी गॅस चालू करण्यात आला होता.
आज मी या पोस्ट मध्ये आपल्याला एलपीजी सिलेंडर विषयी माहिती सांगणार आहे.
आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये एलपीजी गॅस फार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. जर एखाद्याच्या घरातील गॅस संपले आपली तारांबळ उडते, आपल्याला समजत नाही आपल्या बिझी शेड्युलमधून आपण गॅस बुकिंग कसे करावे केव्हा गाडी येईल असे भरपूर प्रश्न आपल्याला नेहमी असतात.
पण आपण कधी माहिती करून बघितले एलपीजी सिलेंडर चा इतिहास काय आहे ??हा सिलेंडर कोणी बनवला??पहिले वितरण कुठे झाले??असे भरपूर प्रश्न असतात ज्याची उत्तरे आपण कायम शोधत असतो या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी हा ब्लॉग तयार केला आहे.
एलपीजी काय आहे?
एलपीजी हे ज्वलनशील हाइड्रो कार्बन चे मिश्रण आहे.एलपीजी रोजच्या दैनंदिन जीवनात आपण ज्वालनासाठी वापरत असतो. याचा वापर आपण जेवण करताना किंवा गाड्यांमध्ये पण करू शकतो.एलपीजीचा वापर chloroflurocarbon च्या ऐवजी शीतगृह मध्ये केला जातो. एलपीजी प्रोपिन आणि ब्युटेन अश्या दोन घटकांपासून बनला आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की एलपीजी हा गॅस आहे तर तुम्ही चुकीचे म्हणत आहात कारण एलपीजी हे एक द्रव पदार्थ आहे आणि ते लोखंडाच्या टाकीमध्ये भरले जाते नंतर तर प्रत्येकाच्या घरी पोहचवले जाते. त्यावेळी ते द्रवरूप मध्ये असते.
उकळत्या बिंदू खोलीच्या तपमानापेक्षा कमी असल्याने, एलपीजी सामान्य तापमान आणि दबावांवर त्वरीत बाष्पीभवन होईल आणि सामान्यत: दाबलेल्या स्टीलच्या जहाजांमध्ये पुरवले जाते. ते विशेषत: समाविष्ट असलेल्या द्रव थर्मल विस्तारास परवानगी देण्यासाठी त्यांच्या क्षमतेच्या ८०-८५% भरले जातात. वाष्पीकृत वायूच्या द्रव आणि द्रवीभूत वायूमधील प्रमाण रचना, दाब आणि तपमानानुसार बदलते, परंतु साधारणत: २५०:१ च्या आसपास असते. ज्या दाबावर एलपीजी द्रव होतो, त्याला वाष्प दाब म्हणतात, त्याचप्रमाणे रचना आणि तपमानानुसार बदलते; उदाहरणार्थ, शुद्ध ब्यूटेनसाठी २० डिग्री सेल्सियस (६८ ° फॅ) पर्यंत अंदाजे २२० किलोपास्कल्स (३२ पीएसआय), आणि ५५ डिग्री सेल्सियस (१३१ फॅ) शुद्ध प्रोपेनसाठी अंदाजे २,२०० किलोपास्कल्स (३२० पीएसआय) आहेत. एलपीजी नैसर्गिक वायूपेक्षा हवेपेक्षा जड असते आणि अशा प्रकारे मजल्यांसह वाहते आणि तळघरांसारख्या कमी ठिकाणी बसू शकते.
एलपीजी गॅस चा शोध कोणी लावला??
एलपीजी गॅस डॉ. वॉल्टर स्नेलिंग यांनी सन १९१०ला लावला. आणि सन १९१२ पासून त्यांनी एलपीजी विकायला सुरुवात केली.हे सध्या वापरलेल्या सर्व उर्जेपैकी सुमारे 3% उर्जा पुरवते आणि काजळी नसलेली आणि गंधक उत्सर्जन नसलेल्या तुलनेने स्वच्छतेने जळते.
एलपीजी सुरुवात कोठे झाली??
आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून फार आनंद होईल कारण एलपीजीची सुरुवात सन १९५५ महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे करण्यात आले होते बर्मा ऑइल कंपनी मार्फत, मात्र LPGचे वितरण सण 1965 ला कोलकाता मध्ये चालू करण्यात आले ते म्हणजे Indian ऑइल या कंपनी कडून,त्यांच्याकडे जवळपास 9.8 कोटी लोकांचे वितरण करायचे काम आहे.ज्यावेळी कंपनी चालू झाली तेव्हा 2000 लोकांचे वितरणाचे काम होते त्यामध्ये कोलकाता व पाटणा यांचा समावेश होता.
एलपीजी चा फुल फॉर्म काय आहे??
लिक्विड पेट्रोलियम गॅस हा एलपीजीचा फुल फॉर्म आहे. एलपीजी चा शोध सण १९१०ला लागला. एलपीजीचा शोध डॉ. वॉल्टर स्नेलिन यांनी लावला.
अधिक माहिती :-
हि गोष्ट फोर्ड कंपनीच्या मालकानं समजली त्यांनी डॉ. वॉल्टर स्नेलिन यांना आपल्या घरी बोलवले व त्या नंतर त्यांना असं निदर्शनाला आलं कि त्यांनी आणलेल्या बाटलीत अर्धाच पेट्रोल होता.त्यांनी म्हटलं अर्धा गेला कुठे?? त्यांनी म्हटलं आपण हि बातमी सरकार सांगू नाहीतर लोकांची फसवणूक होईल.मग त्यांनी एक प्रयोग केला एका बाटलीत गॅसोलीन पूर्ण भरून घेतले व पहिले तर काही वेळेनंतर त्या मध्ये गॅसोलीन अर्धे झाले होते. मग त्यांनी प्रयोगशाळेतील काही सामग्रीचा वापर करुन गॅस वेगळा केला हाच तो LPG गॅस.
American Gasol Company :-
डॉ. वॉल्टर स्नेलिन यांनी American Gasol Companyची सुरुवात केली व आपल्या देशामध्ये LPGचे वितरण सुरु केले.
एलपीजी चे एकूण किती ग्राहक आहेत??
सन २०१८ च्या माहितीनुसार १९५५ ते २०१४ पर्यंत भारतामध्ये जवळपास १३ करोड एलपीजीचे ग्राहक आहेत. गेल्या ६० वर्षांमध्ये भारतामध्ये तब्बल ५५ टक्के घरांमध्ये एलपीजी कनेक्शन आहे. मात्र भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सन २०१६ मध्ये ही संख्या शंभर टक्के करण्यासाठी अंत्योदय योजना, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री उज्वला योजना देखील राबवण्यात आली होती. या योजनेनुसार भारतामध्ये ज्या घरांमध्ये एलपीजी सिलेंडर नाही आहे त्या घरांमध्ये अनुदानित पद्धतीने सिलिंडरचे वितरण करण्यात आले होते.त्यानुसार सन २०१८ पर्यंत जवळपास २३ करोड लोकांना नवीन कनेक्शन देण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे सन २०१४ पासून जवळपास दहा करोड नवीन एलपीजी कनेक्शन साठी अर्ज आले आहेत.
एलपीजी गॅसचा उपयोग कोठे केला जातो?
जसं कि आपल्याला माहिती आहे कि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एलपीजी गॅस उपलब्ध आहे त्यामुळे त्याचा उपयोग कोठे होतो हे आपल्याला माहितीच असेल मात्र मी काही अश्या बाबी सांगणार आहे कि ज्या तुम्हाला माहिती नसतील.
- जेवण बनविण्याकरिता :- आपल्याला सर्वाना माहितीच आहे कि घरगुती गॅसचा वापर जेवण करण्यासाठी केला जातो. गॅस वरती जेवण केल्यामुळे ते लवकर बनते व आपल्या वेळेची बचत होते.
- इंधन :- एलपीजीचा वापर अनेक ठिकाणी गाड्यांचे इंधन म्हणून केले जाते. अनेक देशामध्ये गॅस वरती चालणारे वाहने तयार केली आहेत. या वाहनामध्ये पेट्रोल, डिझेल ऐवजी एलपीजी वापरले जाते.
- पेट्रोल संपादनात रूपांतर:-पेट्रोल रूपांतर अल्कीलेटमध्ये केले जाऊ शकते जे प्रीमियम पेट्रोल ब्लेंडिंग स्टॉक आहे कारण त्यात अपवादात्मक अँटी-नॉक गुणधर्म आहेत आणि स्वच्छ बर्निंग देते.
- शीतकरण:- आपण एलपीजीचा वापर शीतकरण करण्यासाठी करू शकतो.मूलतः ज्वलनशील रेफ्रिजंट वाहून नेण्यासाठी तयार केलेल्या यंत्रणेत ज्वलनशील हायड्रोकार्बन्स वापरल्याने आग किंवा स्फोट होण्याचा महत्त्वपूर्ण धोका दर्शविला जातो अशा कारणास्तव मोटार वाहन वातानुकूलन यंत्रणेत अशा प्रतिस्थानाचा व्यापकपणे निषिद्ध किंवा निरुत्साह आहे.
एलपीजी गॅसचे बुकिंग कसे करावे?
एलपीजी गॅस पुरवणारे अनेक कंपनी भारतामध्ये आहेत या कंपनीच्या मार्फत आपण घरबसल्या कोणत्याही कंपनीचे गॅस बुकिंग करू शकतो.
- एच पी गॅस:- तर चला पाहूया आपण कशा रीतीने गॅस बुकिंग करू शकतो.जर आपले एचपी गॅस असेल तर आपण या लिंक वरती क्लिक करून बुकिंग करू शकता. या लिंक वर क्लिक करून आपल्या समोर एक पेज ओपन होईल त्या मध्ये आपल्याला आपला एच पी मध्ये रजिस्टर असलेला मोबाईल नंबर देवून कॅपचा भरावा लागेल व आपले गॅस बुक होईल व आपल्या मोबाईल वर मेसेज येईल.त्यावरून आपण समजू शकतो की आपले गॅस सिलिंडर बुक झाले की नाही.
- इंडियन गॅस :-जर आपल्याला इंडियन गॅस मध्ये बुकिंग करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करावे लागेेल. त्या नंतर आपल्या समोर आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा लागणार व आपले गॅस बुक करावे लागेल.
- भारत गॅस:- भारत गॅस मध्ये बुक करण्यासाठी आपल्याला खालील लिंक वरती क्लिक करावे लागेल. या लिंक वर क्लिक करा त्या नंतर आपल्याला तेथे आपल्याला रजिस्ते्टर केलेला नंबर टाकून आपल्या खाात्यावर जाऊन गॅस बुक करावे.
About this post:-
या पोस्ट मध्ये आपण पाहिले की घरगुती गॅस म्हणजे काय?
एलपीजी गॅस चा शोध कोणी लावला??एलपीजी सुरुवात कोठे झाली??एलपीजी चा फुल फॉर्म काय आहे??एलपीजी चे एकूण किती ग्राहक आहेत?एलपीजी गॅसचा उपयोग कोठे केला जातो?एलपीजी गॅसचे बुकिंग कसे करावे?
या प्रश्नांची उत्तर पाहिले आहे.
जर आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांना शेअर करा व कमेंट पण करून सांगा.
हे पण वाचा :