रायगडविषयी माहिती जाणून घेऊ मराठीमध्ये(Information about raigad fort in marathi)

All information about Raigad(रायगड के बारे मे पूरी जानकारी)

रायगड(स्वराज्याची राजधानी) विषयी माहिती जाणून घेऊI(nformation about raigad fort in marathi).
रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा म्हटला तरी वावगं ठरणार नाही. आपण सर्व महाराष्ट्रीयनच काय तर सर्व भारतीय जनतेला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती आहे. तरी आपण गर्वाने बोलू “छत्रपती शिवाजी महाराज की जय“.
Information about Raigad in Marathi
शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे रायगड
महत्वपूर्ण का थोडक्यात जाणून घेऊया(Information about Raigad):-
रायगड किल्ल्याची स्थापना सण १०३०ला झाली.जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्याकडे हा किल्ला होता. त्यावेळी या किल्ल्याचे नाव ‘रायरी’ होते. पण ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याकडे पाहिले त्या वेळी त्यांना वाटले कि हा किल्ला आपल्या स्वराज्या मध्ये सामील झाला पाहिजे.म्हणून त्यांनी जावळीच्या चंद्रराव मोरे यांना पत्र लिहिले व सांगितले “चंद्रराव आपण दोघांनी मिळून स्वराज्य निर्माण करू.”पण चंद्रराव मोर्‍यांनी महाराजांना उलट उत्तर दिले म्हटले तुम्ही घेतले राजे आम्हीच राजे, तुम्ही या जावळी कडे पाहू नका.त्यानंतर शिवाजीमहाराजांनी दिवस ठरवला व आपल्या १५४ मावळ्यांसह जावळीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हनुमंतराव मोरे मारले गेले.मात्र १६५६ मध्ये चंद्रमरे शिवाजी महाराजांना शरण आल्यावर रायरीचा डोंगर शिवाजी महाराजांनी काबीज केला.व त्यानंतर आपल्या सरदार हिरोजी इंदुलकर यांना सांगून शिवाजी महाराजांनी या गडाची पुनर्बांधणी केली. मात्र पुनर्बांधणी करताना शिवाजी महाराजांनी सरदार हिरोजी इंदुलकर यांना काही ठिकाणीच बांधणी करायला सांगितले त्यावेळी ते म्हटले की एवढा मोठा किल्ला त्यावर फक्त काही मोजकेच ठिकाणी म्हणून ते आपल्या गावी परत गेले तेथे त्यांनी आपली जमीन विकली व मुद्रा घेऊन परत रायगडाकडे आले.तेथे त्यांनी ३०० इमारती १४ तलाव व ८४ पाण्याच्या टाक्‍या तयार केल्या व हे सर्व तयार करायला त्यांना १४ वर्षे लागली.आणि ६ जून १६७४ रोजी हा किल्ला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी तयार झाला.थोडे १६८९ला औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व परत मराठ्यांनी १७०७ला परत जिंकून घेतला.परत १८०८ मध्ये जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी हा किल्ला आपल्या नावावर करून घेतला. परंतु १९४७ नंतर ही वास्तू परत महाराष्ट्राकडे आली.

रायगडावर कसे जायचे(How to go Raigad Fort)??

जर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट वापरत असाल तर तुम्हाला महाडपर्यंत यायला भेटेल. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजता निजामपूर गावाकडे जायला तुम्हाला बस भेटेल.ती तुम्हाला पाचाड गावा पर्यंत घेऊन जाईल. तेथून रायगड पायी फक्त दहा मिनिटांवर आहे.रायगडावर जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे रोपवे द्वारे जाणे आणि दुसरा मार्ग म्हणजे चित्ता दरवाजाने गडावर जाणे रुपये जाण्यासाठी एका १८६ रुपये तर दोन्ही वेळेसाठी ३०० रुपये लागतात.रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी पंधराशे ते सोळाशे पायऱ्या चढाव्या लागतात.

जिजाऊंचा राजवाडा व समाधी(Jijamata Statue and Palace):-

पाचाड कडून रायगडाकडे जात असताना डाव्या हाताला असलेला एक वळण येते तेथून दोन किलोमीटर अंतरावर जिजाऊंचा राजवाडा जिजाऊंची समाधी आहे. जिजाऊंच्या समाधी कडे जाताना आपल्याला राजवाडा डाव्या हाताला दिसतो.जिजाऊंना रायगडावरचा हवामान मानवत नव्हते म्हणून त्यांना पाचाड गावातच राहायची सोय केली होती.
समाधीच्या आजूबाजूला बाग आहे.

वाघबिळे पॉईंट(Vaghbile Point):-

पाचाड गावाहून रायगड कडे जाताना डाव्या साईडला आपल्याला दोन  वाघबिळे दिसतात. ही दोन वाघबिळे रायगडच्या ४५ पॉईंट पैकी एक आहे.

खुबलढा बुरूज (khubladha buraj):-

रायगड ला जाताना आपल्याला पहिल्यांदा खुबलढा बुरूज आढळून येतो. या बुरुजावरुन पुढे गेल्यानंतर आपल्याला वाळूसरे खिंड लागते.
चित्त दरवाजा कडून एक रस्ता नाने दरवाजा व मशीद मोर्चा यांच्याकडे जातो.

नाणे दरवाजा (Nane Darvaja):-

नाने दरवाजापाशी सुंदर असे नक्षीकाम केले आहे त्याचप्रमाणे या दरवाजाच्या जवळच एक मारुतीचे मंदिर आढळून येते.
नाणे दरवाजापासून थोडसं पुढे आल्यानंतर आपल्याला दगड असून पाण्याची टाकी तयार केले आहे ते दिसून येते.

मशीद मोर्चा (masjid morcha):-

मशिद मोर्चा आल्यानंतर आपल्याला एक तोफ दिसून येते त्याचप्रमाणे येते एक मशीद आढळून येते यावरून समजते की शिवाजी महाराज कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हते.
येथून मुख्य दरवाजाकडे जातांना आपल्याला गडाला असलेली तटबंदी दिसून येते.

महाद्वार किंवा मुख्य दरवाजा (mukhya darvaja/main gate):-

रायगडच मुख्य दरवाजाची निर्मिती करताना 90 अंशत आहे कारण जरी शत्रुला मुख्यदरवाजा वर हल्ला करायचा असेल तर त्याला ते करणे अवघड जावे सहजासहजी मुख्य दरवाजा भेदू नये.

हत्ती तलाव (Hatti Lake):-

महादरवाज्यापासून थोड्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला हत्ती तलाव दिसून येतो. तसेच वागा बजुदा हनुमान टाकी हा पॉईंट आहे. तिथून थोडे वर येताच आपल्याला उजव्या हाताला शिर्काई देवीचे मंदिर लागते.

हत्ती खाना(Hatti Khana):-

हत्तीखाना मध्ये त्यावेळी गडावरच्या हत्ती ठेवले जात होते मात्र त्याचे आता रूपांतर आर्किऑलॉजी डिपारमेंट मध्ये झाले आहे.

होळीचा माळ(Holicha Mal):-

हत्तीखाना समोर होळीचा माळ आहे या ठिकाणी पूर्वीच्या काळी होळी खेळण्यासाठी याचा वापर केला जात असे. त्याकाळी त्याठिकाणी होळी खेळली जात असे त्यावेळी शिवाजी महाराज ठिकाणी होळीमध्ये नारळ टाकायचे आणि अट लावायचे की,”जो या होळी मधील नारळ काढून देईल त्याला माझ्या हातातील सव्वा किलो सोन्याचे कडे मिळेल.”आणि हा पराक्रम फक्त शिवपुत्र संभाजीराजे यांनीच केला होता. होळीच्या माळावर शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा ठेवलेली आहे.
होळीच्या माळावर कडून नगरखानाकडे जाताना आपल्या डाव्या बाजूला एक वळण लागते त्या वाहनाच्या पुढे आपल्याला वाडेश्वर मंदिर,वाघ दरवाजा, बारा टाकी आणि कृष्णावात तलाव पहायला मिळेल.
होळीच्या माळावरून आपण पुढे गेल्यास किल्ल्याच्या पश्चिम बाजूला जाऊ शकतो.

वाघदरवाजा(Vagh Door):-

वाढदिवसाच्या मंदिरानंतर थोड्याच अंतरावर खाली त्याला वाघ दरवाजा दिसून येतो.वाघदरवाजा कडून आपण 12 टाकी पॉइंट कडे सुद्धा जाऊ शकतो. वाघदरवाजा वरती आपल्याला पहारेकऱ्यांना उभारण्यासाठी कक्ष दिसून येतात.

बारा टाकी (Bara Taki):-

या ठिकाणी आपल्याला वेगळ्या आकारामध्येअसणारा बारा टाक्या दिसून येतात.

नगारखाना (Nagarkhana):-

राज दरबारामध्ये जाण्याच्या अगोदर किल्ल्याच्या भागामध्ये आपल्याला नगारखाना दिसून येतो. त्यावेळी येते नघाडे व चौघडे वाजवण्यात येत असत.ते वाजवल्यानंतर गडावरचे सर्व दरवाजे बंद करण्यात येत असत.
नगारखान्यात प्रवेश करताच त्यासमोर आपल्याला शिवाजी महाराजांचे दुसरी प्रतिमा दिसून येते. तिची जागा ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला.

टेहळणी बुरुज (Tehalni Buruj):-

टेहळणी बुरुज आला एकूण एकवीस खिडक्या आहेत. याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शत्रूवर टेहळणी करण्यासाठी करत असत.टेहळणी बुर्ज्याच्या समोर आपल्याला गंगासागर तलाव आहे.

गंगासागर तलाव (Gangasagar Talao):-

टेहळणी बुरूज समोरच गंगासागर तलाव आहे. ज्यावेळी गडाची बांधणी चालू होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी म्हंटले की गडाची निर्मिती करताना गडावरचा दगड वापरला जावा यावेळी तलावांची निर्मिती केली त्यामध्ये गंगासागर हा एक प्रमुख तलाव या तलावाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे महाराज्यांच्या राज्यभषेक सोहळ्याला भारतातील ७ नद्यांचे पाणी आणले होते आणि त्यामधील उरलेले पाणी या तलावामध्ये सोडण्यात आले होते. त्यामुळे आजतागायत या तलावातील पाणी अटत नाही.

खलबतखाना (Khalbatkhana):-

खलबतखाना म्हणजे काय असेल?? शिवाजी महाराजांनी आपल्या चर्चेसाठी एक गुप्त इमारत तयार केली होती.ही एक दहा बाय पंधराची खोली दिसते वरून मात्र त्याच्या आत मध्ये भरपूर काही आहे.खलबतखाना मध्ये जाण्यासाठी आपल्याला खोलीच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या पायऱ्या खाली उतरावे लागतात. त्याचप्रमाणे महाराजांचे गुप्तचर बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी याठिकाणी येत असत.

सचिवालय(Secretariate):-

रायगडावर आपल्या सचिवालय देखिल दिसुन येईल, राज्यातील कोणत्या प्रकारचा न्यायनिवाडा असो किंवा कोणत्याही प्रकारची युद्धासाठी ची तयारी असो या ठिकाणी केली जात असे.किल्ल्यावरील एक मोठी वास्तू आहे.

राजमहाल(King Palace):-

सचिवालयात पासून थोड्या अंतरावर शिवाजी महाराजांचा राजमहाल दिसून येतो. या वास्तूमध्ये शिवाजी महाराज राहत होते.इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार पूर्वी हा राज महाल 2 मजली होता त्यामध्ये सुंदर नक्षीकाम,सागाच्या लाकडाची खांब, झालर, फुले असायची.
राजमहालाच्या जवळच महाराजांचे सौचालय व स्नानगृह आहे.त्याचप्रमाणे तिथे एक बुरुज दिसतो त्या बुरुजावरुन महाराज आपल्या किल्ल्याची टेहळणी करत असायचे.

टाकसाळ(Coin Mine):-

राजमहालाच्या समोरच शिवाजी महाराजांची मुद्रा बनवण्याची वास्तू म्हणजे टाकसाळ आहे. येथे सोन्याची नाणी,राजमुद्रा व शिवराई बनवण्यात येत असत.

किल्ल्यावरील राणीमहाल/अंतापुर(Antapur):-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ बायका होत्या त्यापैकी सईबाई शिवाजी महाराजांच्या सोबत राहायचे सोयराबाई जिजाऊंचे सेवेसाठी पाचाड मध्ये राहायच्या.तशा खोलीमध्ये पहिलाचा उत्तरा म्हणजे त्यांचा हॉल व दुसरा म्हणजे त्यांची बेडरूम.याठिकाणी ही शौचालय व स्नानगृह आहे.

मेना दरवाजा(Mena Door):-

राणी महालच्या जवळच मेना दरवाजा दिसून येतो आणि किल्ल्यावरील सईबाई फेरफटका मारण्यासाठी जात असेल त्यावेळी या दरवाज्यातून बाहेर जात असे त्यामुळे या दरवाजाला मेना दरवाजा असे म्हटले जाते.

दासी महाल(Servent Quarter):-

मेना दरवाजाला लागूनच दासी महाल दिसून येतो,दासी महालामध्ये गडावरील सर्व दास्या असायच्या. राणीच्या दास्या यांची राहण्याची जागा.
मेना दरवाजाच्या समोरच आपल्याला रोपवे दिसून येतो.

हिरकणी बुरुज (Hirkani Buruj):-

मेना दरवाजाच्या थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला हिरकणी बुरुज दिसून येतो.
या बुरुजाला हिरकणी बुरुज का म्हणतात??
यासाठी एक गोष्ट आहे ती गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती आहे,
किल्ल्याच्या पायथ्यावर वालुसरे नावाचे गाव आहे. या गावांमध्ये हिरकणी माता राहत होती, ती दिवसभर गडावरती ताक विकायला यायची एके दिवशी गडावरील दरवाजे बंद झाले मात्र ती गडावरच राहिली व तिचे एक छोटेसे बाळ होते.”मला घरी जाऊ द्या” अशी विनंती गडावरील सर्व मावळ्यांना करत होती मात्र कोणीही तिची विनवणी ऐकली नाही मग शेवटी तिने त्या बुरुजावरून आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला व ती बुरुज उतरून आपल्या घरी गेली.पुढच्या दिवशी शिवाजी महाराजांनी तिला आपल्या राजमहाला मध्ये बोलावले व तिचा सत्कार केला तिने विचारले महाराजांना की महाराज तुम्ही माझा सत्कार केला त्यावेळी महाराजांनी सांगितले की तू शत्रूला गडावर येण्यासाठी जो मार्ग कोणत्याही मावळ्याला माहिती नव्हता तू दाखवून दिला त्यामुळे आपल्या गडाची सुरक्षितता आणखी वाढेल.
यामुळे त्याने त्या बुरुजाला हिरकणी बुरूज असे नाव दिले आणि ती ज्या गावांमध्ये राहत होती त्या गावाचं नाव हिरकणी वाडी असे ठेवण्यात आले.

अष्टप्रधान वाडे व धान्याचे कोठार:-

हिरकणी बुरुजावरुन मेना दरवाजा पुढे आल्यानंतर त्याच्यापुढे आपल्याला अष्टप्रधान वाडे व धान्यकोठार दिसून येते.
धान्याच्या कोठ्या वर आल्यानंतर तेथे आपल्याला जाळ्या टाकलेले तीन खोल्या दिसून येतील ज्या जमिनीमध्ये आत आहेत.
या धान्य कोठारांमध्ये शत्रू जरी पाच ते सहा महिने किल्ल्याला वेढा घालून बसला तरी गडावरील चार ते पाच हजार लोकांचे अन्न या कोठारांमध्ये असे एवढी क्षमता आहे.

बालेकिल्ला:-

मेना दरवाजा विरुद्ध दिशेला पालखी दरवाजा बाजून गेल्यास आपल्याला बालेकिल्ला दिसून येतो.

पालखी दरवाजा(Palakhi Door):-

पालखी दरवाजाच्या वरती गेल्यानंतर सप्त मनोरे दिसून येतात. टेहळणी बुरुजाच्या कडेलाच आपल्याला दोन ढासळलेले बुरुज दिसून येतात.जाणकारांकडून सांगण्यात येते की हे पहिले मनोरे पाच मजली होते.त्यावेळी यांचा उपयोग शिवाजी महाराजांनी जर कोणता नवीन किल्ला स्वराज्या मध्ये सामील करून घेतला तर त्यावेळी भगवा फडकवण्यासाठी केला जात असे.
Palkhi Darwaja
Source: Wikipedia

बाजारपेठ(Market):-

किल्ल्याच्या पूर्व दिशेला प्रशस्त अशी बाजारपेठ दिसून येते.त्याची उंची अंदाजे तीन फूट इतकी आहे. राजे पहिला राजवाड्यातून बाहेर याची त्याला खरेदी करायला जायचे त्यांच्यासाठी ही बाजारपेठ इतकी उंच करून घेतली आहे.

टकमक टोक(Takmak Point/Takmak Tok):-

बाजारपेठ देऊन जरासे पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला दारूखाना व टकमक टोक दिसून येते.
टकमक टोक यची खोली जवळपास अठराशे फूट इतकी आहे.
टकमक टोकाच्या फार मोठा इतिहास आहे राजे ज्यावेळी राजमाता जिजाऊंना भेटण्यासाठी येत असत त्यावेळी या ठिकाणी असलेली घंटा वाजवण्यात येत असे.घंटा वाजता पाचाड मध्ये असलेल्या राजमाता जिजाऊ आपल्या या महालातून भगवा घेऊन बाहेर येत.त्यावेळी शिवाजी महाराज जिजाऊंना मुजरा करत त्यावेळी त्यांचा सेवक निजाम त्यांच्यावर छत्री धरून उभा असे.
एकेदिवशी शिवाजी महाराज आणि निजाम राजमाता जिजाऊंना मुजरा करण्यासाठी आले होते त्यावेळी वारे खूप जोराने सुटले होते त्या वाऱ्याच्या वेगाने छत्री उडून गेले व निजाम खालती कड्यावरून उडून गेला.राजे निजामाला सांगितले की काहीही झाले तरी छत्रीचा दांडा सोडू नकोस त्यांचे म्हणणे ऐकून निजामाने छत्रीचा दांडा सोडला नाही.आणि निजाम एका गावांमध्ये उतरला त्या गावाचे नाव शिवाजीमहाराजांनी बदलून छत्री निजामपूर असे ठेवण्यात आले.

कोळीब तलाव(Kolambi Lake):-

जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना आपल्याला कोळंब तलाव लागतो.

जगदीश्वर मंदिर(Jagdishwar Temple):-

जगदीश्वर मंदिरात प्रवेश करताना आपल्याला एक पार्टी दिसून येईल त्यावर,हिरोजी इंदुलकर यांचे नाव दिले आहे.
यामागचा इतिहास म्हणजे या वेळी गडावरील सर्व काम पूर्ण झाले त्यावेळी महाराज गडावर आले होते. त्यांनी हिरोजी इंदुलकर यांना म्हटले की ‘तुम्ही खूप चांगले काम केले आहे धरतीवर साक्षात स्वर्ग निर्माण केला आहे, तरी या बदली तुम्हाला कोणते बक्षीस हवे आहे’ त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता महाराजांकडे मागणे मागितले ‘तुम्ही जगदीश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर ती माझ्या नावाची एक पाटी लावा कारण, जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश कराल त्यावेळी माझ्या नावाची पाटी तुमच्या पायाची धूळ सदैव माझ्या मस्तकावर राहील.’

निषणीची गुहा(Nishnichi Guha/Nishni’s Cave):-

महाद्वारापाशी दूरवर तटबंदीच्या वर निसणीची गुहा दिसून येते.

भवानी कडा(Bhavani Kada):-

रायगड किल्ल्यावर आपल्याला भवानी कडा आढळून येतो या भवानी काड्या च्या समोर पोटल्याचा डोंगर दिसून येतो.याकडे यावरूनच काही इंग्रजी व मराठ्यांच्या मधील काही फितूर लोकांनी रायगडावर हल्ला केला होत. आणि अकरा दिवस रायगड रडत होता.
आणि म्हणूनच म्हणतात,

“अंधाराला घाबरत नाही कारण उजेडाची सात आहे||

मोडेल पण वाकणार नाही हि मराठ्याची जात आहे||”

छत्रपती शिवाजी महाराज की जय||

About the post:-

Information about raigad fort in marathi 

Raigad Wikipedia in Marathi,Raigad in which district,Raigad fort information in Marathi,Raigad killa chi mahiti

या पोस्टमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड विषयी माहिती सांगितली आहे यामध्ये आपण माता जिजाऊंची समाधी पहिली, वाघबीळ पॉईंट,खुबलढा बुरूज, नाणे दरवाजा, मशीद मोर्चा,महाद्वार, हत्ती तलाव,हत्ती खाना, होळीचा माळ,वाघ दरवाजा, बारा टाकी,नगारखान, टेहळणी बुरुज, गंगासागर तलाव, खलबत खान,सचिवालय, राजमहाल,टाकसाळ, राजमहाल, मेणा दरवाजा, दासी दरवाजा, हिरकणी बुरूज, अस्ट प्रधान मंडळ वाडे,बाले किल्ला, पालखी दरवाजा, बाजारपेठ, टकमक टोक, कोलीब तलाव, जगदीश्वर मंदिर, निष्णीची गुहा,भवानी कडा या गोष्टी दिसून येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *