कष्टाळू हरीण मराठी बोधकथा – Kashtalu Harin Marathi Goshti

Kashtalu Harin Marathi Chan Chan Goshti

एका राज्यात एक राजा राहत असतो. त्या राजाला प्राण्यांचे मांस खायला आवडत असते. म्हणून तो रोज हरणांची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जात असतो. त्यामुळे त्यामुळे रोज एका हरणाला आपला जीव गमवावा लागलेला असतो.

एक दिवस हरणांचा कळपाचा प्रमुख त्या राजाला जाऊन भेटतो आणि म्हणतो ‘महाराज आपण रोज एका हरणाला खाता त्यामुळे दररोज एक हरणाला आपला प्राण गमवावा लागत आहे तर कृपा करून असे करू नका, तुम्ही त्यांची शिकार करू नका.’ त्यावर राजा म्हणतो कि,’हे बघताना मला ते काय जमणार नाही मला रोज हरिन लागते त्यामुळे तू मला रोज एक हरीण पाठवून देत जा. नाहीतर तुझ्यावर तुझ्या हरणाचा जीव धोक्यात आहेत’.

हरणांचा प्रमुख राजाला खूप विनंती करतो कि,’नका करू प्राण्याची हत्त्या !’. पण राजा ऐकायला तयार होत नाही. तो म्हणतो तू जर ऐकत नाहीस तर मी आता तुझे प्राण घेणार.’ हरणांचा प्रमुख स्वतःच्या जीवाची पर्वा म्हणून शेवटी हरणांचा प्रमुख तयार होते.

हे ऐकून राजा हरणांच्या प्रमुखावर खुश होतो. राजा हरणाच्या प्रमुखाला वचन देतो कि मि तुला कधीच मारणार नाही. आता रोज एक हरीण स्वत:हून राजासमोर हजर होऊ लागले. असे अनेक दिवस चालू राहते.

एक दिवस एका हरिणीचा दिवस येतो. तिला एक छोटे पिल्लू असते. ती हरणाच्या प्रमुखाला जाऊन भेटते. ती सांगते कि ‘महाराज मला माझ्या पिल्लाला वाढवायचे आहे. त्याचे संगोपन करायचे आहे. जर मी मृत्यू पावले तर त्याचे पालनपोषण कोण करणार? मोठे झाल्यावर माझ्या पिल्लाला तर राजाला कडेच पाठवायचे आहे यात राजाचे नुकसान आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवून द्या’ हरणाचा प्रमुख ठरवतो कि आज तो स्वत: राजाकडे जाणार.

त्या हरिणीच्या ऐवजी प्रमुख राजाकडे जातो. हरणाचा प्रमुख राजाकडे जातो आणि राजाला सर्व हकीकत सांगतो. राजाला त्याचा त्याग पाहून आश्चर्य वाटते. तो राजा त्या हरणाला म्हणतो मित्रा मी आतापर्यंत तुमच्या कळपा मधील अनेक जणांचा जीव घेतला मला फार दुःख होत आहे मला माझी चुक समजली. राजा हरणांच्या प्रमुखाला म्हणतो,’ माझ्या मित्र यापुढे मी कोणत्याच हरणाचे शिकार करणार नाही.’

तात्पर्य – नेहमी दुसऱ्यांना मदत करावी. कधीही कोणाला त्रास देऊ नये.

हे पण नक्की वाचा :-

मराठी छान छान गोष्टी – चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

Tags,

Marathi Chan Chan Goshti, Marathi Full moral stories, Marathi New stories for kids

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *