कावळा चिमणीची गोष्ट – Kavala Chimani Marathi Gosht

आपल्या सर्वांची आवडती मराठी गोष्ट म्हणजे कावळा चिमणीची गोष्ट.आपण लहान असताना शाळेत कावळा चिमणीची गोष्ट फार सांगितली जायची.

For Reading Kavala Chimni Gosht in Marathi Click हेरे

एका जंगलात एक चिमणी आणि एक कावळा होता. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे.

याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही.

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाच. तेही पाण्यात वाहून गेल. हू…हू…हू…हू…! करत कावळा काकडत होता. आता कुठे जाव बर? असं त्याच्या मनात विचार आला तितक्यात त्याला चिमणी आठवली.

चिमणीच घर शेजारीच होत. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. कावळा म्हंटला,’चिऊताई, चिऊताई, दार उघड !’

चिऊताई तेव्हा आपल्या बाळाला अंघोळी घालत होती तेव्हा चिऊताई आतून म्हणाली,’थांब कावळोबा माझ्या बाळाला अंघोळ घालते.’नंतर थोड्या वेळानं कावळ्याने परत हाक मारली तेव्हा चिऊताई म्हटली, ‘थांब कावळोबा माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’ थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ इकडे कावळयाला खूप भूक लागली होती.

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिऊताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले.

कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली ‘तू बैस चुलीपाशी’. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर ! कावळयाच्या तोंडाला पाणी सुटले.त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोडया वेळाने पाऊस थांबला.

कावळयाने घरटयाचे मागचे दार उघडले आणि तो भुर्रकन् उडून गेला.चिमणी बगते तर काय सगळी खीर संपले. चिमणी खूप चिडली कावळ्यावर, कावळा आळशी आणि लबाड.

तात्पर्य – लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही.

हे पण नक्की वाचा :

बुडबूड घागरी मराठी गोष्ट

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

मी आशा करतो की, आपल्याला ही पोस्ट आवडली असेल. अशाच मराठी कथासाठी आमच्या वेबसाईट ला बुकमार्क करा.

Tags :-

Kavla chimni gosht in marathi | Marathi chan chan goahti | moral stories for kids in Marathi | Funny Stories for kids | Marathi stories for reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *