Sign Up

Sign In

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

कृष्णाच्या गवळणी | Krishna Gavlan Information in marathi

मराठी कृष्णाच्या गवळणी (गौळणी)| Marathi Krishna Gavlan Information in marathi

 

गवळण (गौळणी) म्हणजे काय? | What is Mean by ‘Gavlan’?

गवळण हा एक मराठी भाषेतील काव्य प्रकार आहे. भजनी गवळणी सांप्रदायिक या काव्य प्रकारात आपण श्री कृष्णाचे वर्णन अथवा विनंती करण्यासाठी वापर केला जातो.गवळण या काव्य प्रकारात कृष्णाचे बासुरी वाजवताना वर्णन केले आहे. कृष्ण जेव्हा बासुरी वाजवतो तेव्हा त्याच्या बासुरीला मोहून गोपिका(गवळणी) आपले देहभान हरपून बासुरी च्या आवाज मध्ये तल्लीन होवून जातात.

गवळणीची रचना कोणी केली? | Who did created Gavlan ? 

गवळणीची रचना संत एकनाथ, संत नामदेव यांनी केली आहे.वारकरी संप्रदाय मध्ये भजनाच्या शेवटीला गवळणी म्हणण्याच्या प्रथा आहे.

कृष्णाच्या गवळणी | Krishna Gavlan Information in marathi

 

चला आता कृष्णाच्या काही प्रसिद्ध गवळणी पाहूया,

नको वाजवू श्री हरी मुरली

नको वाजवू श्री हरी मुरली

तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ||

 

घरी करीत होते मी कामधंदा

तेथे मी गडबडली रे || १ ||

 

घागर घेवूनी पानियाशी जाता

दोही वर घागर पाजरली || २ ||

 

एका जनार्दनी पूर्ण कृपेने

राधा गवळण घाबरली || ३ ||

 

देव एका पायाने लंगडा

असा कसा ग बाई

देवाचा देव ठकडा

देव एका पायाने लंगडा ||धृ||

 

गवळ्या घरी जातो | दही दुध खातो

करी दहया दुधाचा रबडा ||१||

 

शिंकेचि तोडीतो मडकेची फोडीतो |

पाडी नवनिताचा सडा ||२||

 

वाळवंटी जातो कीर्तन करितो

लावी साधुसंतांचा झगडा ||३||

 

एका जनार्दनी | भिक्षा वाढ मायी

देव एकनाथाचा बछडा ||४||

 

वनमाळी वनमाळी वनमाळी

वनमाळी वनमाळी वनमाळी

राधे तुला बोलावितो वनमाळी || धृ ||

 

वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ || १ ||

साडी जरीची चोळी बुटयाची, नेसुनी चंद्रावर || २ ||

एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्ती माझी भोळी || ३ ||

 

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी । कान्हा वाजवितो बासरी

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी । कान्हा वाजवितो बासरी ॥धृ॥

घागर घेऊनी पाणियासी जाता । येतां जाता आम्हा अडविता ।

आमच्या शीरी घडा याने मारिला खडा । याने केली आमची मस्करी ॥१॥

दही दुध घेऊनी गवळ्याच्या नारी । जात होत्या मथुरे बाजारी ।

त्यांचा भरला घडा याने मारीला खडा याने केली आमची मस्करी ॥२॥

यशोदा धुंडले गोकुळ नगरी । अवचित पाहिला राधिकेच्या घरी ।

राधिकेच्या घरी हरी पलंगावरी । पाहून राधा झाली घाबरी ॥३॥

जनी म्हणे बा श्रीहरी । भोग भोगिले बाळ ब्रह्मचारी ।

जनी म्हणे देवा खुप केला तुम्ही असुन ब्रह्माचारी ॥४॥

 

हरि तुझी कांती रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी ।

हरि तुझी कांती रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी ।

तुझ्या दर्शने होईन काळी । मग हे वाळी जन मज ||धृ ||

 

उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगो रे गोवळा ।

तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ||१||

 

तुझिये अंगी घुरट घाणी । बहू खासी दूध तूप लोणी ।

घरिचे बाहेरिल आणोनि । मी रे चांदणी सुकुमार ||२||

 

मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन ।

अंगीचे तुझे देखोनि लक्षण । मग विटंबना होईल रे ||३||

 

तुज तंव लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही ।

आणिक मात बोलु काही । कसी भीड नाही तुज माझी ||४||

 

वचन मोडी नेदि हात । कळले न साहेचि मात ।

तुकयास्वामी गोपिनाथ । जीवन्मुक्त करुनि भोगी ||५||

 

येत येत उभा राजबिदी | सवें चाले गोपाळांची मांदी |

येत येत उभा राजबिदी | सवें चाले गोपाळांची मांदी |

नारी पाहती उभया बिदी | एकीच्या धरुनी बाहुवा खांदी ||धृ ||

 

हरिहरनंदना सदृश्य लोचना | डोळ्यां वेगळा न वा जासी कान्हा |

अरे कान्हा मनमोहना | गोपी भुलल्या तुझिया गुणा ||१||

 

चतुर्वेद नागवी भाट सांगातें | उभया वर्णितां रामकृष्णातें |

श्रुति स्मृति विद्यावंते | जय जय म्हणिती कृपानिधिते ||२||

 

येत येत उभा रहात | सुदाम्याच्या खांद्यावरी हात |

समदृष्टी गोपिका न्याहाळीत | चैतन्य चोरुनी आनंदें डुल्लत ||३||

 

ऐसा कृष्ण सौभाग्यसुंदर | लावण्य गुण रत्नाकर |

विष्णुदास नामयाचा दातार | भक्ती भावें वोळंगा शारंगधर ||४||

 

गेलीया वृंदावना तेथें देखिला कान्हा

 

गेलीया वृंदावना तेथें देखिला कान्हा |

सवंगडीया माजीं उभा ध्यान लागलें मना ||धृ||

 

हरीनाम गोड झालें काय सांगो गे माय |

गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ||१||

 

त्याचें मुख साजिरें वो कुंडलें चित्त चोरें |

सांडूनी अमृत धणी लुब्धली चकोरे ||२||

 

सांडूनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा |

कौस्तुभा तळवटी वैजयंती शोभे गळां ||३||

 

सांडूनी मेघराजू कटीसूत्री तळपे विजू |

भुलला चतुरानन तया नव्हे उमजू ||४||

 

सांडूनि लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज |

अचोज हा चोजवेना ब्रम्हदिकां सहज ||५||

 

वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू |

भेदली हरिचरणी पायीं मुरडीव वांकी सोज्वळु ||६||

 

त्याचें पायींची नुपुरें वाजती वो गंभीरे |

लुब्धलिया पक्षी याती धेनू पाचारी स्वरे ||७||

 

ध्यान सांवळे गोकुळींचे

ध्यान सांवळे गोकुळींचे | धांव पाव वेगीं हरी सांवळीया ||धृ||

 

सांवळीसी अंगी उटी | सांवळी कस्तुरी लल्लाटीं |

सांवळीसी कांसे कासियला कटीं | गोवळीया ||१||

 

सांवळीसी तनु बरवी | सांवळे वृंदावन मिरवी |

सांवळ्याशा तुळसी कानी | मंजुरीया कोंवळीया ||२||

 

सांवळीसी कंठी माळा | सांवळे हृदयी पदक विशाळा |

सांवळ्याशा गोपी केल्या ओवळ्या | गोंवळीया ||३||

 

सांवळीशी हाती काठी | सांवळासा कांबळा पाठीं |

नामयाचा स्वामी गायी राखी | धवळ्या आणि पिवळ्या ||४||

 

गाऱ्हाणें सांगाया | आल्या गोकुळीच्या स्त्रिया ||

गाऱ्हाणें सांगाया | आल्या गोकुळीच्या स्त्रिया ||धृ||

 

यशोदा ऐकत | पळे बाहेरी भगवंत ||१||

 

एक म्हणे लोणी | माझें भक्षी चक्रपाणी ||२||

 

फोडीतसे भांडें | विर्जीलीया म्हणे रांडे ||३||

 

गाई वासरे सोडितो | येऊनि आम्हासी सांगतो ||४||

 

अष्टदळ काढिलें अंगणीं | वरी मुते चक्रपाणी ||५||

 

घेउनिया आला अग्न | तुझ्या घरासी लावीन ||६||

 

देईन मी तोंडावर | तुझ्या बापाचे हें घर ||७||

 

घेतसे वरखडे | शिव्या देऊनियां रडे ||८||

 

देखोनिया गरोदर | म्हणे केवढें उदर ||९||

 

सांगती गाऱ्हाणी | नामा म्हणे ऐका कानीं ||१०||

 

कशी जाऊ मी वृंदावना

कशि जांवू मी वृंदावना ।

मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥

 

पैलतिरीं हरि वाजवी मुरली ।

नदी भरलीं यमुना ॥२॥

 

कांसे पीतांबर कस्तुरी टिळक ।

कुंडल शोभे काना ॥३॥

 

काय करू बाई कोणाला सांगूं ।

नामाची सांगड आणा ॥४॥

 

नंदाच्या हरिनें कौतुक केलें ।

जाणे अंतरिच्या खुणा ॥५॥

 

एका जनार्दनी मनी ह्मणा ।

देवमाहात्म्य कळे ना कोणा ॥६॥

 

मी आशा करतो की आपल्याला ही पोस्ट नक्की आवडली असेल.असाच आणखी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट वरती वारंवार भेट देत रहा. त्याच प्रमाणे बुकमार्क देखील करून ठेवा.

 

About This Post:-

Marathi Gavlan list 

marathi gavlan list mp3 download

Krushan Gaulani Krishan Gavlani 

कृष्णाच्या गवळणी 

हे पण नक्की वाचा:- 

आरती संग्रह