(Mahabhulekh 7 12 online) म्हणजे काय? | 7 12 online mahabhulekh | satbara Mahabhulekh information in Marathi
नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपल्याला mahabhulekh 7 12 online सातबारा उतऱ्याबदल काही माहिती सांगणार आहे. आपण प्रत्येक वेळी आपला कोणतेही सरकारी काम असेल किंवा कोणताही दाखला काढायचा असेल तर mahabhulekh 7 12 online सातबारा उतारा काढतो. पण त्यामध्ये कोणते कोणते महत्वाचे घटक असतात. त्यामध्ये कोणती माहिती दिलेली असते ते आपल्याला माहिती नसते. तीच माहिती मी या पोस्ट मधून आपल्याला सांगणार आहे. mahabhulekh 7 12 online कसा काढायचा या बद्दल माहिती सुद्धा या पोस्ट मध्ये सांगणार आहे.
What is mean by satbara 7 12 and how to download?
1. सातबारा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा यांची माहिती एकत्रित केली जाते. या सातबाऱ्या उताऱ्यामध्ये उतारा नंबर सात आणि उतारा नंबर बारा उपलब्ध असतो.
या सातबाऱ्या उताऱ्यामध्ये गावच्या सात अ नमुन्याची माहिती सुद्धा घातलेली असते. सातबारा उतारा म्हणजे हाक्के नोंद व पीक पाहणी पत्रक. जमीन आणि महसुलाची माहिती प्रत्येक गावाच्या तलाठ्याला ठेवावी लागते त्यापैकी सात आणि बारा हे दोन नमुने असतात.
त्याचप्रमाणे सातबारा हे वेगवेगळे दोन गाव नमुने आहेत पण ते एकाच पानावर दिलेले असतात म्हणून त्याला सातबारा उतारा असे म्हणतात. गाव नमुना नंबर सात हे हक्क अधिकार पत्र असते तर गाव नमुना नंबर बारा हे पीक पाहणी पत्र असते.प्रत्येक जमीन मालकाला आपली जमीन किती आहे व कोणती आहे हे दाखवण्यासाठी हा उतारा वापरला जातो.
या उताऱ्या नुसार जमीन भोगवट्यास महसूल व पोलीस विभागाकडून संरक्षण मिळते.हा उतारा फार उपयोगी पडतो म्हणून प्रत्येक जमीन धारकाकडे हा उतारा पाहिजे असतो.
सात अ म्हणजे काय ? What is 7a utara ?
पूर्वीच्या काळी जमीन कसणाऱ्याचे नाव एका रकान्यामध्ये असायचे तो रकाना म्हणजे सात अ शासनाने काढून टाकण्यात आला.हा नमुना कुळ वहिवाटीची माहिती द्यायचा.
सात बारा उताऱ्यामध्ये काय काय असत? What does Satbara Content?
उताऱ्याचा सगळ्यात वरती अहवाल दिनांक असतो त्या नंतर गावाचे नाव असते, तालुक्याचे नाव व शेवटी जिल्ह्याचे नाव असते.
यामध्ये आपली जमीन कोणत्या गावामध्ये आहे. कोणत्या तालुक्यात व कोणत्या जिल्ह्यात उताऱ्याचा आहे याची नोंद केलेली असते. डाव्या बाजूला गट क्रमांक / भूभाग क्रमांक दिलेला असतो त्या नंतर भोगवटा दाराचे नाव दिलेले असते.
महाराष्ट्र जमीन संहिता १९७१ कलम ८२ प्रमाणे वारसा हक्का नुसार जमिनीचे काही तुकडे केलेलं असतात त्यामुळे हिस्सा क्रमांक व गट क्रमांक दिलेले असतात.
भोगवटा (Bhogvata Meaning in Marathi)
यामध्ये 3 प्रकारचे भोगवट्याचे प्रकार असतात.
या भुधारणा पद्धती मध्ये उत्तम जमीन म्हणजे वर्ग १ (भोगवटा १) जमीन.
भोगवटा 1:- या प्रकारामध्ये आपली पूर्वापार वडिलोपार्जित जमीन असेल तर त्याचा समावेश होतो.
यामध्ये आपल्याला जमिनीचा १००% मालकी हक्क असतो. आपण ही जमीन आपल्या मर्जी नुसार कोठेही वापरू शकतो.
याचा वापर आपण जमीन खरेदी विक्री साठी विना अडचण करू शकतो. कारण ही जमीन पूर्वापार पासून आपल्या हक्काची असते. त्याबाबतचे व्यवहार आपण कधीही करू शकतो.
भोगवटा 2:- या प्रकारामध्ये अल्पभू धारकांना किंवा भूमिहीनांना सरकारने कसण्यासाठी जमीन दिलेली असते. सरकारने परवानगी दिल्याशिवाय या जमिनीमध्ये प्रकारची देवघेव करता येतं नाही.
भोगवटा 3:- सरकारने भाडे तत्वावर विशिष्ट अटी व नियम लावून विशिष्ट कामाकरिता दिलेली जमीन या भोगवट्या
मध्ये येते. जर त्या नियम व अटींचे उल्लंघन झाले तर जमीन काढून घेण्याचा अधिकार सरकारला असतो. या जमिनीला इनाम किंवा दुमला जमिनी असेही म्हणतात.
या जमिनीचे पश्चिम महाराष्ट्र मध्ये परत 3 प्रकार पडतात.
1.वर्ग 1 – सरंजाम इनाम
2.वर्ग 3 – देवस्थान इनाम
3. वर्ग 7 – संकीर्ण
विदर्भात दुमाला जमिनीचे वर्ग 7 :-
संकीर्ण हा एकच गट येथे आढळतो.अश्या जमिनी फक्त काही विशिष्ट कामासाठी वापरल्या जातात जसं कि शाळा, महाविद्यालय, दवाखाने किंवा धार्मिक काम करणारे संस्था.परंतु दिलेल्या कामासाठी जमिनीचा वापर नाही केला तर जमिनी परत घेतल्या जातात.
वर्ग 3:-
या जमिनी हस्तांतरणीय नसतात.म्हणजे ज्या वहिवाट धारकाचे नाव दिले असते त्यालाच ती कसावी लागते.
भूमापन क्रमांकाचे स्थानिक नाव :- या रकान्यात जर त्या जमिनीला कोणते नाव दिले असेल तर ते दिले जाते उदा.पटकी, डोंगराचा माळ, देवा शेत
त्या खालील रखाण्यात जमिनीचे मोजमाप दिलेले असते त्यामध्ये गुंठे, एकर, हेक्टर यांचा समावेश असतो तसंच जिरायत बागायत याची पण माहिती असते.
पोटखराबा (Potkhraba Meaning in Marathi)
पोटखराबा हे आपल्या शेतीमधीलच जमीन असते. या जमिनी मध्ये लागवडीकरिता पूर्णपणे अयोग्य असेलेले क्षेत्र असते
याचे मुख्यतः 2 प्रकार पडतात :-
1.वर्ग 1:- या प्रकारात नाले/खंदक/बांध यांचा समावेश होतो.
2.वर्ग 2:- रस्ते, कालवे, तलाव यासारख्या गोष्टींचा समावेश असतो.
आकार
या विभागामध्ये जमिनीला लावण्यात येणारा कर रुपये -पैसे या स्वरूपात दिलेला असतो. हि पद्धत गेल्या 100 वर्षांपासून चालू आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल घडलेला नाही आहे.
यात देवस्थानाच्या जमिनी असल्यास जुडी अथवा विशेष आकार यापुढे दिलेले असतात. धरणाचे पाणी अथवा कालव्याचे पाणी मिळत असल्यास त्यामध्ये समावेश केला जातो.
फेरफार क्रमांक (Ferfar information in Marathi)
कब्जेदारी सदरी काही नावे लिहिलेली असतात त्याच्या समोर समोर फेरफार क्रमांक वर काही वर्तुळे लिहलेली असतात.वर्तुळात असल्येल्या क्रमांकाना व्यवस्थित पाहणे आवश्यक असते.
गावचा नमुना नं.6 म्हणजे फेरफारच उतारा त्यामध्ये सध्या ती जमीन कोणाच्या नावावर आहे आणि तिची सद्य परिस्थिती काय आहे याविषयी सांगतात.फेरफार उताऱ्यात नोंदणी क्रमांक दिलेला असतो.
हाच नंबर 7/12 उताऱ्यात वर्तुळात दिलेला असतो.त्याचप्रमाणे फेरफार उतारा पण सातबाऱ्यावर काढता येतो.
सध्या ती जमीन कोणाच्या नावावर आहे? तिच्यावर कोणता बोजा आहे काय? अशी नोंद एका फेरफार वहीत केलेली असते, त्या वहीचा क्रमांक म्हणजे फेरफार क्रमांक होय.
सातबाऱ्यामध्ये बदल असल्यास काय करावे?
सातबाराच्या उताऱ्यात असेलली नोंद खरी धरायची असती जोपर्यंत नवीन नोंद केली जात नाही तोपर्यंत.काहीवेळा जमिनीचा भोगवटादार आणि मालक वेगवेगळे असू शकतात पण जोपर्यंत तो उताऱ्यात आहे तोपर्यंत तोच भोगवटादार मालक असतो.
जर आपला सातबारा लिहण्यात काही चुकी तलाठी कडून झाली असेल तर जमीन महसूल संहिता कलम 155 नुसार त्यात बदल करता येऊ शकतो.त्याप्रमाणं तहसीलदार सर्व हिथ संबन्धिताना बोलवून घेतात व सगळयांचे जाब घेऊन योग्य ते फेरबदल करतात.
सातबाराच्या वरती उजव्या बाजूला भूधारकाच्या जमिनीचा खाते क्रमांक व त्या खाली जमीन कोणाच्या कुळ वहिवाट असेल त्या कुळाचे नाव दिलेले असते. तसेच काही खंड असेल तर तो हि दाखवला जातो.
इतर अधिकार व इतर हक्क
या चौकटीत जमिनीवर
कब्जा नसलेल्या व्यक्ती व बोजा धारण करण्याची नावे दिलेली असतात. काही बोजे वाहक असले तर ते कमी झाले किंवा नाही याची माहिती पण असते.
सरकारी सोसयटी, भूविकास सोसायटी, बँक यांची माहिती दिलेली असते. जर या शेऱ्यांमध्ये पुनर्विकासासाठी लिहलेलं असेल तर सरकारचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय विकता नाही येतं.
कुळकायदा कलम 43
कुळकायदा कलम 43 असे जर लिहले असेल तर जिल्हाधिकारी यांच्या सहमतीशिवाय आपल्याला जमीन विकता नाही येत.
गाव नमुना 12
गाव नमुना 12 म्हणजे पीक पाहणी पत्रक यामध्ये वर्ष कोणते कोणतं पीक घेतलेलं आहे मालक स्वतः जमीन कसतो का मजुरांकडून कसवून घेतो याची माहिती असते.
यामध्ये त्याने पिके कोणती कोणती घेतली आहेत त्याचप्रमाणे त्याने पाणी विहरींमार्फत घेतलंय का इर्रीगेशन काय कॅनॉल मधून याची सगळी माहिती असते.
अशी मोठ्या प्रमाणात सांख्यिकी माहिती गोळा केली जाते व ती माहिती सरकारला किती उत्पन्न मिळते, शेतीला कसे नुकसान झाले हे पाहण्यासाठी केले जाते.
यामध्ये शेवटचा रकाना(शेरा) असतो त्यात शेतकरी माहिती देतो माझी 1 विहीर आहे माझी एवढी झाडें आहेत.
Online Satbara Uses
तुम्ही या पोस्ट च्या माध्यमातुन 7 12 online Kolhapur,7 12 online Pune,7 12 online satara,7 12 online solapur,7 12 online Sindhudurg,7 12 online Raigad,7 12 online Palghar,7 12 online Ratnagiri,7 12 online Mumbai,7 12 online Thane,7 12 online jalgaon,7 12 online Nashik,7 12 online Nagpur,7 12 online ahmadnagar,
7 12 online Auragabad,7 12 online Osmanabad,7 12 online Beed,7 12 online Chandrapur,7 12 online Dhule,7 12 online Akola,7 12 online Amravati,7 12 online Bhandara,7 12 online Buldhana,7 12 online Gadchiroli,7 12 online Gondia,7 12 online hingoli, 7 12 online Jalna,7 12 online latur,7 12 online Mumbai urban,7 12 online Mumbai Suburban,7 12 online Nanded,7 12 online Nandurbar,7 12 online Parbhani,7 12 online Sangli,7 12 online vardha,7 12 online Washim,7 12 online yavtamal काढू शकता.
7 12 aapli chavadi 7 12 पण पाहू शकता.7 12 bhumi abhilekh याला 7 12 असेही म्हणतात.7 12 check Online maharashtra करण्यासाठीं तुम्ही मराठीमध्ये वेबसाईट चा वापर करु शकता. आणि आपला satbara online download Marathi करू शकतो तेही digital sign सहित with map पण पाहु शकता.
About this post:-( mahabhulekh 7 12 online)
या पोस्टमध्ये आपण पाहिले की mahabhulekh 7 12 extract online maharashtra सातबारा म्हणजे काय? 7 12 Satbara in Marathi mahabhulekh 7 12 online उताऱ्या मधील माहिती नसलेल्या गोष्टी. ७ अ म्हणजे काय?७ १२ उताऱ्या मध्ये काय काय असते? भोगवटा, पोठ्खराबा, आकार, फेरफार क्रमांक, सातबारा मध्ये बदल असल्यास काय करावे?, कुळकायदा ४३ , गाव नमुना, कुलकायदा कलम ४३