मराठी आरती संग्रह | all Marathi Aarati Sangraha lyrics

Marathi Aaratichi Gani | Marathi Aarati Sangraha Collection | Ganesh Mahadev Vitthal Mahalakshmi Durga Datta Marathi Aarati written

नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण मराठी मध्ये आरती संग्रह(marathi Aarati list) पाहणार आहोत.जेव्हा आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये जातो तेव्हा तिथं हमखास आरती म्हणाव्या लागतात काही वेळेला आपण आरती म्हणत असताना आरत्या विसरू शकतो असे काही घडू नाही या करिता मी हि पोस्ट लिहीत आहे.

Marathi aarati in texting as well as writing is available on this site.marathi aarati image

Marathi Aarati Sangraha lyrics pdf | मराठी आरती संग्रह

गणपतीची आरती

॥ श्री गणपतीची आरती ॥

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।

सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची।

कण्ठी झळके माळ मुक्ताफळांची॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ति।

दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।

चन्दनाची उटि कुंकुमकेशरा।

हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ति।

दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

लम्बोदर पीताम्बर फणिवर बन्धना।

सरळ सोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना।

दास रामाचा वाट पाहे सदना।

संकटी पावावे निर्वाणी

रक्षावे सुरवरवन्दना॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ति।

दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

 शंकराची (महादेवाची आरती )

॥ श्री शंकराची आरती ॥

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा।

वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा।

लावण्य सुन्दर मस्तकी बाळा।

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा।

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।

विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें।

त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले।

ते त्वां असुरपणे प्राशन केलें।

नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी।

पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी।

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।

रघुकुळटिळक रामदासा अन्तरी॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

 दुर्गा देवीची आरती

॥ श्री दुर्गा देवीची आरती ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।

अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी।

वारी वारी जन्म मरणांते वारी।

हारी पडलो आता संकट निवारी॥

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।

सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही।

चारी श्रमले परन्तु न बोलवे काही।

साही विवाद करिता पडले प्रवाही।

ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।

सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।

क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा।

अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा।

नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।

सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

विठ्ठलाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं।
कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी।
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां।
राही रखुमाबाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा विठोबा सांवळा॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥
ओवाळूं आरत्या कुर्वण्ड्या येती।
चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती।
पंढरीचा महिमा वर्णावा किती॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती।
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥

दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा।
नेती नेती शब्द न ये अनुमाना।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त।
अभाग्यासी कैसी न कळे ही मात।
पराही परतली तेथे कैचा हेत।
जन्ममरणाचा पुरलासे अन्त॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥
दत्त येऊनियां ऊभा ठाकला।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला।
जन्ममरणाचा फेरा चुकविला॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान।
हरपलें मन झालें उन्मन।
मी तू पणाची झाली बोळवण।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥

 महालक्ष्मीची आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी…॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी…॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी…॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी…॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी…॥

 हनुमानाची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।।
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।
थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।
रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।।

 हरतालिका देवीची आरती

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥

आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥

हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥

तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥

रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥

उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥

तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने ।

केली बहु उपोषणे ॥ शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥

लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥

पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥

काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥

माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥

श्रीराम आरती

श्रीराम जयराम जय जय राम

श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

श्रीराम जयराम जय जय राम

श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥

कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।

कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।

मारुती हा पुढे उभा हात जोडून ।

मारुती हा पुढे उभा हात जोडून ॥ १ ॥

राम ।

श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।

भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।

सिंहासनी आरुढले जानकीपती ।

सिंहासनी आरुढले जानकीपती ॥ २ ॥

राम ।

श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।

लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।

चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ।

चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥ ३ ॥

राम ।

श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।

आता मागणे हेची ।

विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।

अखंडित सेवा घडो रामचंद्राची ।

अखंडित सेवा घडो रामचंद्राची ॥ ४ ॥

राम ।

श्रीराम जयराम जय जय राम

श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

साईबाबांची आरती

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।।
जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग ।
मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।।
जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।।
तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा । अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।।
कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द०।। आ०।। ४ ।।
आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ०।। ५ ।।
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरज सेवा ।
मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। आ०।। ६ ।।
इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। आ०।। ७ ।।

हे पण वाचा:-

मराठी भारुडे आणि त्यांची माहिती

Search Tags :-

Shri Ram marathi aarati ,Sai Baba marathi Aarati,marathi aarati sukh karta dukh harta,marathi aarati Vitthal

Laxmichi aarati marathi,devichi aarati Marathi,Krishnachi aarati marathi,tulsichi aarati marathi,marathi aarati devachi,marathi aarati dattachi, marathi aarati full free MP3 download,marathi aarati ganpati ji ki lyrics,hanumanachi aarati marthi lyrics,hartalika devi aarati Marathi lyrics,marathi aarati mahadevachi, Navratri marathi aarati, marathi aarati of pandurang

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *