Chan Chan Marathi Goshti | उंदिर मामाची टोपी मराठी गोष्ट | Moral Stories in Marathi
लहान मुलांना किंवा बालकांना छोट्या छोट्या Marathi Goshti मधून Moral (तात्पर्य) किंवा शिकवणूक मिळत असते.
या Moral आधारे ते आपल्या आयुष्यात असणाऱ्या विविध गोष्टींशी साम्य करून काय चांगले काय वाईट हे ठरवून Moral in Marathi Stories समजू शकतात.
या करिता मी आज या पोस्ट मध्ये उंदीर मामाची टोपी (Undir Mamachi Topi) ही एक Marathi Gost सांगणार आहे.
हि गोष्ट तुम्ही तुमच्या मुलाला सांगू शकता आणि त्यांची काय reaction आली तेही तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता.
चला तर मग पाहूया, Undir Mamachi Topi Marathi Goshti
एक होता उंदिरमामा तो खूप आगाव होता. एकदा तो रस्ताने जात होता रस्त्याने जाताना त्याला एक फडके मिळाले.फडके पाहून उंदीर मामा खुश झाला फडके घेऊन तो गेला धोब्याकडे आणि धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे.
धोबी म्हणतो “तुझे फडके मी का धुवून देवू?🤨 मला दुसरी पण काम आहेत भरपूर” तेव्हा उंदीर म्हणतो “कसली काम आहेत धोबी दादा मला अजून हे कपडे धुवायचे आहेत” उंदिर म्हणतो एवढे सगळे कपडे धुता आणि हे फडके तुम्हाला धुता नाही येत😏 थांब जरा तुझी खोडच मोडतो माझ्या मित्रांना बोलवून आणतो आणि तुझ्या कामाचा सत्यानाश करतो” हे ऐकून धोबी म्हणतो “बर उंदीर मामा ते फडक दे मी धुवून देतो”.धोबी उंदिराला फडके धुवून दिले.
मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे आणि शिप्याला म्हणाला ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव’ शिंप्याने उंदिरमामाला म्हटले “उंदिर मामा हा कुठून फडका आणलास आणि मला टोपी शिवायला सांगतोस?” तेव्हा उंदीर सांगतो की हा फडका मला रस्त्यावरची सापडला आणि मी धोबी दादा कडून धुवून घेतला आहे” शिंपी उंदीर मामाला म्हणतो,”मला अजून खूप काम आहेत मी तुला टोपी शिवून देणार नाही” तेव्हा उंदीर मामा म्हणतो,”जर तु मला टोपी शिवून दिले नाहीस तर मी तुझे सर्व कपडे कुडतरून टाकीन” तेव्हा शिंपीदादा उंदीर मामाला म्हणतो ठीक आहे बाबा मी तुला टोपी शिवून देतो. आणि शिंपीदादा उंदर मामाला टोपी शिवून दिली.
मग उंदीर मामा गोंडे वाल्याकडे गेला. आणि गोंडेवल्याला म्हटले की “माझ्या टोपीला गोंडे लावून दे.” मात्र गोंडे वाला उंदीर मामा आला म्हटला की “मला खूप काम आहेत मी तुझ्या टोपी ला गोंडा लावून देणार नाही.” उंदीर मामा गोंडे वाल्या वरती चिडला आणि म्हणाला,”जर तू मला गोंडे लावून दिला नाहीस तर मी तुझ्या दुकानातील सगळे कपडे कुडतरुण टाकीन”. गोंडे वाला उंदीर मामा मला घाबरला आणि म्हणाला”ठीक आहे बाबा दे तुझी टोपी मी त्याला गोंडे लावून देतो.” मग गोंडे वाला टोपी ला गोंडे लावतो.
उंदराला ती टोपी फार आवडली तो म्हणाला “आत्ता मी राज्याकडे जातो आणि माझी टोपी दाखवतो”.
उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. आणि राजाच्या दरबारात गेला राजा आपल्या सिंहासनावर ती बसला होता. राजाला बघून उंदीर ते ढोलके वाजवत गाणे गाऊ लागला “राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान छान ढुम,ढुम,ढुमक ! ढुम,ढुम,ढुमक ! माझ्या टोपी ला गोंडे आहेत राजाची टोपी ला गोंडे नाहीत. ” राजाने हे ऐकले. तो आपल्या शिपायांना म्हणाला ‘ जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’
शिपायांनी उंदिरमामाला पकडले. राजाच्या समोर आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला ” राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक ! ढुम,ढुम,ढुमक ! “
हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला ” राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक ! ढुम,ढुम,ढुमक ! ” हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.
उपदेश|बोध
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.
About This Post :-
Chan Chan Marathi Goshti | Moral Story in Marathi | Lahan Mulanchya Goshti | Marathi Goshti written | lahan mulanchya goshti
chan chan goshti marathi
lahan mulanchi goshti
marathi goshti marathi goshti
aajibai chi goshta