Online satbara kasa kadhaycha on Mahabhule? How can we see online Satbara ?
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये मी आपल्याला सांगणार आहेत कि आपण आपल्या मोबाईल फोन मधून online satbara kasa kadhaycha
online satbara kasa kadhaycha 2 पद्धती आढळून येतात एक आहे ती मोफत पद्धत आणि दुसरी आहेत ती फी पद्धत.मोफत पद्धत जर सातबारा काढायला निवडला तर आपल्याला निशुल्क सातबारा काढून मिळेल
मात्र तो सातबारा घेवून आपल्याला गावाच्या तलाठी कडे जावे लागेल व तेथे तलाठी काढून आपल्याला सही करून आणावी लागेल, नाहीतर तो सातबारा उतारा ग्राह्य धरण्यात येणार नाही. दुसरी पद्धत म्हणजे फी पद्धत आणि जर फी पद्धत अवलंबला तर आपणाला 15रु एक सातबारा काढायला खर्च करावे लागणार आहेत.
मात्र आपल्याला माहीत असायला हवे कि जर सातबारा मोफत पद्धतीने काढला तर आपल्याला digital signture मिळणार नाही.पण सातबारा जर फी पद्धतीने काढला तर त्या मध्ये आपल्याला डिजिटल सही मिळेल.
नक्की वाचा :- सातबारा विषयी अधिक माहिती.
प्रथमतः आपण फी पद्धतीने सातबारा कसा काढायचा ते पाहू
टीप:- आपण सातबारा लॅपटॉप वरती किंवा कॉम्प्युटर वरती काढावा जेणेकरून आपल्याला त्याची प्रत घ्यायला सोप होईल व तो आपल्याला कोठेही वापरता येईल.माझ्याकडे लॅपटॉप उपलब्ध नाही म्हणून मी मोबाईल वरती दाखवणार आहे की आपण कश्या रीतीने सातबारा कसा काढायचा?
किंवा आपण मोबाईल मध्ये संगणक मोड असतो तो चालू करून देखील उतारा काढू शकतो.
1.आपल्याला आपल्या मोबाईल मधील वेब ब्राउजर ला उघडावे लागेल शक्यतो chrome वापरा. त्यानंतर आपल्याला 7/12 काढायच्या सरकारच्या ऑनलाईन वेबसाईट वर भेट द्यावी लागेल.
Link :- https://bhulekh.mahabhumi.gov.in
2.वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्यला खाली दिलेल्या पर्यायाला निवडावे लागेल. (डिजिटल साईन सातबारा)
👇👇👇👇👇👇

3.नंतर आपल्या समोर login करा किंवा रेजिस्ट्रेशन करा असा पर्याय येईल जर आपण पहिल्यापासून रेजिस्टार केले असेल तर signin/login व स्टेप क्र.6 पहा.नाहीतर नवीन रेजिस्ट्रेशन करायला new registration button वर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन कसे करायचे?
आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन बटन वर क्लिक करावे लागले.
4.त्या नंतर आपल्या समोर एक फॉर्म येईल तो भरा. त्या मध्ये astrick (*) असलेले घटक अनिवार्य असतात.
यामध्ये नाव(पहिले नाव, मधले नाव, आडनाव)
मोबाईल नं., लिंग, राष्ट्रीयत्व,गल्ली नं., स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य, login id इ.रकाने भरावेत.
5.या नंतर आपला एक पासवर्ड ठेवा.त्यानंतर तुम्हला एक प्रश्न निवडावा लागेल.आणि त्याच उत्तर पण तुम्ह्लाच ठरवावे लागेल.हा प्रश्न जेव्हा तुम्ही पासवर्ड विसरला तेव्हा टाकावा लागेल आणि मग तुम्ही नवीन पासवर्ड तयार करू शकता.
सगळ्यात शेवटी एक कॅप्चा भरावा लागतो त्यामध्ये दिलेली संख्या किंवा शब्द टाकायचा असतो व आपला फॉर्म भरला जातो.
सगळ्यात शेवटी तुम्हला तो फॉर्म सबमिट करावा लागेल.
6.एवढी प्रक्रिया झाल्यावर आपल्याला login पेज वर परत जावे लागेल. तेथे जाऊन मग आपल्याला परत login करावे लागेल त्याकरिता आपला username आणि password वापरू शकता.
7. त्या नंतर आपल्याला जिल्हा, तालुका, गाव व गट नंबर विचारला जाईल तो योग्य तो द्या.
जर आपल्याला गट नंबर माहीत नसेल तर तुम्ही नावावरून देखील उतारा काढू शकता. यामध्ये आपण पहिले नाव, मधले नाव, आडनाव टाकू शकता.
8. गट नंबर दिल्यानंतर आपल्याला आपल्या खात्यावर पैसे टाकावे लागणार, 1 सातबारा काढायला किमान 15 रु लागतात, तेवढे पैसे आपण डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड किंवा upi वरून भरू शकता.त्यासाठी रिचार्ज बटण वर क्लिक करा.त्या नंतर आपल्याला डाउनलोड बटण वर क्लिक करा.
येथे आपल्याला ₹१५ भरावे लागतील याकरिता आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यूपीआई चा वापर करू शकता. नंतर पैसे भरून झाल्यानंतर आपण डाऊनलोड बटन वर क्लिक करा.
आपला सातबारा डाउनलोड होईल.
फ्री मध्ये सातबारा काढा.
1.फ्री मध्ये सातबारा काढण्याकरिता आपल्याला प्रथम खाली दिलेल्या वेबसाईट वर जावे लागेल
त्या नंतर आपल्याला चित्रामध्ये दाखवलेल्या फोटो वर क्लिक करावं लागेल.
2.त्या नंतर आपला विभाग निवडावा लागेल. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा, तालुका,गाव निवडावं लागेल.
3.त्या नंतर आपल्याला गट नंबर / नावावरून
आपला सातबारा शोधता येतो.मला यामध्ये मधले नाव माहिती होते त्यानुसार मी सातबारा काढला आपल्याला जर गट क्र.माहिती असेल तर त्यानुसार तुम्ही काढू शकता ते बरे होईल.
त्या नंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकावा लागेल, वेरिफिकेशन करायला.
4.त्या नंतर आपल्याला कॅप्चा भरावा लागेल,आणि व्हेरिफाय करावा लागेल.
त्या नंतर आपल्याला 7/12 मिळेल.
सातबर्याचा उपयोग कोठे केला जातो??
शेतकरी बांधवांना माहिती असेल पण काही निम शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल की या सातबाराच्या उपयोग आपल्याला कश्या रीतीने होईल?? तर चला पाहूया कश्या रीतीने आपल्याला सातबारा उतारा उपयोगी पडतो.
१.जर आपण उत्पन्नाचं दाखला काढायला गेला तर त्यामध्ये सातबारा जोडावा लागतो.
२. रहिवाशी दाखला काढायला गेला तर सातबारा आवश्यक आहे.
३. जर आपल्याला गावामध्ये कोणतेही उतारे किंवा दाखले हवे असतील तर सातबारा लागतो.
४. सातबारा मधून आपण आपली जमीन किती आहे याची माहिती गोळा करू शकतो.
५. डोंगरी दाखला काढताना देखील सातबारा उतारा लागतो.
FAQ:-
सातबारा ऑनलाईन काढला तर त्यावर तलाठ्याची सही लागते का?
उत्तर:-
या पोस्ट मध्ये मी सांगितले आहे की आपण २ पद्धतीने सातबारा काढू शकतो. एक म्हणजे मोफत मध्ये आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला ₹१५ खर्च करून सातबारा काढता येतो.
जर आपण मोफत पद्धतीने सातबारा काढला असेल तर त्या सातबारा
वरती आपल्याला बारकोड दिसत नाही किंवा वेरीफाइड म्हणून लिहले नसेल तर त्यावेळी आपल्याला सातबारा वरती तलाठीची सही लागते.
आणि जर आपण सातबारा काढताना ₹१५ भरून सातबारा काढला असेल तर तेथे तुम्हाला बारकोड दिसेल किंवा वेरीफाएड म्हणून दिसेल तेथे सहीची गरज नसते.
महाभुलेख वेबसाईट काय आहे?
उत्तर:-
महभुलेख ही वेबसाईट महाराष्ट्र सरकारने बनवली आहे. या वेबसाईट वरती महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक गावाचा सातबारा व आठ/अ उतारा पद्धतीने नोंदवला गेला आहे. यामुळे आपल्याला गावातील तलाठी किंवा ग्रामसेवकांच्या मागे लागून सातबारा किंवा ८/अ काढायला लागणार नाही.
या वेबसाईट वरती असणारी माहिती हि १००% खरी असणार आहे आणि ती माहिती आपल्या गावच्या तलाठ्यांनी एकत्र करून त्या वेबसाईट वरती अपलोड केली आहे त्यामुळे आपल्याला कोणतीही खोटी माहिती मिळणार नाही याचीही खात्री आहे.
त्याचप्रमाणं या वेबसाईट वरती कोणती माहिती आढळली नसले तर तुम्ही त्याची नोंद ही करू शकता. किंवा फेरबदल पण करू शकता त्याकरिता आपल्याला https://pdeigr.maharashtra.gov.in/
या वेबसाईट वरती जावे लागेल.
About this post :-
आपण या पोस्ट मध्ये पाहिले की सातबारा म्हणजे काय असतो आणि ऑनलाईन सातबारा कसा काढायचा? फी पद्धतीने सातबारा कसा काढायचा? फ्री मध्ये सातबारा कसा काढायचा? रजिस्ट्रेशन कसे करावे? सातबाराचा उपयोग कोठे केला जातो?महाभुलेख वेबसाईट काय आहे? सातबार ऑनलाईन काढला तर त्यावर तलाठ्याची सही लागते का?
मी अशा करतो की आपल्याला पोस्ट आवडली असेल. आवडली असेल तर शेअर करा आणि आमच्या वेबसाईटला बुकमार्क करून ठेवा.