Sign Up

Sign In

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

Past Continuous Tense in Marathi

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये मी आपल्याला इंग्लिश मध्ये असलेला एक महत्त्वाचा काळ सांगणार आहे. आपल्याला अनेक स्पर्धा परीक्षांच्या मध्ये English Tense वरती प्रश्न विचारले जातात. मात्र आपल्याला इंग्लिश मधील असलेले काल समजून न आल्यामुळे आपण ते प्रश्न सोडवणे मध्ये चूक करतो.

इंग्लिश मध्ये प्रामुख्याने 12 काळ दिसून येतात. यामध्ये भूतकाळ यामध्ये चार काळ आहेत.तर त्या काळापैकी एक काळ चालू भूतकाळ यांचा अभ्यास आपण या पोस्टमध्ये करणार आहोत.

Continuous Past Tense (चालू भूतकाळ)

If an action was going on continuously in the past, we use Past Continuous Tense to tell about it

चालू भूतकाळ मध्ये प्रामुख्याने ज्या घटना चालू भूतकाळ मध्ये घडले आहेत त्या दर्शवल्या जातात त्यांचा अभ्यास करतो. हे आपण एका उदाहरणावरून लक्षात घेऊ.

मी जेवत होतो.I was Eating.

चालू भूतकाळ कसा ओळखावा?

 • चालू भूतकाळ ओळखण्यासाठी आपल्याला त्या वाक्यातील क्रियापद समजून घ्यावे लागेल. वाक्याच्या शेवटी त होतो. दिलेले असेल तर तू काळ चालू भूत काळ आहे असे समजून घ्यावे. उदाहरणार्थ: मी जेवत होतो, मी शाळेला जात होतो.
 • त्याचप्रमाणे इंग्लिश मध्ये Was/were + (verb)ing असेल तर त्याला चालू भूतकाळ म्हणतात. E.g. I was eating, I was going to school.

Rules Of Past Continuous Tense in Marathi

 • Subject नंतर कायम was/were चा वापर केला जातो.
 • Was/were नंतर auxiliary verb ला ing प्रतेत्य असतो.

e.g

 1. was/were going
 2. was/were coming
 3. was/were watching
 4. was/were writing

जेव्हा आपण You,We,They आणि अनेक वचनी नाम वापरतो तेव्हा were चा वापर करावा अथवा was चा वापर करावा.

Structure And Formula Of Past Continuous Tense In Marathi

Affirmative sentence (सकारात्मक वाक्य)S+ Was/Were+ (V+ing)+ O
Negetive sentence (नकारात्मक वाक्य) S+ Was/Were+ (not)+ (V+ing)+ O
Affirmative Interrogative Sentence(सकारात्मक प्रश्नार्थक वाक्य)Was/Were + S + (not)+ (V+ing)+ O+ ?
Negetive Interrogative Sentence(नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य)Was/Were + S + (not)+ (V+ing)+ O+ ?

Past Continuous Tense Example In Marathi

Affirmative Sentences – सकारात्मक वाक्य

 1. I was drinking a water. – मी पाणी पीत होतो.
 2. You were looking good. – तू चांगली दिसत होतीस.
 3. She was doing her homework. – ती अभ्यास करत होती.
 4. He was playing cricket. – तो क्रिकेट खेळत होता.
 5. We were dancing. – आम्ही नाचत होतो.

Negative Sentences – नकारात्मक वाक्य

 1. I was not eating a mango. –मी आंबा खात नव्हतो.
 2. He was not running. – तो पळत नव्हता.
 3. They were not buying a car. – ते गाडी विकत घेत नव्हते.
 4. Boys were not shouting loudly. – मुलं जोरात जोरात ओरडत नव्हती.
 5. I was not playing cricket. — मी क्रिकेट खेळत नव्हतो.

Interrogative sentences – प्रश्नवाचक वाक्य

 1. Was I doing fine? – मी बरोबर करत होतो का?
 2. Was my father watching me angrily? – माझे बाबा माझ्याकडे रागाने बघत होते का?
 3. Were they celebrating the birthday? ते वाढदिवस साजरा करत होते का?
 4. What were you doing when the accident happened? – अपघात झाला तेव्हा तू काय करत होतास?
 5. When was he coming from the Pune? – तो पुण्याहून कधी होणार होता?

Negative Interrogative Sentences – नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य

 1. Was I not doing fine? – मी बरोबर करत नव्हतो का?
 2. Were they not celebrating the birthday? – ते वाढदिवस साजरा करत न्हवते का?
 3. Where were boys not going? – मुलं कुठे जात नव्हती का?
 4. Was she not playing volleyball? – ती व्हॉलीबॉल खेळत नव्हती का?
 5. Were students not studying? – मुले अभ्यास करत नव्हती का?

Leave a comment