राजगड विषयी माहिती जाणून घेऊया (Rajgad information in Marathi)

राजगड विषयी माहिती जाणून घ्या मराठीमध्ये (Rajgad information in Marathi)

राजगड म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हटले जाते.

राजगड किल्ला हा शिवाजी महाराज्यांच्या इतिहासामधील अतिशय महत्त्वाचा किल्ला मानला जातो. हा किल्ला शिवाजी महाराजाना अतिशय प्रिय असा किल्ला होता. शिवाजी महाराज या किल्ल्यावरील अनेक वर्षे वास्तव्य पण करून होते. यामुळेच कदाचित
शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव राजगड असे ठेवण्यात आले होते.

राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी तब्बल २६ वर्ष होती. याचे कारण म्हणजे हा किल्ला अतिशय दुर्गम भागांमध्ये आहे. या किल्ल्याची नैसर्गिक रचना अश्या पद्धतीने आहे की हा किल्ला काबीज करणे अतिशय अवगड कामगिरी आहे.
राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या जवळपास मध्यभागी येतो तसेच या किल्ल्यावरून इतर अनेक किल्ल्यांवर नजर देखील ठेवता येते या करिता महाराज्यांनी हा किल्ला आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून निवडले असावे.
Rajgad information in Marathi राजगड विषयी माहिती जाणून घेऊया
राजगड विषयी माहिती जाणून घेऊया

इतिहास:-

राजगड हे ‘हिंदवी स्वराज्य’ (हिंदू साम्राज्य) ची राजधानी म्हणून ओळखले जात असे आणि भारतातील किल्ल्यांचा राजा असल्याचे मानले जाते. त्याचा इतिहास १६४६-४७चा आहे. राजगड किल्ला मराठ्यांच्या अनेक महत्वाच्या लढायांचा साक्षीदार होता. शिवाजीचा मुलगा संभाजी मरण पावल्यानंतर १८८९ मध्ये मोगलांनी हा कब्जा केला. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले बहुतेक आयुष्य राजगड किल्ल्यावर घालवले.

राजगड किल्ल्यावर कसे जावे??

राजगड किल्ला पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर आहे?पुण्यावरून जायचे म्हटले तर राजगड ला जाण्यासाठी नसरापुर वरून जावे लागते तर दुसऱ्या बाजूला वेल्हे म्हणून गाव आहे तेथून जावे लागते. हा रस्ता सिंहगड वरून येतो.राजगडच्या पायथ्याशी गुंजवणे नावाचे गाव आहे.राजगडला जाण्यासाठी प्रत्येक माणसाला पंधरा रुपये फी आहे तर चारचाकी गाडी घेऊन जायचे असेल तर चाळीस रुपये इतकी फी आहे.त्याचप्रमाणे दुचाकीसाठी पंधरा रुपये पार्किंग फी आहे.गडावर पोहोचण्यासाठी आपल्याला पायी चालत गेले असल्यास दोन ते तीन तास लागतात.राजगडावरती जातांना आपल्याला अनेक ठिकाणी नेढे पण दिसतील. नेढे म्हणजे डोंगराला पडलेले भगदाड.त्याचप्रमाणे आपल्याला सिंहगड,तोरणा,पुरंदर देखील पाहायला मिळेल.

पाली दरवाजा:-

किल्ल्यावरील सर्वात मुख्य दरवाजा म्हणजे पाली दरवाजा होय या दरवाजाच्या पुढे आपल्याला एक पायवाटदेखील दिसून येते. हा दरवाजा अतिशय कमी वेळा वापरला गेला आहे असे दिसून येते. या दरवाज्याच्या वापर २५% कामासाठी केला गेला असेल असं दिसून येतं.

चोर दरवाजा:-

किल्ल्याच्या एका दिशेला बोला चोरदरवाजा दिसून येईल याचा वापर महाराज आपल्या गुप्तहेरांची बातचीत करण्यासाठी केले जात असतील.शिवराय गडावर येण्यासाठी जवळपास ७५ टक्के या दरवाजाचा वापर करत असत.
राजगड विषयी माहिती जाणून घेऊया (All Information About Rajgad In Marathi)
Source: Wikipedia

पद्मावती तलाव:-

किल्ल्यावरती एक तलाव आहे त्या तलावाचं नाव पद्मावती तलाव आहे. येथील वातावरण फार निसर्गरम्य आहे.त्या ठिकाणी आपल्याला एक दरवाजा दिसून येतो त्या दरवाजा वरून असे वाटते की जुन्या काळात हा तलाव बंद ठेवण्यात आला होत.
तलावाच्या जवळ आपल्याला एक माची दिसून येते त्या माझे नाव पद्मावती माची आहे. या माचीवरून शिवरायांचे मावळे गडावर नजर ठेवायचे.
गडाच्या वरती आपल्याला एक पर्यटक निवास देखील दिसून येतो या ठिकाणी पर्यटकांना राहण्याची सोय केली गेली आहे.
त्याचप्रमाणे गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी व संभाजी महाराजांच्या माता सईबाई यांची समाधी आहे.

पद्मावती मंदिर:-

गडाच्या वरती पद्मावती देवीचे मंदिर आहे. थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला रामेश्वराचे देखील मंदिर दिसून येते.जेव्हा शिवरायांनी आपल्या किल्ल्याची बांधणी केली वापर राजधानी म्हणून निवडले त्यावेळी या मंदिराची स्थापना करण्यात आली व या ठिकाणी पद्मावती देवी स्थानापन्न करण्यात आली.
गडावरती आपल्याला दारूगोळ्याचे कोठार दिसून येते त्याचप्रमाणे त्या याठिकाणी अंबरखाना देखील दिसून येतो, या ठिकाणी पूर्वीच्या काळी हत्ती ठेवले जात होते.अंबर खाण्याच्या मागे देखील एक छोटासा तलाव आहे कदाचित हा तलाव हा हत्तींच्या साठी बनवला गेला असेल, या ठिकाणी पोहोचतात आपल्याला तोरणा किल्ल्यावरील दृश्य दिसून येते.

सदर:-

जेव्हा स्वराज्याची राजधानी राजगड होती त्यावेळी याठिकाणी मोठे निर्णय घेतले जात असत. “आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे ” हे बोल वीर तानाजी मालुसरे यांनी याच किल्ल्यावर ती बोलले होते तेही या किल्ल्याने ऐकले आहे.ज्यावेळी हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता त्यावेळी अनेक निर्णय या सदरे मध्ये घेतले जात असेल मात्र आता हा सदर बंद आहे.

बालेकिल्ला:-

राजगडावरील बालेकिल्ला हा सर्वात उंच ठिकाण मानले जाते.सदरच्या वरती थोडे चालून गेल्यानंतर आपल्याला बालेकिल्ला दिसून येतो. याठिकाणी जुन्या काळातील काही तोफांचे अवशेष देखील दिसून येतात. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला भरपूर चढाई करावी लागते त्याचप्रमाणे येथे जाताना आपल्याला एक भक्कम दरवाजा दिसून येतो. बालेकिल्ल्यावर आपल्याला जननी देवीचे मंदिर देखील दिसून येईल. बालेकिल्ल्यावर आपल्याला बाजारपेठ व सुंदर देखील दिसून येईल. त्याचप्रमाणे बालेकिल्ल्यावर आपल्या जिजाऊंची निवासस्थान दिसून येते व शिवरायांच्या आठ बायकांचे निवासस्थान देखील दिसून येते.

 अर्धचंद्राकार तलाव:-

किल्ल्यावर अनेक तलाव दिसून येतात त्यापैकी एक म्हणजे अर्ध चंद्राकार तलाव होय. या तलावाचा आकार अर्धचंद्राकृती आहे म्हणून याला असे नाव पडले असेल.
बालेकिल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला तिथे अर्धचंद्राकार तलाव देखील दिसून येतो.

बालेकिल्ल्यावरील सदर:-

बालेकिल्ल्यावर गेल्यावर ते आपल्याला एक सदर देखील दिसून येईल या ठिकाणी पूर्वी शिवाजी महाराजांचा राजमहाल होता मात्र काळाच्या होगा मध्ये तो नष्ट झाला आहे.

संजीवनी माची:-

किल्ल्यावर आपल्याला आणखी एक मोठी माहिती दिसून येईल त्यांचीच नावे संजीवनी माची या माची कडे जाताना आपल्याला अनेक पाण्याची जलाशय दिसून येतात.या माचीवरून आपल्याला किल्ल्याचा मुख्य दरवाजा पाली दरवाज्याकडे येणार आहेत राजमार्ग दिसून येतो कदाचित ही माझी किल्ल्यावर येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी तयारी केलेली असावी. या संजीवनी माचीवर एकूण 19 बुरूज आहेत या माचीची लांबी जवळपास अडीच किलोमीटर इतके आहे.त्याचप्रमाणे या माचीवरून स्वराज्याची राजधानी रायगड देखील दिसून येते.
राजगड विषयी माहिती जाणून घेऊया (All Information About Rajgad In Marathi)

संजीवनी माची

सुवेळा माची:-

राजगडावर आणखी एक माची दिसून येते त्या माचीचे नाव सुवेळा माची.या माचीची लांबी जवळपास दोन ते तीन किलोमीटर इतकी आहे.
या माचीकडे जाताना आपल्याला एक दरवाजा लागतो त्याचं नाव आहे गुंजवणे दरवाजा.हा एक दरवाजा नसून या ठिकाणी तीन दरवाजे आढळून येतात एकापाठोपाठ एक असे तीन दरवाजे आहेत.
राजगड विषयी माहिती जाणून घेऊया (All Information About Rajgad In Marathi)
Source: Wikipedia

चिलखती बुरुज:-

सुवेळा माचीवर जाण्याच्या अगोदर आपल्याला चिलखती बुरुज दिसून येतो.हा बुरुज सुवेळा माचीचे संरक्षण करण्यासाठी बनविण्यात आला होता.

अधिक माहिती:-

छत्रपतींनी राजगड या किल्ल्याने आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून का निवडला असेल??

राजगड किल्ला चढण्यासाठी जरी आपण कोणत्याही बाजूने सुरुवात केली तर त्याच बाजूला आपल्याला टेकडी तलाव किंवा कोणते तर नदी लागतील त्यामुळे या किल्ल्यावर चढाई करताना आपल्याला फार त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे या किल्ल्यावरून इतर किल्ले आपल्याला दिसतात जसे की तोरणा,रायगड,पुरंदर, सिंहगड.
ज्यावेळी पुरंदरचा तह करण्यात आला त्यावेळी शिवरायांनी इतर किल्ले दिले मात्र राजगड किल्ला दिला नाही कारण की या किल्ल्याची रचना अत्यंत दुर्गम आहे याठिकाणी शत्रूला चढाई करण्यास किंवा स्वराज्यावर आक्रमण करण्यास कठीण जाईल.

About this post:-

आपण या पोस्ट मध्ये पाहिले की राजगडाचा इतिहास ,राजगड किल्ल्यावर कसे जावे?? पाली दरवाजा-चोर दरवाजा,पद्मावती तलाव,पद्मावती मंदिर,सदर,बालेकिल्ला , अर्धचंद्राकार तलाव, सदर
संजीवनी माची, सुवेळा माची चिलखती बुरुज.
मी अशा करतो की आपल्याला पोस्ट आवडली असेल. आपल्या मित्रांसोबत शेअर करा व आमच्या वेबसाईटला बुकमार्क करून ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *