Chatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi | छत्रपती संभाजी महाराज इतिहास मराठीमध्ये

जय जिजाऊ || जय शिवाजी || जय संभाजी ||

नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये मी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी माहिती सांगणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होय. छत्रपती संभाजीराजांना स्वराज्याचे धाकले धनी असे म्हणून ओळखले जाते. संभाजी राजांना त्यांच्या इतिहासामुळे खूप नावाजली जाते. त्यांचे पराक्रम सर्वदूर पसरले आहेत.छत्रपती संभाजी महाराजांना जगातील सर्वात वीर पुत्र मानले जाते. अतिशय धैर्यशील राजे होते.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काय असेल हे आपल्याला ह्यावरून समजून येईल की त्यांनी फक्त आपल्या ३१ वर्षाच्या जीवनामध्ये जवळपास १४० लढाया जिंकल्या होत्या.

Sambhaji Maharaj Childhood | छत्रपती संभाजी महाराज यांचे बालपण:-

छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्ण नाव संभाजी शिवाजी भोसले. ते शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र होते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावरती झाला होता.छत्रपती संभाजी महाराज जन्म व शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांच्या पोटी झाला होता. छत्रपती संभाजी राजांचे वय दोन वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडील सतत एका युद्धातून दुसऱ्या मध्ये जात असत त्यामुळे त्यांचा सांभाळ जिजाबाई आणि पुतळाबाई यांनी केला.
संभाजी राजे राजपुत्रास लागणाऱ्या लहानपणापासून स्वराज्याचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यांना अनेक भाषा येत होत्या.ते अत्यंत धुरंधर होते त्यांना राजकारणाविषयी भरपूर माहिती होती. त्यांना स्वराज्य मधील बारकावे माहिती होते.
छत्रपती संभाजी महाराज आपल्या वयाच्या आठव्या वर्षीच जवळपास १४ भाषांचे पंडित झाले होते. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी राजगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आग्र्याला प्रस्थान करावे लागले.
वयाच्या नव्या वर्षी ते हजार मैल घोड्यावर बसून जाऊ शकतात आणि आग्रा मध्ये जाऊन जवळपास वर्षभर नजर केल्या मध्ये राहू शकतात तर तुम्ही अंदाज बांधू शकत नाही किती राजपुत्र कशा रीतीचे होते?
त्याचप्रमाणे असे म्हणले जाते की छत्रपती संभाजी महाराजांनी राजकारण व बुद्धिचातुर्य आग्र्यामध्ये नजरकैदेत असताना शिकले होते.

Sambhaji Maharaj Teenage | किशोरवयातील छत्रपती संभाजी महाराज:-

छत्रपती संभाजी महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी राजकारण,अर्थशास्त्र, युद्धकौशल्य,कायदे व सुव्यवस्था यात तरबेज झाले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी ज्याने तीन ग्रंथ लिहिले होते, ते तिन्ही ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिले गेले होते.नखशिखांत,नायीकाभेद, सात शतक असे त्या ग्रंथांची नावे आहेत.
नखशिखांत ग्रंथांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी भगवान गणेशाचे वर्णन केली आहे. त्यांनी केलेले वर्णन हे अतिशय दुर्मिळ वर्णन आहे.
आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी गणेशावर लिहलेले आहे त्याच्या पैकी हा एक चांगला ग्रंथ मानावा लागेल.

Sambhaji Maharaj Rajybhishek राज्याभिषेक:-

१६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाल्यावर ते स्वराज्याचे राजे बनले. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज राजे बनले त्यावेळी त्यांना असे लक्षात आले की, आपल्याच राज्यांमध्ये धनधान्याची कमी आहे. यामुळे औरंगजेबाच्या ताब्यात असलेल्या बुऱ्हानपूर या ठिकाणी हल्ला केला, व त्या ठिकाणी लयलूट केली.
हे ऐकल्यानंतर औरंगजेब क्रोधित झाला व त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वर हल्ला करायचे ठरवले. म्हणून तो आग्र्यावरून निघाला.
औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर हल्ला करताना आपल्या बरोबर पाच लाख सैनिक त्याबरोबर चार लाख जनावरे यामध्ये हत्ती,घोडे,उंट यांचा समावेश होता.
मराठ्यांची खरी ताकद आपल्या किल्ल्यामध्ये असते म्हणून औरंगजेबाने पहिल्यांदा किल्ले काबीज करायला सुरुवात केली. त्याने नाशिक मध्ये असलेला रामशेज किल्ल्यावरती हल्ला चढवला. यामुळे मोहिमेकरता औरंगजेबाने आपला सेनापती शहाबुद्दीन खान आपल्या 10000 सैन्याबरोबर रामशेज किल्ल्यावर हल्ला चढवला. शहाबुद्दीन खान त्याने औरंगजेबाला सांगितले होते की एका दिवसामध्ये मी किल्ला जिंकून येईल. त्याने पहिल्या दिवशी किल्ल्यावरती घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र मराठा सैन्याने त्याचे स्वागत दगडाने आणि गोळ्यांनी केले.
त्याने जवळपास दोन वर्षे प्रयत्न केला मात्र त्याला किल्ला जिंकता आला नाही. त्यामुळे औरंगजेबाने त्याला परत बोलावून घेतले.
त्यानंतर औरंगजेबाने त्याचा दुसरा सेनापती फतेह खान याला रामशेज किल्ला जिंकण्यासाठी पाठवले.
हे पण नक्की वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *