Sign Up

Sign In

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

Shivneri Fort Information In Marathi – शिवनेरी गडा विषयी माहिती मराठीमध्ये

शिवनेरी गडा विषयी माहिती मराठीमध्ये (Shivneri Fort Information In Marathi )

जय शिवराय मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण किल्ला शिवनेरी विषयी माहिती. याच किल्ल्यावर आपल्या सर्वांचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म माता जिजाऊंच्या पोटी झाला होता. शिवनेरी किल्ल्याची समुद्रसपाटीपासून जवळपास ३५०० हजार फूट इतकी उंच आहे.आणि हा किल्ला महाराष्ट्र वन विभागाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे किल्ल्यावर तुम्हाला अनेक गार्डन दिसतील. शिवनेरी किल्ल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या शिवकालीन पायर्‍या दिसून येतात.११७० ते १३०८ या कालावधीमध्ये आणि आपले राज्य स्थापन करून शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त करून दिले.

Shivneri Fort Information In Marathi

शिवनेरी किल्ल्यावरती कसे जावे??

शिवनेरी किल्ला पुण्यापासून जवळ पास एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे.या किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर नावाचे गाव आहे.आपल्याला किल्ल्यावरती जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही किल्ल्यावर जाऊन व्हिडिओ काढतो म्हटला तर चालणार नाही. पायऱ्यावरून जाताना किल्ल्यावर जायला जवळपास तुम्हाला अर्धा तास इतका वेळ लागेल.

महादरवाजा:-

किल्ल्यावरती आपल्याला प्रवेशाकरिता एक दरवाजा लागतो त्या दरवाजाला महादरवाजा असे म्हणतात.दरवाजाच्या वरती चढायला आपल्याला पाहायला सुद्धा पाहायला मिळतील.शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याठिकाणी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी कदाचित या दरवाजाचा बुरूज म्हणून वापर केला जात असे.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर आढळून येणारे दरवाजे यांच्यामधील अंतर जवळपास 100 मीटर इतकी आहे.

गणेश दरवाजा:-

किल्ल्यावरील थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला एक दुसरा दरवाजा दिसून येतो त्या दरवाजाच्या नाव आहे गणेश दरवाजा.

पीर दरवाजा:-

किल्ल्यावर जातांना आपल्या तिसरा दरवाजा आढळून येतो या दरवाज्याचे नाव आहे पीर दरवाजा. या दरवाज्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

तानाजी मालुसरे उद्यान:-

गडावरती गेल्यानंतर आपल्याला तानाजी मालुसरे उद्यान आपल्या डाव्या हाताच्या बाजूला दिसून येते.

हत्ती दरवाजा:-

दरवाजे पार करून पुढे करून पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन पाण्याच्या टाक्या दिसतील.

मेना दरवाजा:-

हत्ती दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला मेणा दरवाजा लागतो. मेणा दरवाजाच्या पुढे असलेला कुलूप दरवाजा देखील दिसून येतो.
नगरवाला यांनी कुलूप दरवाजा वरती पूर्वीच्या काळच्या दरवाजे काढून त्या ठिकाणी नवीन दरवाजे बसवण्यात आले आहेत.
शिवनेरी गडा विषयी माहिती मराठीमध्ये (Information About Shivneri Fort In Marathi)
Source: Wikipedia

अंबरखाना:-

जेव्हा आपण गडावर पोचल्यानंतर आपल्याला समोरच अंबरखाना दिसून येतो.अंबरखाना दोन वाटा आहेत एक वाट आहे ते समोर असलेल्या टेकडी पाशी घेऊन जाते तर दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.
शिवजन्मस्थळ कडे जाताना आपल्याला अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या देखील दिसून येतात.

शिवकुंज:-

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून आठवण ठेवली जावी म्हणून या ठिकाण  इमारत उभी केली आहे ती म्हणजे शिवकुंज होय. या ठिकाणी तुम्हाला जिजामातांची छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती दिसून येईल. या मूर्तीमध्ये जिजामाता बाल शिवरायांना तलवार चालवण्याची धडा शिकवत आहेत.

कमानी मस्जिद:-

शिवनेरी किल्ल्यावर ते आपल्याला शिवकुंजासमोरच कमानी मस्जिद दिसून येईल.

हमामखाना:-

कमानी मस्जिदच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला एक हमामखाना दिसून येतो.

शिवजन्मस्थळ:-

हमाम खाण्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला शिवजन्मस्थळ दिसून येईल. १९ फेब्रुवारी १६३० रोजी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.हि इमारत दोन मजली असून, शिवरायांचा जन्म खालच्या खोलीमध्ये झाला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे.
शिवनेरी गडा विषयी माहिती मराठीमध्ये (Information About Shivneri Fort In Marathi)
Source: Wikipedia

बदामी टाकी:-

शिवजन्मा त्यापासून आपण थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला एक टाकी दिसून येते त्या टाकीच्या नाव बदामी टाकी आहे. याचे नाव बदामी टाके असे त्याच्या आकारावरून ठेवण्यात आले आहे.

कडेलोट टोक:-

बदामी टाक्याच्या पुढे आपल्याला कडेलोट टोक दिसून येते.या कड्याची उंची जवळपास दीड हजार फूट इतकी आहे. याचा उपयोग गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी केला जात असे.

शिवाई देवीचे मंदिर:-

किल्ल्यावर ती गेल्यानंतर आपल्याला देते शिवाय देवीच्या मंदिर देखील दिसून येते. या मंदिराकडे जाताना आपल्याला एक दरवाजे लागतो तो दरवाजा पार करून आपण त्या मंदिराकडे जाऊ शकतो.मंदिरापासून पुढे गेल्यानंतर आपल्याला दगडामधे कोरलेल्या काही लेण्या आढळून येतात.

इतर माहिती:-

सन १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी मार्फत डॉक्टर जॉन फायर यांनी या किल्ल्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की,हजार कुटुंबांना पाळण्यासाठी ७ वर्षा साठी लागणारी साधन सामुग्री या किल्ल्यावर उपलब्ध आहे सांगितले.
शिवनेरी किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा दिसून येतो.

Leave a comment