श्रावण महिना माहिती मराठीमध्ये | shravan mahina Information in Marathi

Shravan Mahina Information in Marathi | Nagpanchami | Shravan Somvar vrat | Raksha Bandhan | Shrikrishna Janmasatmi | Dahi handi

आपण दरवर्षी हिंदू धर्मात श्रावण महिना पाळतो. श्रावण महिन्यामध्ये अनेक नित्य धर्म करत असतो. श्रावणामध्ये देवाची उपासना करतो. पण आपल्याला माहिती नसते की आपण हे सर्व का करत आहोत. या मागचा उद्देश काय आहे?

काय आपण सर्वांनी श्रावण महिना पाळला पाहिजे? हिंदु धर्म ग्रंथ भगवतगीता मध्ये असं कुठे लिहून ठेवलंय काय? असे अनेक प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात. तर या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल.

Shravan Mahina Information In Marathi Eassy

श्रावण महिना केव्हा असतो?

श्रावण महिना हा हिंदू दिनर्शिकेप्रमाणे पाचवा महिना आहे. सन २०२० मध्ये श्रावण महिना २१ जुलै ला चालू होवून १९ ऑगस्टला संपणार आहे.
आणि ग्रेगरी दिनदर्शिका नुसार जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येतो. दर्ष सोमावती अमावस्या आषाढ महिन्याचा शेवटी असते ही अमावस्या झाली की श्रावण महिन्याचा प्रारंभ होतो. आणि हा महिना दर्श पिठोरी अमावस्या येयीपर्यंत चालू असतो.
श्रावण महिन्यामध्ये एकूण ३० दिवस असतात. त्याच प्रमाणे या महिन्यामध्ये हिंदू संस्कृती मधील अनेक सन असतात यामध्ये, नागपंचमी, रक्षाबंधन, श्री कृष्ण जन्माष्टमी आहेत.
श्रावण महिना हा मान्सून नंतर येतो. त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला निसर्गाचे एक वेगळे रूप दिसून येत. या महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असते, रिमझिम पाऊस दिसून येतो.

श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व:-

श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व देखील भरपूर आहे. अनेक लोक श्रावण महिन्यामध्ये उपवास करतात. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी श्रावण सोमवार पाळला जातो आणि भगवान शिवाची पूजा अर्चा मनोभावे केली जाते.
श्रावण महिन्यामध्ये कोणतेही काम केले तर ते यशस्वी होते असे हिंदू धर्माची मान्यता आहे. कारण या महिन्यामध्ये सर्व देवी देवता जागृत असतात आणि आपण त्यांची मनोभावे सेवा केली अथवा उपवास धरला तर तो त्यांच्यापर्यंत योग्य रीतीने पोहचतो असे मानले जाते.
या काळामध्ये अनेक लोक आपल्या घरामध्ये सत्य नारायण देवाची पूजा पण घालतात. सत्य नारायण देवाची पूजा घातल्यामुळे आपल्या घरात सदैव लक्ष्मी देवी व भगवान विष्णू यांचा वास होतो असे सांगितले जाते.
श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात या करिता श्रावण सोमवारचा व्रत धरतात. त्याचप्रमाणं ज्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्या आहेत ते लोक देवाची पूजा अर्चा करण्यासाठी आपापल्या गावातील देवळांमध्ये जाऊन राहतात व सदैव देवाचे स्मरण करत असतात.
श्रावण महिन्यामध्ये सर्व देवी देवता जागृत असतात त्यामुळे लोक देवदर्शनाला पण जातात. यामुळे त्यांना आपल्या मनाचे समाधान पण मिळते व देवाची सेवा करण्याची संधी पण मिळते.
त्याचप्रमाणं श्रावण महिन्यामध्ये मा वसारी जेवण करणे टाळले जाते.कारण की हा महिना अतिशय पवित्र आहे या महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये कोणत्याही जीवाचे प्राण जाऊ नये त्याचप्रमाणे या काळामध्ये मासेमारी करणे पण येता येत नाही त्यामुळे मास मिळणे कठीण असते, यामुळे नियमाचे पालन केले जाते.

श्रावण महिन्यामध्ये असलेले सण :-

श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यांमध्ये हिंदू धर्मात अनेक सण उत्सव देखील असतात. श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार,नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे अनेक महत्वाचे सण उत्सव असतात.

श्रावण सोमवार :-

श्रावण महिन्यात श्रावण सोमवार हा नित्य नियमाने पाळला जातो. सोमवार हा दिवस भगवान शिवाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येक शिवाच्या मंदिरात मोठ्या मनोभावे शिवाची पूजा केली जाते. शंकराची मूर्ती असो व पिंड दूध घालून अभिषेक केला जातो. हा दिवस शिव भक्तांसाठी फार महत्वाचा असतो. अनेक लोक महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास पण करतात.

नागपंचमी:-

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. नागपंचमी अमावस्या नंतर ४ था दिवस असतो. या सणा दिवशी प्रत्येक घरांमध्ये नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते. त्याला नैवेद्य दाखवला जातो.नागपंचमी साजरी करताना आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या नागाच्या प्रतिमेची पूजा करतात तर त्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये.
 नागपंचमी या सणाला घरामध्ये फराळ देखील केला जातो, यामध्ये चकली,शंकरपाळी, लाडू, चिवडा केले जातात. त्याचप्रमाणे या सणाला प्रामुख्याने लढाया ल्हाया, हरभरा यासारखे काही फराळाचे पदार्थ केले जातात.
नागाची पूजा करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे नागाला पुजवताना त्याची आळूच्या पानामध्ये पूजा करावी. नागाला नैवेद्य दाखवण्यासाठी देखील अळूचा वापर करावा.
नागपंचमी दिवशी साठी खास अळू पासून बनणारे पदार्थ देखील करू शकतो. याच्यामध्ये आलूचा फतफत, आळुच्या वड्या या सारख्या पदार्थांचा समावेश करू शकतो.
नागपंचमीच्या सणाला अनेक गावांमध्ये घराघरांमध्ये फराळाचे वाटप केले जाते. हा सण साजरा केल्यामुळे अशी मान्यता आहे की, आपण जर नागाची पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधीही नागदेवता वास करणार नाही त्यांचा कोणताही त्रास आपल्याला होवू शकणार नाही.
अनेक ठिकाणी अशीही मान्यता आहे की, जर आपण घरामध्ये नागपंचमी साजरी केली तरच आपल्या घरामध्ये आपल्याला गणेश चतुर्थी साजरी करता येईल.

रक्षाबंधन:-

भावा बहिणींच्या नात्यांमधील एक अतूट सन म्हणजे रक्षा बंधन होय. हा सण नारळी पौर्णिमला असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतात भलेही ती कोणतीही भेट वस्तू असुदेत.
या सणाला कोळी लोक देखील मोठ्या उत्साहाने साजरे करतात. कारण पावसाळा चालू असताना त्यांना समुद्रात जाता येत नाही मात्र नारळी पौर्णिमा या दिवशी ते समुद्रात जाऊन आपले काम चालू करतात.

श्री कृष्ण जन्माष्टमी:-

श्री कृष्ण जन्माष्टमी हा देखील सण श्रावण महिन्यामध्ये येतो. जन्माष्टमी हा दिवस अमावस्येचा आठव्या दिवशी असतो.श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण भगवान श्री कृष्ण यांचा जन्म दिवस आहे म्हणून साजरा केला जातो.
श्री कृष्ण यांचा जन्म मथुरा मध्ये झाला होता त्या वेळी तेथे मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला होता,तेव्हापासून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं की मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक मध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. या दहीहंडी उत्सवात अनेक लहान मोठे गोविंदा मोठ्या प्रमाणात भाग घेतात.

श्रावण महिन्यामध्ये उपवास का केलो जातो? :-

तस पाहिले तर हिंदू संस्कृती मध्ये पहिला महिना चैत्र महिना असतो आणि श्रावण महिना पाचवा महिना आहे. जसा आषाढ महिना भगवान विष्णूचा असतो त्या महिन्यामध्ये आपण आषाढी एकादशी साजरी करतो, मुस्लिम धर्मांमध्ये ज्या प्रमाणे रमझान महिना असतो
 व उपवास धरतो,त्याचप्रमाणं श्रावण महिना हा भगवान शंकराचा मानला जातो.
या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकराला प्रसन्न करायचे असेल तर आपण भगवान शंकराचा उपवास करून करू शकतो यासाठी श्रावण महिन्यामध्ये उपवास करायची प्रथा आहे.
श्रावण महिन्यात उपवास केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व पाप कमी होवून जातील अशीही काहीशी मान्यता आहे. त्याचप्रमाणं श्रावण महिन्यामध्ये उपवास करण्यासाठी आपण फक्त फलाहार घेवू शकतो अशीही मान्यता आहे.

श्रावण महिन्यात येणारे पवित्र दिवस:-

श्रावण महिन्यात दर मंगळवारी मंगळागौरी पूजन केले जाते. सोमवारी भगवान शंकराची उपासना करून उपवास धरला जातो व श्रावण सोमवार पाळला जातो. सोमवारी शिवामूठ पण केली जाते. महालक्ष्मीचे व्रत दर शुक्रवारी केले जाते.नागपंचमी सन पाचव्या दिवशी येतो.
त्याच प्रमाणे चातुर्मासाच प्रारंभ पण श्रावण महिन्यात केला जातो. हा चातुर्मास श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक या महिन्यात केला जातो.

About this post:-

आपण या पोस्ट मध्ये,श्रावण महिना केव्हा असतो?,श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व,श्रावण महिन्यामध्ये असलेले सण,श्रावण महिन्यामध्ये उपवास का केलो जातो?,श्रावण महिन्यात येणारे पवित्र दिवस
या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत जर आपल्याला आणखीन माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा.
पोस्ट आवडल्यास मित्रांना पण पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *