श्रावण सोमवार व्रतकथा मराठीमध्ये | Shravan Somvar vrat Katha in marathi
नमस्कार मित्रांनो,
श्री भगवान शंकराचा प्रिय महिना म्हणजे श्रावण महिना होय. जसे की आपल्याला माहिती आहे की,विष्णू देवाला आषाढ महिना प्रिय आहे त्या पद्धतीने शंकराला सुद्धा श्रावण महिना प्रिय आहे. मित्रांनो या पोस्टमध्ये आपल्याला सांगणार आहे की, श्रावणाच्या पहिल्या सोमवार पासून चालू होणारा १६ श्रावण सोमवारांची व्रतकथा. आपण का श्रावण सोमवार पाळले पाहिजे? श्रावण सोमवार यांची निगडित असलेली एक कथा देखील मी या पोस्ट मध्ये सांगणार आहे.
श्रावण सोमवार व्रत कथा:-
श्रावण सोमवारची अशी कथा आहे की, पूर्वी एका गावामध्ये फार मोठा सावकार राहत होता. त्याच्याकडे भरपूर भरपूर संपत्ती पण होती. पण तो कायम दुःखी असायचा. याचे कारण म्हणजे त्याला कोणतेही अपत्य नव्हते.
स्वतःला अपत्यप्राप्ती व्हावी यासाठी तो भगवान शंकराची उपासना करत असायचा. तो प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवास करायचा. दररोज संध्याकाळी भगवान शंकराच्या मंदिरा मध्ये जाऊन तेला तुपाचा दिवा लावत असायचा.
ही त्याच्या आस्था व श्रद्धा बघून, माता पार्वती प्रसन्न झाल्या. व त्यांनी भगवान शंकराला सांगितले की हा तुमचा निस्सीम भक्त आहे तुम्ही त्याला प्रसन्न व्हावे, त्याला दर्शन द्यावे. ते पार्वती माता चे शब्द ऐकून भगवान शंकराने म्हटले की त्या सावकाराच्या नशिबामध्ये त्याने मागच्या जन्मात केलेल्या पापामुळे अपत्य होणे शक्य नाही.
मात्र देवी पार्वती यांनी हट्ट केला व म्हटले की, आपण त्या भक्ताला प्रसन्न व्हावे. माता पार्वती च्या हट्टापायी भगवान शंकर,त्या सावकाराला त्याच्या झोपेमध्ये दर्शन देतात.आणि त्याला सांगतात की तुला अपत्याची प्राप्ती होईल मात्र तो अपत्य फक्त सोळा वर्षे जगेल. हे ऐकून सावकार खुश झाला मात्र त्याला चिंता सतावू लागली की माझा पुत्र फक्त सोळा वर्षे जगणार आहे.
ही गोष्ट त्यांनी आपल्या पत्नीला देखील सांगितली. ते ऐकून पत्नीदेखील चिंता मध्ये पडली,मात्र सावकाराने देवावरचा विश्वास सोडला नाही तो दररोज संध्याकाळी भगवान शंकराच्या मंदिरा मध्ये जायचं तुपाचा दिवा लावायचा.
काही दिवसानंतर भगवान शंकराने सांगितल्याप्रमाणे, सावकाराला अपत्याची प्राप्ती झाली. त्याला मुलगा झाला, त्या मुलाचे नाव अमर असे ठेवण्यात आले. जेव्हा त्याचे वय अकरा वर्ष झाले होत,तेव्हा सावकाराने त्याला अमरच्या मामा पाशी शिक्षा देण्यासाठी काशीला ठेवले.
काशीला जाताना त्याने आपल्या मेव्हण्याला व मुलाला सांगितले की, “मी तुम्हाला काही पैसे देत आहे. ते पैसे घ्या आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाताना मुक्काम कराल, त्या ठिकाणी असणाऱ्या ब्राह्मणांच्या सोबत यज्ञ करा व त्या ऋषीमुनींना जेवण द्या”.
अमर आणि त्याचा मामा ज्यावेळी काशीला जात होता. जाताना त्यांना मध्ये एक राज्य लागते. त्या राज्याचा राजकुमारी चंद्रिकाचा लग्न सोहळा असतो. आणि तिचा नवरा असतो तो काना होता.ही बाब राजकुमारी च्या घरी समजू नये यासाठी. नवऱ्याच्या बाबाने अमरला विनंती केली की तू राजकुमाराच्या ऐवजी लग्नामध्ये राजकुमारी बरोबर लग्न करावे.
अमर त्या गोष्टीला राजी होवून राजकुमाराच्या ऐवजी लग्नामध्ये बसायला तयार होतो.
मात्र ज्यावेळी राजकुमारी राजकुमाराच्या घराकडे जात होती. तेव्हा अमर राजकुमारीला जे खर आहे ते सांगून टाकतो.त्यामुळे राजकुमारी चंद्रिकेला राजकुमाराचे लग्न मोडते
व त्यानंतर अमर व त्याचा मामा काशीला जाऊन पोचतात.
ज्यावेळी अमरचे वय सोळा वर्षे होते त्यावेळी अमरचा मामा आणि अमर आपल्या घरामध्ये एका यज्ञाचे आयोजन करतो. ब्राह्मणांना अन्न व वस्त्र दान केले.
त्या दिवशी रात्री यज्ञ करून अमर व त्याचा मामा दोघेही झोपले. सकाळी मात्र अमरचा मृत्यू झाला. त्यामुळे अमरच्या मामाला रडू येत होते. त्याच वेळी त्या ठिकाणाहून माता पार्वतीने भगवान शंकर जात होते. हा आवाज ऐकून माता पार्वती भगवान शंकराला म्हणतात की,”आपण ज्या व्यक्तीला कष्ट होत आहे त्याचे दुःख कमी करावे”.त्यावेळी भगवान शंकर म्हणतात की,”हा त्यात सावकाराचा मुलगा आहे हे ज्याला मी सोळा वर्षे जगायचे वरदान दिले होते.”.
त्यावेळी माता पार्वती भगवान शंकराला म्हणतात की,”हे प्राणनाथ तो सावकार तुमची गेली सोळा वर्षे, प्रत्येक सोमवारी उपवास धरून तुमची उपासना करत आहे.तुमची सेवा करतो त्यामुळे तुम्ही कृपा करून त्याचे दुःख कमी करावे.”हे ऐकून भगवान शंकरांनी माता पार्वतीची विनंती स्वीकृत केली. आणि अमरला जीवन दानाचे वरदान दिले.
त्यानंतर आपली शिक्षा घेऊन आम्ही परत आपल्या गावी परत येत होता. गावी येताना तो ज्या राज्यांमध्ये गेला होता त्या राज्यांमध्ये परत जातो. पण तिथे जाऊन राजाची भेट घेतो.त्यावेळी राजकुमारी अमरला ओळखते व राजादेखील त्याला ओळखतो आणि राजकुमारीला त्याच्यासोबत आपल्या घरी पाठवून देतो.
दुसरीकडे सावकाराला आणि त्याच्या बायकोला माहिती असते की आपला मुलगा सोळा वर्षाच्या व यामध्ये मृत्यू पावणार आहे. त्यामुळे ते फार दुःखी असतात.त्यावेळी त्यांचा मुलगा अमर राजकुमारी चंद्रिका सोबत त्यांच्या घराकडे येऊन पोहोचतो.
अमर व त्याची मी चंद्रिका बायको जावे घरी येते त्यावेळी हे पाहून सावकार व त्याची बायको खूप प्रसन्न होते.त्या रात्री भगवान शंकर सावकाराच्या स्वप्नात येऊन सांगतात की तुझे सोळा वर्षे माझे व्रत करत करत होतास त्यावर त्यांना प्रसन्न होऊन मी तुझ्या मुलांना दीर्घायुषी होण्याचा वरदान दिले आहे.
तर अशा पद्धतीने सावकाराच्या आयुष्यामध्ये पुत्रप्राप्तीचा योग नसतानाही त्याने भगवान शंकराची आराधना केली. सोळा वर्षे भगवान शंकरसाठी सोमवारी उपवास केला. भगवान शंकराला प्रसन्न केले.
तशाच पद्धतीने येणारे सर्व मानव जातीला देखील. सतत भगवान शंकराची छत्रछाया असू देत. याकरिता श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण श्रावण सोमवार धरतो भगवान शंकराची मनोभावे पूजा करतो.
श्रावण सोमवारचे व्रत कसे करावे?
श्रावण सोमवारचे व्रत करणे अतिशय सोपे आहे. इतर व्रता सारखे श्रावण सोमवारचे व्रत नाही आहे. कारण जर आपण दुसऱ्या कोणत्या देवाचे व्रत धरले तर आपल्याला दिवसभर धरावे लागते. मात्र श्रावण सोमवारचे व्रत धरले असता. ते सकाळच्या प्रहराला मध्ये लागू असते.याचा अर्थ असा की ते व्रत सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत धरावे लागते.
या व्रतामध्ये तुम्ही संध्याकाळी जेवण केले तरी चालेल. आणि व्रत धरला असताना तुम्ही फलाहार केला तरी चालेल.
सण २०२० मध्ये श्रावण सोमवार २७ तारखेपासून चालू होणार आहेत.यामध्ये ४ श्रावण सोमवार येतात व दिनांक १९ ला श्रावण महिना संपणार आहे.
पहिला श्रावण सोमवार:- २७ जुलै २०२०
दुसरा श्रावण सोमवार :- ३ ऑगस्ट २०२०
तिसरा श्रावण सोमवार :- १० ऑगस्ट २०२०
चौथा श्रावण सोमवार :- १७ ऑगस्ट २०२०
पहिल्या श्रावण सोमवारी शिवमुठ तांदूळ आहे.
दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमुठ तीळ आहे.
तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवमुठ मुग आहे.
चौथ्या श्रावण सोमवारी शिवमुठ जवस आहे.
श्रावण मध्ये भगवान शंकराची पूजा कशी करावी?
१.शिव पुराण वाचा. प्रत्येक श्रावण सोमवारी व्रत धरलेला असो वा नसो प्रत्येकानं शिवाचे शिवपुराण वाचणे चांगले असते यामुळे पूजा संपन्न होते.
२-शिव गायत्रीची पुष्पहार घाला अन्यथा ३,५,७,११,१३ किंवा ३३ (सकाळी ११ वेळा , दुपारी २-३ दरम्यान ११ वेळा, संध्याकाळी ११ वेळा मंत्राचा जप करावा)शिवाचा शिवगायत्री मंत्र म्हणावा.एका दिवसात 33 असतील.
३.भगवान शिवच्या पूजेमध्ये तिघांच्या संख्येला विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास रुद्राक्ष तीन वेळा वाचा. किंवा ओम नमः शिवायच्या मंत्राने जप करा. एकदा, आपल्या कवटीवर हात ठेवल्यावर, मंत्र मोठ्याने वाचा. मग दोन्ही डोळ्यांवर आणि नंतर हृदयावर. हा मंत्र योगशास्त्राच्या प्राणायाम भ्रामरीसारखा असेल.
४.भगवान शंकराला ११ कमळांचे पाने अर्पण करा. श्रावणाचा संपूर्ण महिना कमळाची पाने काळी तीळ, आणि दुधासह अर्पण करायचा प्रयत्न करा.
५.भगवान शिव यांचा उपवास फक्त तीन तासांचा आहे. म्हणूनच सात्त्विक भावनेने पूजा करावी.
६. बेलाचे पत्र मिळाले नाही तर एक जनेऊ किंवा तीन किंवा पाच कमळ पाने अर्पण करा.
About This Post :-
आपण या पोस्ट मध्ये पाहिले की,
श्रावण सोमवारचे व्रत कसे करावे?,
श्रावण मध्ये भगवान शंकराची पूजा कशी करावी?
आपल्याला जर पोस्ट आवडली तर मित्रांसोबत शेअर करा. व आमच्या वेबसाईटला बुकमार्क करा.