Sinhgad Kondhana information In Marathi सिंहगड/कोंढाणा किल्ल्याविषयी माहिती मराठीमध्ये

Sinhgad kondhana information in Marathi (सिंहगड/कोंढाणा किल्ल्याविषयी माहिती मराठी मध्ये मिळवा.)

सिंहगड/कोंढाणा किल्ल्याविषयी माहिती मराठीमध्ये (Sinhgad/Kondhana information in Marathi)
 
 
जय शिवराय मित्रानो, आज मी आपल्याला शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्यामधील एक महत्वाचा किल्ला बगणार आहोत. सिंहगड(कोंढाणा)/Sinhgad किल्ला महाराज्यांना अतिशय प्रिय होता. सिंहगडचे अगोदरचे नाव कोंढाणा असे होते. मात्र त्यांचा जिवाभावाचा मावळा तानाजी मालुसरे(Tanaji Malusare) यांनी आपल्या मुलगा रायबाचे (Rayba)लग्न सोडून कोंढाणा किल्ला सर करायचे व जिंकून घ्यायचे ठरवले. व त्या लढाई मध्ये तानाजी मालुसरेंना वीरमरण प्राप्त झाले त्यावेळी या किल्ल्याला सिंहगड नाव ठेवण्यात आले. 
 

सिंहगड किल्ल्यावरती कसे जावे?? 

सिंहगड किल्यावरती जाण्यासाठी आपल्याला पुण्याहून जावं लागेल.या किल्याचे पुण्याहून अंतर जवळपास ३० किमी इतके आहे. मुंबई वरुन किल्ल्याचे अंतर १८० किमी आहे. तर नाशिक पासून २५० किमी अंतरावर आहे. हा किल्ला भुलेश्वर डोंगर रांगेमध्ये आहे. तर या किल्ल्याची उंची जवळपास समुद्र सपाटी पासून १३१२ फूट इतकी आहे. जर तुम्ही गाडी घेऊन गडावर जात असाल तर 2 wheeler ला २०रु शुल्क घेतात तर 4 wheeler ५० रु शुल्क घेतात. 
 
किल्ल्यावर पाहण्यासारखी खालील ठिकाणे आहेत. 

१.पुणे दरवाजा १ :- 

किल्ल्यामध्ये प्रवेश करताना आपल्याला प्रथम पुणे दरवाजा १ लागतो. हा दरवाजा पार करून गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला खंदकडा लागतो. खंदकड्यावरून समोर आपल्याला कल्याण दरवाजा दिसून येतो. 
 

२.पुणे दरवाजा २:-

पुणे दरवाजा १ पार केल्यानंतर आपल्याला पुणे दरवाजा २ लागतो. 
सिंहगड किल्ल्यावरती आपल्याला अनेक दरवाजे दिसून येतील कारण शत्रू पासून संरक्षण व्हावे याकरिता शिवरायांनी दरवाजे निर्माण केले होते. 
 

३.दिंडी दरवाजा :-

पुणे दरवाजा २ पार केल्यानंतर आपल्याला दिंडी दरवाजा लागतो. 
 

४.पुणे दरवाजा ३:-

दिंडी दरवाजा पार करून पुढे आल्यावर आपल्याला पुणे दरवाजा ३ दिसून येतो त्याचप्रमाणे पुणे दरवाजा ३ पार केल्यावर आपल्यासमोर तोफखाना दिसून येतो. 
 

५.घोड्याची पागा :-

या किल्ल्यावर आपल्याला घोडयाची पागा पण दिसून येते 
 

६.घोडाबागा टंक :-

घोड्याची पागा नंतर त्याच्या पुढे आपल्याला टंक दिसून येते. तेथे घोडयाना पाणी साठवले जाते. 
 

७.टिळक निवास :-

सिंहगड वरती आपल्याला बाळ गंगाधर टिळक यांचा वाडा आहे. १९८९ मध्ये लोकमान्य टिळक या गडावरती राहायला गेले होते. या ठिकाणी त्यांना निसर्ग रम्य परिसर आढळून येतो तो पाहण्यासाठी टिळकांनी वाडा घेतला होता.या ठिकाणी त्यांनी गीता रहस्यची मुद्रण प्रत तयार केली होती.हा वाडा रामलाल नाईक यांच्याकडून विकत घेऊन त्या ठिकाणी वाडा बांधला गेला आहे. टिळक आणि महात्मा गांधी यांची भेट सुद्धा इथंच झाली होती. 
 

८.राजाराम महाराज्यांची समाधी :-

या किल्ल्यावर आपल्याला छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी दिसून येते.राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र त्यांनीसुद्धा स्वराज्यासाठी मुघल सत्तेशी लढा दिला होता.ते आपल्या वयाच्या ३० व्या वर्षी निधन पावले, त्यांनी सतत ११ वर्षे मुघलांशी लढा दिला.त्यांचा मृत्यू २ मार्च १७०० साली झाला. 
 

९.कलावंतीण बुरुज :-

किल्ल्यावरती आपल्याला कलावंतीण बुरुज देखील दिसून येतो. 
 

१०.तानाजी कडा :-

कोंढाणा किल्ला ज्यावेळी मोघलांच्या ताब्यात होता तेव्हा तानाजी मालुसरे व मावळ्यांनी गडाच्या पश्चिम दिशेला एक कडा निवडला होता त्या कड्याच्या आधारे त्यांनी कोंढाण्यावर चढाई केली तोच हा तानाजी कडा. या कड्याची चढाई करणे फार अवगड होते कारण, कड्याची उंची ९०°मध्ये आहे. त्यामुळे याठिकाणी पहारा कमी असेल म्हणून तानाजी मालुसरे व त्यांच्या मावळ्यांनी या बाजूने चढायचा निर्णय घेतला. 
 
तानाजी मालुसरे आणि गडावरचा सरदार उदयभान यांच्यात मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री झाली यामध्ये दोघेही फार जखमी झाले होते. नंतर तानाजीची ढाल तुटली आणि त्यांनी स्वतःचे संरक्षणकरण्यासाठी आपला फेटा वापरला व लढाई लढली व शेवटला लढताना ते धारातीर्थी पडले व हे पाहून मावळे कावरे बावरे झाले व त्यांनी गडावरून परत जायचे ठरवले मात्र तानाजीचा भाऊ सूर्याजी याने मावळांना म्हणले कि मी गडावरचे दोर कापलेत खाली जायचे असेल तर उडी टाकू जा अथवा शत्रूशी लढा. हे ऐकून मावळ्यांनी शत्रूशी लढायला सुरुवात केली व लढून त्यांनी गड पण जिंकला. व गड जिंकून गवताची गंजी सुद्धा पेटवली तो उजेड राजगडापर्यंत पोहोचला व शिवरायांना समजले कि आपण गड जिंकला व गडावर भेट देताच त्यांना समजले कि तानाजी मालुसरे जखमी होऊन वीर मरण प्राप्त झाले त्यावेळी त्यांनी म्हटले ‘गड आला पण सिंह गेला’. 
 
सिंहगड किल्ला, कोंढाणा किल्ला, तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज,sinhgad fort,kondhana fort,tanaji malusare,shivaji maharaj
Source: Wikipedia
 

११.झुंजार बुरुज :-

हा बुरुज कोंढाणा किल्ल्यावरील महत्वाचा बुरुज आहे. या बुरुजावरून राजगड,पुरंदर, तोरणा आदी किल्ले आपल्याला सहजपणे दिसून येतात. 
 

१२.उदयन राठोड मृत्यूची जागा :-

किल्ल्यावर आपल्याला मुघल सम्राट उदयन राठोडची मृत्यूची जागा सुद्धा दिसून येते. या ठिकाणी आपल्याला गोलाकार दिसून येतो मात्र हा गोलाकार वास्तू जी इथे होती ती काळानुसार नामशेष झाली असावी. 
 

१३.कल्याण दरवाजा :-

गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कल्याण या गावाच्या नावावरून या दरवाज्याला कल्याण दरवाजा म्हटले आहे. हा दरवाजा ९०° मध्ये दिसून येतो. एका दरवाजा पाठीशी दुसरा दरवाजा दिसून येतो. 
 
सिंहगड किल्ला, कोंढाणा किल्ला, तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज,sinhgad fort,kondhana fort,tanaji malusare,shivaji maharaj
Source: Wikipedia
 
 

१४.देवटाके :-

सिंहगडावरती अनेक पाण्याच्या टाक्या दिसून येतात पण त्या मध्ये देवटाके आहे येथीलच पाणी पिण्यासाठी आजपर्यंत वापरण्यात येते. 
 

१५.हत्ती टाके :-

कोंढाण्यावरती आणखी एक पाण्याचे टाके दिसून येते ते म्हणजे हत्ती टाके. मात्र येथील पाणी पिण्यायोग्य नाही आहे. 
 

१६.अमृतेश्वर मंदिर :-

सिंहगडावर आपल्याला अमृतेश्वर मंदिर दिसून येते. हे मंदिर कोळ्यांचे कुलदैवत आहे. याठिकाणी आजही नित्यनियमाने पूजा केली जाते. 
 

१७.तानाजी मालुसरे स्मारक :-

सिंहगड किल्ल्यावरती आपल्याला तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसून येते. याठिकाणी पारंपरिक वेशात शाहीर देखील दिसून येतात. 
 

१८.कोंढाणेश्वर मंदिर :-

किल्ल्यावर आपल्याला कोंढाणेश्वर मंदिर दिसून येते. हे मंदिर शिवाजी महाराज्यांच्या अगोदरच्या काळापासून येथे दिसून येते. 
 

About this post :-

या post मध्ये आपण पहिले कि, पुणे दरवाजा, दिंडी दरवाजा, घोड्याची पागा, घोडाबाग टंक, टिळक निवास, राजाराम महाराज निवास, कलावंतीण बुरुज, तानाजी कडा, झुंजार बुरुज, उदयन राठोड मृत्यूची जागा, कल्याण दरवाजा,देव टाके, हत्ती टाके, अमृतेश्वर मंदिर, तानाजी मालुसरे स्मारक, कोंढाणेश्वर मंदिर या गडावरील वास्तू विषयीची माहिती. 
 
हे पण वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *