सत्तावनच स्वातंत्र्ययुद्ध संपल.परंतु त्याच्या स्मृती आणि त्याचं भारतीय स्वातंत्र्याच ध्येय काही भारतीय देशभक्तांच्या मनातून नष्ट झालं नाही. सत्तावनच्या स्वातंत्र्ययुध्दानंतर राजकीय परिस्थिती अधिकच बिकट झाली. सर्वत्र बंडखोर संस्थान अस्तंगत करण्यात आली. पुन्हा राज्यक्रांतीचा स्फोट होऊ नये अशी निष्ठुर दक्षता ब्रिटिश राजसत्ता येथे घेऊ लागली आणि इतका मोठा राज्यक्रांतीचा प्रयत्न फसल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याची लालसा धरण हे अशक्य कोटीतील गोष्टीची इच्छा धरण्यासारख आहे,अस येथील “बिचारे” लोक म्हणू लागले.
बहुसंख्य लोकांची तर इंग्रजांच राज्य हेच वरदान आहे अशी समजूत अधिक दृढ होऊन गेली.
पण अशा पराभूत वृत्तीच्या राखेतही स्वाभिमानी स्वातंत्र्याकांक्षेचे स्फुल्लिंग काही घराण्यात धगधगत होते. त्या घराण्यातील कुटुंबीयांनी ते स्फुल्लिंग पेटवून पारतंत्र्याच्या अंधारातच राष्ट्रीय उठावणीची चमक झाडण्याचा धाडसी प्रयत्न केला.
हिंदुस्थानातील ब्रिटिश राजसत्तेच्या सव्वाशे वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील ज्या घराण्यांची नावे त्यातील कुटुंबीयांनी राष्ट्रीय स्वातंत्र्ययज्ञात सर्वस्वाचा होम केल्यामुळे विशेषत्वाने प्रसिद्धी पावली, त्यात कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण गावच्या फडके घराण्याचा ठळकपणे समावेश होतो.
बळवंतराव आणि सरस्वतीबाईंच्या पोटी ४ नोव्हेंबर १८४५ रोजी वासुदेवांचा जन्म झाला. वासुदेवांच बरचसं बालपण कल्याणासच आजोळी गेले. त्यानंतर कल्याण येथीलच सरकारी शाळेत वडील मंडळींनी त्यांना घातलं. तिथे चार वर्ष शिकले. बळवंतरावांना इंग्रजी शिक्षणाचा तिटकारा असल्यामुळे गुप्तपणेच वरील अवधीत कल्याण येथील डॉ. विल्सन यांच्या मिशनरी शाळेत इंग्रजी भाषेचाही अभ्यास केला. त्या शाळेची वेळ मराठी शाळेची सकाळची वेळ सोडून असल्या.
शाळेची सकाळची वेळ सोडून असल्यामुळे ते करणं वासुदेवांना शक्य झालं .या शाळेतून अनुक्रमे सखाराम शिवराम केळकर आणि श्रीधरशास्त्री जांभेकर हे दोन त्यांचे शिक्षक होते.या दोन्ही शिक्षकांच्या आठवणी उत्तर आयुष्यात वासुदेव बळवंताना उल्हासित करीत.
वासुदेव कल्याण येथील शाळेत असतानाच १० मे १८५७ला सत्तावणंच स्वातंत्र्ययुद्ध चालू झालं. अशा वेळी बंडाच्या वार्ता बळवंतरावानी उत्साहानं सांगाव्या आणि १२वर्षांच्या वासुदेवान, त्याची दृष्टी कल्पनांनी भारावलेली आहे , नि कान वृत्त्कथनाच्या श्रवणासाठी टवकारलेले आहेत, अशा अवस्थेत दोन्ही हातांची बोटं एकमेकात आणि बसल्या बसल्याच ते हात गुडघ्याभोवती टाकून त्या तासन् तास ऐकाव्या अस पुष्कळदा घडे.
देश स्वतंत्रतेसाठीच ही लढाई चालली आहे,या कल्पनेन नानासाहेब, तात्या टोपे या प्रभुतींचे पराक्रम आणि युद्धकथा ऐकताना त्यांना अनुनभुत आनंद होई आणि “अशी लढाई आपणही करू शकू का?”अशा बालमनाला सहज सुचानाऱ्या विवंचनेत ते बेचैन होत. कल्याण येथील अभासक्रम संपवून 1859 मध्ये मुंबईत नाना जगन्नाथ शंकरशेट यांच्या परिश्रमाने चालवल्या गेलेल्या मुंबईतील एका शाळेत त्यांनी चारच महिने काढले आणि पुढे पुण्याला पूना हायस्कूलमध्ये पुढील शिक्षणासाठी ते गेले.त्यांनी तिथे इतर विषयंसोबतच इंग्रजी भाषेचा विशेष अभ्यास केला.पण प्रवेशप्रक्रियेस बसून सहजसाध्य नोकरी करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा नसल्यामुळे प्रवेश परीक्षेला न बसताच ते तिथून बाहेर पडले.
वयाच्या पंधराव्या वर्षी वासुदेवांचा विवाह पनवेलजवळीच पाल येथील दाजीबा सोमण यांच्या मुलीशी विवाह झाला. त्यानंतर त्यांनी मुंबईत जी. आय. पी. रेल्वेच्या लेखा परीक्षक विभागात प्रती मासी वीस रुपये वेतनावर त्यांनी नोकरी धरली पण वासुदेव स्वाभिमानी असल्यामुळे वरिष्ठांची हेकट हाकाटीमुळे खटके उडून तेथील नोकरी त्यांनी चारच महिन्यात सोडून दिली. त्यानंतर त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये तीस रुपयांवर ते लागले.
तिथे दोन वर्षे काम केल्यानंतर “कॉमिसारियट ऑफिस” ऑफिसमध्ये ते काम करू लागले आणि त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांची त्याचं विभागाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात पुढे पाठवणीही केली.पुण्यास आल्यानंतर त्यांना एक पुत्ररत्न झाले पण दुर्देवाने त्यांचा तो मुलगा बालपणीच मृत्यू पावला. पुढे त्यांना मथुताई नावाची एक मुलगी झाली.तीच त्यांची एकमेव वंशवेल. पण याच काळात १८७० मध्ये असा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला ज्यामुळे त्यांचा स्वाभिमानच डिवचला जाऊन मरणप्राय दुःखान सर्व परकीय सत्ताधाऱ्यांविरुद्ध ते प्रतिशोधान जळफळू लागले. कारण त्या वर्षीच शिरढोणहून आपल्या आईच्या दुखण्याच वृत्त त्यांना समजल,तेव्हा तिकडे जाण्यासाठी त्यांनी कार्यालयातून सुट्टी मागितली पण ती त्यांना नाकारण्यात आली.तो नकार मिळण्यातही त्यांचे काही दिवस गेले.त्या अवधीत त्यांच्या आईच दुखणं विकोपास गेलं. शेवटी कार्यालयप्रमुखांच्या आज्ञेविनाच ते शिरढोण येथे अधिरतेने गेले. पण त्यापूर्वीच त्यांची आई इहलोक सोडून गेल्याचं वर्तमान तिथे त्यांना मिळालं. आपल्या आईची शेवटची भेट न होण्यास कारणीभूत ठरलेल्या वरिष्ठांविषयी संतापाच्या लाटा त्यांच्या मनात उसळू लागल्या.
पुण्यात आल्यावर त्यांनी त्याविरुद्ध मुंबई सरकारकडे आवेदनही केलं. पण लेखनिकाला न्याय्य गोष्टीतही न्याय कसा मिळेल..?त्यामुळे त्यांच्या वरिष्ठांविरुद्ध काहीही करण्याचं मुंबई सरकारने नाकारलं. पुढील वर्षी आईच्या वर्षश्राद्धाच्या वेळीही त्यांना सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे सबंध इंग्रजांविरुद्धच त्यांचा त्वेष वाढला आणि असा अन्याय इतर कित्येक लोकांना भोगावा लागला असेल म्हणून सूड घेण्याचा त्यांनी ठाम निर्धार केला.
पुढे १८७३मध्ये त्यांच्या प्रथम पत्नींचा मृत्यू झाला आणि त्यांचा दुसरा विवाह काशिनाथशास्त्री कुंटे यांच्या कन्या गोदुबाई/गोपिकाबाईंशी झाला. याच विरपत्नी गोपिकाबाई अथवा बाई फडके होत. हळूहळू स्वातंत्र्यासाठी करावयाच्या लोकजागृतीमध्ये ते रमू लागले. त्यासाठी लोकशिक्षण आणि लोकसामर्थ्य वाढवलं पाहिजे हे ओळखून त्यांनी इतर काही गृहास्थांच्या साहाय्याने ‘ पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन’ नावाची शिक्षणसंस्था त्यांनी काढली. याच संस्थेने काढलेल्या नव्या इंग्रजी शाळेतून पुण्याची सध्याची महाराष्ट्रातील सर्वात जुनी “भावे स्कूल” नावाची शाळा पुढे निघाली.याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षणाच्या क्षेत्रात पहिल पाऊल वासुदेवांनीच टाकले.
लोकजागृतीचे कार्य त्यांनी व्याख्यानाच्या द्वारे चालू केलं. वैध चळवळीचा मार्ग अनुसरून जनतेला लढण्यासाठी सिद्ध करण्याचा वासुदेव बळवंतानी प्रयत्न केला. पण महीन्यांमागून महिने गेले. व्याख्यानांमागून व्याख्याने दिली तरी ‘ तुमचा मार्ग अनुसरण्यास आम्ही सिद्ध आहोत ‘असं म्हणणार कोणीच त्यांच्याकडे येईना. त्यामुळे त्यांची निराशा झाली.
त्यांचा संताप वाढवणाऱ्या घटनाही याच सुमारास घडत होत्या. बडोद्याच्या तेव्हाच्या मल्हारराव गायकवाड महाराजांना त्यांच्या तेजस्वी बाण्यामुळे अन्यायाने गादिवरून खाली ओढण्यात आले आणि जनतेच्या आपत्तीवर १८७६च्या दख्खनच्या दुष्काळाने तर कळसच चढवला. त्या वेळची दख्खनची स्थिती काय वर्णावी ! ज्या महिन्यात धान्याची भरागोस कणस आणि लोंब्या शेतात डुलाव्या त्या महिन्यात पावसाच्या अभावी पिकावाचून वैराण दिसणारी शेत काट्या- कुट्यानी आच्छादलेली दिसत होती. पाण्याची तुडूंब जलाशय जिथे दिसावी तिथे पाण्याचा खडकडाट दिसत होता. महाराष्ट्रातील सुपीक भूमीला ओसाड प्रदेशाची कळा आली! शक्य तितका काळ पाहून गरीब जनतेन धीर सोडला. उपासमारीने मृत्यूच्या दारी येऊन ठेपलेले खेड्यापाड्यातील लोक आपल्या झोपड्या सोडुन आशेने स्थलांतर करू लागले. त्यांच्यापैकी कित्येकजण भुकेने आणि श्रमाने मृत्युमुखी पडले. कोवळी बालकं दुधासाठी आक्रोश करत स्वर्गलोकी गेली. दुष्काळामागोमाग रोगराईच संकटही महाराष्ट्रात अवतरल. यामध्ये झालेल्या प्राणहानीचे आकडे स्तिमित करणारे होते. एकट्या सोलापूर आणि विजापूरातच दुष्काळातील मृतांची संख्या सात सहस्त्रांवर गेली.
रोगराईमुळे दुसरे गेले त्यांची संख्या चार सहस्त्र होती. इतकी प्राणहानी केवळ अन्नाच्या अभावी घडलेली महाराष्ट्राने कधी पाहिली नव्हती. ब्रिटिशांचे वरकर्मी काम औदार्याचे, परंतु आत पाहिलं तर मात्र विश्र्वासघातकीपणाचे. ज्या भूमीच्या पोटी आपण जन्मलो, तिच्याच पोटी ही सारी लेकर झाली.त्यांनी अन्नान करीत उपाशी मरावं.हा देश अमेरिकेप्रमाणे ब्रिटिशांची वसाहत व्हावी आणि आपण कुत्र्याप्रमाणे स्वतःचं पोट भरीत राहावं असे वाटून त्यांनी लाथ मारली आणि लूट मारून लढाऊ टोळ्या निर्माण करण्याचं त्यांनी ठरवलं पण तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांचा हा प्रयत्न जर यशस्वी झाला असता तर एकाच वेळी देशाच्या चारी कोपऱ्यात बंड करवली असती. एकाचं वेळी असा भडका उडाला असता, तर युरोपियन लोकांत भीतीचा वायुगोळा उठला असता. त्यामुळे पुढे डाका बंद झाल्या असत्या ! रेल्वे मार्ग उखडले गेले असते! तारांचे खांब उपटून तारायंत्रे मोडून पडली असती आणि सर्व दळणवळण पार थंडावल असत.
सत्तावनच स्वातंत्र्ययुद्ध संपल.परंतु त्याच्या स्मृती आणि त्याचं भारतीय स्वातंत्र्याच ध्येय काही भारतीय देशभक्तांच्या मनातून नष्ट झालं नाही. सत्तावनच्या स्वातंत्र्ययुध्दानंतर राजकीय परिस्थिती अधिकच बिकट झाली. सर्वत्र बंडखोर संस्थान अस्तंगत करण्यात आली. पुन्हा राज्यक्रांतीचा स्फोट होऊ नये अशी निष्ठुर दक्षता ब्रिटिश राजसत्ता येथे घेऊ लागली आणि इतका मोठा राज्यक्रांतीचा प्रयत्न फसल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याची लालसा धरण हे अशक्य कोटीतील गोष्टीची इच्छा धरण्यासारख आहे,अस येथील “बिचारे” लोक म्हणू लागले. बहुसंख्य लोकांची तर इंग्रजांच राज्य हेच वरदान आहे अशी समजूत अधिक दृढ होऊन गेली.
पण अशा पराभूत वृत्तीच्या राखेतही स्वाभिमानी स्वातंत्र्याकांक्षेचे स्फुल्लिंग काही घराण्यात धगधगत होते. त्या घराण्यातील कुटुंबीयांनी ते स्फुल्लिंग पेटवून पारतंत्र्याच्या अंधारातच राष्ट्रीय उठावणीची चमक झाडण्याचा धाडसी प्रयत्न केला.
हिंदुस्थानातील ब्रिटिश राजसत्तेच्या सव्वाशे वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील ज्या घराण्यांची नावे त्यातील कुटुंबीयांनी राष्ट्रीय स्वातंत्र्ययज्ञात सर्वस्वाचा होम केल्यामुळे विशेषत्वाने प्रसिद्धी पावली, त्यात कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण गावच्या फडके घराण्याचा ठळकपणे समावेश होतो.
बळवंतराव आणि सरस्वतीबाईंच्या पोटी ४ नोव्हेंबर १८४५ रोजी वासुदेवांचा जन्म झाला. वासुदेवांच बरचसं बालपण कल्याणासच आजोळी गेले. त्यानंतर कल्याण येथीलच सरकारी शाळेत वडील मंडळींनी त्यांना घातलं. तिथे चार वर्ष शिकले. बळवंतरावांना इंग्रजी शिक्षणाचा तिटकारा असल्यामुळे गुप्तपणेच वरील अवधीत कल्याण येथील डॉ. विल्सन यांच्या मिशनरी शाळेत इंग्रजी भाषेचाही अभ्यास केला. त्या शाळेची वेळ मराठी शाळेची सकाळची वेळ सोडून असल्यामुळे ते करणं वासुदेवांना शक्य झालं .या शाळेतून अनुक्रमे सखाराम शिवराम केळकर आणि श्रीधरशास्त्री जांभेकर हे दोन त्यांचे शिक्षक होते.या दोन्ही शिक्षकांच्या आठवणी उत्तर आयुष्यात वासुदेव बळवंताना उल्हासित करीत.
वासुदेव कल्याण येथील शाळेत असतानाच १० मे १८५७ला सत्तावणंच स्वातंत्र्ययुद्ध चालू झालं. अशा वेळी बंडाच्या वार्ता बळवंतरावानी उत्साहानं सांगाव्या आणि १२वर्षांच्या वासुदेवान, त्याची दृष्टी कल्पनांनी भारावलेली आहे , नि कान वृत्त्कथनाच्या श्रवणासाठी टवकारलेले आहेत, अशा अवस्थेत दोन्ही हातांची बोटं एकमेकात आणि बसल्या बसल्याच ते हात गुडघ्याभोवती टाकून त्या तासन् तास ऐकाव्या अस पुष्कळदा घडे.देश स्वतंत्रतेसाठीच ही लढाई चालली आहे,या कल्पनेन नानासाहेब, तात्या टोपे या प्रभुतींचे पराक्रम आणि युद्धकथा ऐकताना त्यांना अनुनभुत आनंद होई आणि “अशी लढाई आपणही करू शकू का?”अशा बालमनाला सहज सुचानाऱ्या विवंचनेत ते बेचैन होत.
कल्याण येथील अभासक्रम संपवून 1859 मध्ये मुंबईत नाना जगन्नाथ शंकरशेट यांच्या परिश्रमाने चालवल्या गेलेल्या मुंबईतील एका शाळेत त्यांनी चारच महिने काढले आणि पुढे पुण्याला पूना हायस्कूलमध्ये पुढील शिक्षणासाठी ते गेले.त्यांनी तिथे इतर विषयंसोबतच इंग्रजी भाषेचा विशेष अभ्यास केला.पण प्रवेशप्रक्रियेस बसून सहजसाध्य नोकरी करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा नसल्यामुळे प्रवेश परीक्षेला न बसताच ते तिथून बाहेर पडले.
वयाच्या पंधराव्या वर्षी वासुदेवांचा विवाह पनवेलजवळीच पाल येथील दाजीबा सोमण यांच्या मुलीशी विवाह झाला. त्यानंतर त्यांनी मुंबईत जी. आय. पी. रेल्वेच्या लेखा परीक्षक विभागात प्रती मासी वीस रुपये वेतनावर त्यांनी नोकरी धरली पण वासुदेव स्वाभिमानी असल्यामुळे वरिष्ठांची हेकट हाकाटीमुळे खटके उडून तेथील नोकरी त्यांनी चारच महिन्यात सोडून दिली. त्यानंतर त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये तीस रुपयांवर ते लागले. तिथे दोन वर्षे काम केल्यानंतर “कॉमिसारियट ऑफिस” ऑफिसमध्ये ते काम करू लागले आणि त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांची त्याचं विभागाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात पुढे पाठवणीही केली.पुण्यास आल्यानंतर त्यांना एक पुत्ररत्न झाले पण दुर्देवाने त्यांचा तो मुलगा बालपणीच मृत्यू पावला. पुढे त्यांना मथुताई नावाची एक मुलगी झाली.तीच त्यांची एकमेव वंशवेल.
पण याच काळात १८७० मध्ये असा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला ज्यामुळे त्यांचा स्वाभिमानच डिवचला जाऊन मरणप्राय दुःखान सर्व परकीय सत्ताधाऱ्यांविरुद्ध ते प्रतिशोधान जळफळू लागले. कारण त्या वर्षीच शिरढोणहून आपल्या आईच्या दुखण्याच वृत्त त्यांना समजल,तेव्हा तिकडे जाण्यासाठी त्यांनी कार्यालयातून सुट्टी मागितली पण ती त्यांना नाकारण्यात आली.तो नकार मिळण्यातही त्यांचे काही दिवस गेले.त्या अवधीत त्यांच्या आईच दुखणं विकोपास गेलं. शेवटी कार्यालयप्रमुखांच्या आज्ञेविनाच ते शिरढोण येथे अधिरतेने गेले. पण त्यापूर्वीच त्यांची आई इहलोक सोडून गेल्याचं वर्तमान तिथे त्यांना मिळालं. आपल्या आईची शेवटची भेट न होण्यास कारणीभूत ठरलेल्या वरिष्ठांविषयी संतापाच्या लाटा त्यांच्या मनात उसळू लागल्या. पुण्यात आल्यावर त्यांनी त्याविरुद्ध मुंबई सरकारकडे आवेदनही केलं. पण लेखनिकाला न्याय्य गोष्टीतही न्याय कसा मिळेल..?त्यामुळे त्यांच्या वरिष्ठांविरुद्ध काहीही करण्याचं मुंबई सरकारने नाकारलं. पुढील वर्षी आईच्या वर्षश्राद्धाच्या वेळीही त्यांना सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे सबंध इंग्रजांविरुद्धच त्यांचा त्वेष वाढला आणि असा अन्याय इतर कित्येक लोकांना भोगावा लागला असेल म्हणून सूड घेण्याचा त्यांनी ठाम निर्धार केला.
पुढे १८७३मध्ये त्यांच्या प्रथम पत्नींचा मृत्यू झाला आणि त्यांचा दुसरा विवाह काशिनाथशास्त्री कुंटे यांच्या कन्या गोदुबाई/गोपिकाबाईंशी झाला. याच विरपत्नी गोपिकाबाई अथवा बाई फडके होत. हळूहळू स्वातंत्र्यासाठी करावयाच्या लोकजागृतीमध्ये ते रमू लागले. त्यासाठी लोकशिक्षण आणि लोकसामर्थ्य वाढवलं पाहिजे हे ओळखून त्यांनी इतर काही गृहास्थांच्या साहाय्याने ‘ पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन’ नावाची शिक्षणसंस्था त्यांनी काढली. याच संस्थेने काढलेल्या नव्या इंग्रजी शाळेतून पुण्याची सध्याची महाराष्ट्रातील सर्वात जुनी “भावे स्कूल” नावाची शाळा पुढे निघाली.याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षणाच्या क्षेत्रात पहिल पाऊल वासुदेवांनीच टाकले.
लोकजागृतीचे कार्य त्यांनी व्याख्यानाच्या द्वारे चालू केलं. वैध चळवळीचा मार्ग अनुसरून जनतेला लढण्यासाठी सिद्ध करण्याचा वासुदेव बळवंतानी प्रयत्न केला. पण महीन्यांमागून महिने गेले. व्याख्यानांमागून व्याख्याने दिली तरी ‘ तुमचा मार्ग अनुसरण्यास आम्ही सिद्ध आहोत ‘असं म्हणणार कोणीच त्यांच्याकडे येईना. त्यामुळे त्यांची निराशा झाली.
त्यांचा संताप वाढवणाऱ्या घटनाही याच सुमारास घडत होत्या. बडोद्याच्या तेव्हाच्या मल्हारराव गायकवाड महाराजांना त्यांच्या तेजस्वी बाण्यामुळे अन्यायाने गादिवरून खाली ओढण्यात आले आणि जनतेच्या आपत्तीवर १८७६च्या दख्खनच्या दुष्काळाने तर कळसच चढवला. त्या वेळची दख्खनची स्थिती काय वर्णावी ! ज्या महिन्यात धान्याची भरागोस कणस आणि लोंब्या शेतात डुलाव्या त्या महिन्यात पावसाच्या अभावी पिकावाचून वैराण दिसणारी शेत काट्या- कुट्यानी आच्छादलेली दिसत होती. पाण्याची तुडूंब जलाशय जिथे दिसावी तिथे पाण्याचा खडकडाट दिसत होता. महाराष्ट्रातील सुपीक भूमीला ओसाड प्रदेशाची कळा आली! शक्य तितका काळ पाहून गरीब जनतेन धीर सोडला. उपासमारीने मृत्यूच्या दारी येऊन ठेपलेले खेड्यापाड्यातील लोक आपल्या झोपड्या सोडुन आशेने स्थलांतर करू लागले. त्यांच्यापैकी कित्येकजण भुकेने आणि श्रमाने मृत्युमुखी पडले. कोवळी बालकं दुधासाठी आक्रोश करत स्वर्गलोकी गेली. दुष्काळामागोमाग रोगराईच संकटही महाराष्ट्रात अवतरल. यामध्ये झालेल्या प्राणहानीचे आकडे स्तिमित करणारे होते. एकट्या सोलापूर आणि विजापूरातच दुष्काळातील मृतांची संख्या सात सहस्त्रांवर गेली.
रोगराईमुळे दुसरे गेले त्यांची संख्या चार सहस्त्र होती. इतकी प्राणहानी केवळ अन्नाच्या अभावी घडलेली महाराष्ट्राने कधी पाहिली नव्हती. ब्रिटिशांचे वरकर्मी काम औदार्याचे, परंतु आत पाहिलं तर मात्र विश्र्वासघातकीपणाचे. ज्या भूमीच्या पोटी आपण जन्मलो, तिच्याच पोटी ही सारी लेकर झाली.त्यांनी अन्नान करीत उपाशी मरावं.हा देश अमेरिकेप्रमाणे ब्रिटिशांची वसाहत व्हावी आणि आपण कुत्र्याप्रमाणे स्वतःचं पोट भरीत राहावं असे वाटून त्यांनी त्या नोकरीला लाथ मारली आणि लूट मारून,लढाऊ टोळ्या निर्माण करण्याचं त्यांनी ठरवलं पण तो प्रयत्न पुढे अयशस्वी झाला. त्यांचा हा प्रयत्न जर यशस्वी झाला असता तर एकाच वेळी देशाच्या चारी कोपऱ्यात बंड करवली असती. एकाचं वेळी असा भडका उडाला असता, तर युरोपियन लोकांत भीतीचा वायुगोळा उठला असता. त्यामुळे पुढे डाका बंद झाल्या असत्या ! रेल्वे मार्ग उखडले गेले असते! तारांचे खांब उपटून तारायंत्रे मोडून पडली असती आणि सर्व दळणवळण पार थंडावल असत.
वैध मार्ग सोडून सशस्त्र उठावणीच्या मार्गाकडे वासुदेव बळवंतानी वळण्यास ऐतिहासिक काळापासून चालत आलेली मराठ्यांची स्वाभिमानी आणि बंडखोर वृत्तीच कारणीभूत होती. त्याचं वृत्तीन सर्वच गड आणि पर्वत एकेकाचे ऐतिहासिक पराक्रम आठवीत त्यांनी पाहिले. इंग्रजांशी युद्ध करायच तर ते गनिमी काव्यानेच हेही वासुदेव बळवंतानी ठरवलं.या युद्धात पांढरपेशा वर्गाकडून सहाय्य मिळणारं नाही हे निश्चित झाल्यामुळे अशिक्षित पण स्वाभिमानी लोकांना त्यासाठी हाताशी धरण्याच ठरविलं आणि पुणे आणि सातारा येथील रामोशी लोकांशी त्यांनी संधान बांधले. या रामोशी लोकांचा किल्लेदारीचा हक्क ब्रिटिश राज्यात नष्ट झाल्यामुळे त्यांच्यात असंतोष धुमसत होताच. आणि १८७६ च्या दुष्काळात त्यांना पोटभर खावयासही न मिळाल्यामुळे त्यांचा असंतोष वाढतच गेला. फावल्या वेळात पोटधंदा म्हणून लाकडं आणून विकायची हा त्यांचा शिरस्ता असे. पण नवीन अरण्यनिर्बंधामुळे त्यांचा तो असंतोष वाढतच गेला. रानात फुकट गुरे चारण्याचीही त्यांना चोरी झाली.त्या वेळच्या सावकरविरोधी दंग्यात त्यांच्या पैकी कित्येकांना पकडण्यात आलं आणि चोऱ्या, लुटालूटी नी मारामाऱ्या यांच्या संबंधात माहिती काढण्यासाठी त्यांचा छळ करण्यात आला. त्यामुळे ते लोक सरकारवर रुष्ट होते. दंग्याच्या काळात तर प्रतिदिनी उपस्थित राहण्याची त्यांच्यावर सक्ती करण्यात आली. त्याचाही त्यांना संताप आला. या सर्व संतापाचा दाह त्यांच्या अंतःकरणात पेटत असतानाच १८७७ मध्ये वासुदेव बळवंत यांच्या धुमसत्या लोकसमूहात जाऊन उभे राहिले.त्यांची एक संघटना वासुदेवांनी उभारली.
आपल्या बंडखोर जीवनास आवश्यक ते शस्त्रशिक्षण त्यांनी आधीच आत्मसात केलं. घोडदौड, मल्लविद्या यांच्यात ते पारंगत होते. शस्त्रांचा त्यांना फार शौक; बंदुका, तलवारी, भाले इत्यादी शस्त्रे नित्याने त्यांच्या जवळ असत. पहाटेच्या अंधारात ६०-७० तरुणांना तलवार, बंदूक, दांडपट्टा इत्यादींचे हात ते स्वतः शिकवीत. शस्त्रशाळेत वरील शिष्यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन उल्लेखनीय शिष्य होते;एक म्हणजे त्यांच्या द्वितीय पत्नी बाई फडके आणि दुसरे म्हणजे वासुदेव बळवंतांच्या नंतरच्या काळातील हिंदी असंतोषाचे जनक, लोकमान्य टिळक ! १८७९च्या प्रारंभी वासुदेवांनी आपली सेना उभारली. पण युद्धासाठी लागणाऱ्या द्रव्यासाठी त्यांनी श्रीमंत लोकांशी वाटाघाटी करुन पाहिल्या पण सगळ्यांनी हात वर केले. निरुपाय म्हणून मग त्यांनी छापे घालून,लुटमार करुन याची व्यवस्था केली. त्यांच्या रामोशी सेनेचे प्रमुख दौलतराव नाईक हे होत. वासुदेवांवर त्यांची निस्सीम भक्ती होती आणि त्यांच्यासाठी त्यांनी शेवटी आपले प्राणही देऊन टाकले. त्याचप्रमाणे गोपाळ मोरेश्वर साठेही त्यांचे प्रमुख सहकारी होते.
त्यांचं बंड दडपण्यासाठी अठराशे सोजिर आणि हिंदी शिपाई आता खपत होते. पण त्यांना ते पकडू शकले नाहीत. त्याच वेळी दुर्देवाने एका परिचित बाईने त्यांचा ठावठिकाणा पुण्याच्या एका देवळात दुसरीस सांगितला नि तो एका जमादाराच्या बायकोने ऐकताच तिने तो घरी येऊन जमादाराला सांगितला. त्यानं ते वृत्त डेनियल नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलं. दि.१६जुलै १८७९ ला गुरुवारी तातडीने पुण्याहून निघून भागानगरास पोचला. तिथं रीचर्ड मिट हा तात्या टोपेना पकडणारा इंग्रज तेव्हा राजनिवासी होता. त्याच्या विचारानं आणि निजामाच्या पोलिसांच्या सहाय्यानं गावोगाव बेचाळीस तास पाठलाग करुन, वाटेत एकदा सबंध भीमा नदी ओलांडून, अत्यंत ज्वरगस्त दमलेल्या अशा स्थितीत देवरणागवाडी येथे एका देवळात झोपलेल्या वासुदेब बळवंतांना २०जुलैला उत्तररात्री प्रथम निःशस्त्र करुन मग त्यांना पकडलं तरीही शरणागती त्यांनी पत्करली नाही. त्यांच्यासोबत गोपाळ मोरेश्वर साठे यांनाही अटक झाली.
त्यानंतर त्यांना पुण्याला कारागृहात ठेवण्यात आले. तिथे त्यांचे अतोनात हाल झाले. तरीही १८८०च्या १२ ऑक्टोबरला रात्री पहाटे त्यांनी बऱ्याच दिवसांनी ठरवलेल्या विचाराच्या संकेतानुसार, पहारेकऱ्यांना निद्रिस्त पाहून, हातापायातील बेड्या मोडून, कोठडीच तार बिजागरितून निखळून एडनचा तुरुंग फोडला नि त्याच्या तटावरून चढून जाऊन ते उडी मारून कारागृहाबाहेर पडले.१२ मैल ते तसेच पळत गेले; पण शेवटी बिर ओवेद येथे त्यांना दुसऱ्या दिवशी सायंकाळी पकडण्यात आले. नंतर पुढे दोन वर्षे त्यांचा एडन कारागृहात इतका छळ करण्यात आला की त्यांच्या प्रचंड बलाच्या शरीरालाही क्षयरोग जडला. तरी त्यातच १८८१च्या जुलैमध्ये अन्नत्यागही केला होता पण तेथील डॉ. बर्वे यांच्या विनंतीवरून बऱ्याच दिवसांनी त्यांनी तो सोडला. शेवटी १८८३च्या प्रारंभी केवळ अस्थिपंजर राहिले आणि १७ फेब्रुवारी १८८३ला त्यांचे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून निघून गेले! भारतीय स्वातंत्र्ययज्ञात आणखी एक आहुती पडली या आद्य क्रांतिकारकांची.
सबंध जनतेला उठावणिसाठी सिद्ध करुन ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड उभारण्याचा, वासुदेव बळवंतांची उठावणी हा पहिला प्रयत्न होता. त्यांच्या चरित्राने पुढील कित्येक क्रांतिकारकांना स्फूर्ती दिली. भारताच प्रजासत्ताकाच ध्येय, स्वातंत्र्य हा शब्द लोकांना माहीत नव्हता, अशा वेळी उद्घोषून त्यांनी ते व्यक्त केलं. स्वातंत्र्याच्या मंत्राचा खेड्यापाड्यात जाऊन प्रसार करणारे ते पहिले राष्ट्रपुरुष होत ! तथाकथित अस्पृश्यांना दूर ठेवण्याच्या तत्कालीन उच्चवर्णीयांच्या प्रघातावर सक्रिय घाव घालणारेही वासुदेव बळवंत हे पहिले देशभक्त झाले ! वैयक्तिक सामर्थ्याची पराकष्ठा नि गुप्त संघटनेची गुंफण करणारे, स्वातंत्र्याच्या प्रचाराची झोड उठविणारे, शस्त्रबलाने परकीय सत्तेवर आघात करणारे, बेडर धैर्याने मृत्यूशी झुंज खेळणारे आणि भारतीय दंड – विधानाच्या, राजद्रोह, सरकारविरुद्ध बंड इ. विभागातील पहिले अभियुक्त म्हणून, पुढील साऱ्या क्रांतिकारकांचे, त्या सर्व वैशिष्ट्यात वासुदेव बळवंत हे आद्य पुरुष ठरतात.