Vatpaurnima 2021 Information in Marathi पूजेकरिता लागणारे साहित्य /पूजा कशी करावी?? /सावित्रीची कथा

Vatpaurnima 2021 Information in Marathi – Why does vatpaurnima is celebrated?? How to prayer Banayan Tree?? Vatsavitri Story

 
Vatpaurnima Information in Marathi - वटपौर्णिमा विषयी माहिती

भारतात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात त्यापैकी एक म्हणजे वटपोर्णिमा हा उत्सव ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी सर्व सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करतात. त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळायला फेरे घालतात, वडाच्या झाडाची पूजा करून आपल्याला सात जन्म हाच पत्ती भेटावा, त्याची उन्नती व्हावी, त्याच्याकडे धनसंपत्ती यावी, चांगली आरोग्य प्राप्ती व्हावी, दीर्घायुषी व्हावे अशी प्रार्थना करतात. वडाची झाडं भारतीय संस्कृतीमध्ये फार महत्वाचे मानले जाते, त्याचप्रमाणे या झाडाचे आयुष्य फार मोठे असते. झाडाच्या आयुष्या प्रमाणे, आपल्या पतीला हे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे याकरिता पूजा करतात.

 

पुजेकरिता लागणारे साहित्य:-

1.हळद कुंकू
2. नारळ
3. सुताचा धागा 
4.वडाची पूजा करण्यासाठी फुले
5.सतीचे वाण (काळे मणी, हिरव्या बांगड्या,पोत, हळद कुंकू)
6.पूजेची सुपारी
7. ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस (लाल कलरचा असेल तर उत्तम)
8.ओटी भरण्यासाठी तांदूळ/गहू
9. आंबा/कोणतेही फळ
10.सुपारी, खारीक, हळकुंड, खोबर,बदाम
11. वडाला घालण्यासाठी पाणी
12.नैवेद्य/पुरणपोळी
13. वडाला ओवळणेसाठी दिवा
14. अगरबत्ती
 

वडाची पूजा कशी करावी??

पहिला ताब्यातून आणलेले पाणी झाडाला अर्पण करा. त्यानंतर हळद कुंकू लावा.त्यानंतर आणलेले सूत वडाच्या झाडाला गुंडाळून घ्यावे प्रदक्षिणा घालत.तुम्ही 5,7,11,21,108 प्रदक्षिणा वडाच्या झाडाला घालू शकता. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तो दोर कापून झाडाला बांधवा लागेल, व त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करावी लागेल. हि पूजा दोन प्रकारे केली जाते पहिल्या प्रकारामध्ये वडाच्या झाडाभोवती असणारे 4 5 खडे घेऊन त्याची पूजा केली जाते यासाठी ते खडे स्वच्छ धुवावेत व त्याची पूजा करायची तर दुसऱ्या मध्ये 1 रुपयेचे नाणे घेऊन त्यामध्ये सुपारी ठेवायची व त्याच्या वर परत 1रुपये चे नाणे ठेवावे व त्याची पूजा करावी अशी हि करता येते.खड्यांचे किंवा सुपारीचे पूजन करताना त्याला हळदी कुंकू लावावे व त्यांच्यासमोर ब्लॉऊस पीस ठेवायचा,त्यानंतर त्या ब्लाउज पीस वरती तांदूळ आणि 2 फळ वाहायची त्यानंतर परत एकदा तांदूळ आणि उरलेली सर्व फळ वाहावीत व त्यावरती सतीचे वाण(काकण व मनी).व काही तांदूळ आपल्याकडे ठेवावेत व नंतर बाकीच्या तांदुळांनी उरलेल्या सवासिनीची ओटी भरावी.
ओटी भरून झाली कि फुले वाहायची आणि नंतर नैवेद्य दाखवायचा.फुले वाहायची व त्या नंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची, दिवा लावायचा.
वटवृक्षाला शिवरूपी वृक्ष असे म्हटले जाते त्यामुळे या झाडाची पूजा केल्यामुळे स्त्रिया साक्षात महादेवाची पूजा करतात.त्याचप्रमाणे घरांमध पुरणपोळी केली जाते.
 

सावित्रीची कथा :-

मदुर देशामध्ये अश्वपती नावाचा राजा होता हा राजा महाज्ञानी व धार्मिक होता पण त्याला संतती नव्हती. सावित्री देवींची तो उपासना करतो व त्यामुळे त्याला एक कन्या होते तिचे नाव वरदा सावित्री ठेवण्यात आले होते. ती मोठी झाल्यावर तिचा पती तिला निवडायला सांगितला. तिने सत्यवानाला निवडले. तिचा सासरा आंधळा व राज्यभ्रष्ट होता म्हणून तो जंगलात राहायचा. सत्यवान हा फार गुणी होता पण त्याचा मृत्यू 1वर्षाने होणार असे देवऋषी नारद यांनी सांगितले. तिने सत्यवसनाशी लग्न केले व तिच्या आठवणीत होते कि आपला पती मारणार आहे म्हणून तिने सावित्रीचे व्रत केले. 
तिने मरणाच्या 3 दिवस अगोदर व्रत केले व मरणा दिवशी दोघेही अरण्यात गेले. सत्यवानाला अतिश्रमाने चक्कर आली. मग तो सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपला व थोड्या वेळाने तेथे यमराज आले त्याचा जीव घेण्यासाठी, प्राण घेताच सावित्री पण दुःखी होऊन यमाच्या मागे जाऊ लागली. तिने यमाकडे पतिव्रता, पतीचे महत्व सांगितले हे ऐकून यम प्रसन्न झाला व त्याने म्हटले पतीचा जीव सोडून कोणते पण मागणे माग,तिने वेळ न दवडता तिने आपल्या सासऱ्याची दृष्टी परत मिळावी हा वर मागितला. मग तिने परत यमाचा पिच्छा केला परत त्यांनी म्हटलं तू परत जा ती म्हटली पती जाईल तिथं जाणार मी मग हि निष्ठा ऐकून यम म्हणला, “दुसरा वर मागा” या वेळी तिने आपल्या सासऱ्याचे राज्य मागितले. 
परत ती यमाच्या मागे जात होती तेव्हा तिने जाताना सत्पुरुषांविषयी सांगितले त्यावेळी यमाने म्हटले पतीचा जीव सोडून कोणताही वर माग, मग तिने आपल्या पित्याला पुत्र प्राप्तीचा वर मागितला. नंतर ती परत मागे जाऊ लागली परत तिने यमाचे कौतुक केले यावेळी यमाने म्हटले पतीचा जीव सोडून कोणताही वर माग, तिने आपल्या पतीला 100 पुत्र प्राप्ती व्हावी,असा वर मागितला. परत ती यमाच्या मागे जाऊ लागली तिने मग यमाला सत्पुरुषांच्या कामाची माहिती सांगितली. प्रसन्न होऊन यम म्हटले एक चांगला वर मागा त्यावेळी तिने मागितले कि मला माझ्या पतीचे प्राण परत मिळावे. हे ऐकून यम प्रसन्न झाला व तथास्थू म्हटले. 
असा रीतीने सावित्रीने आपल्या आई वडील सासू सासरा व नवऱ्याचं भलं केल. 
हे पण नक्की वाचा : 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *